विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने तुमसर-मोहाडी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून चरणभाऊ वाघमारे यांना जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
आज तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार चरण वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपस्थित राहून, त्यांच्या प्रचारार्थ आयोजित विजय संकल्प सभेला संबोधित केले. तसेच या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार राज्यात पुन्हा आणण्यासाठी वाघमारे यांना विधानसभेत पाठविण्याचे आवाहन यावेळी केले.
महागाईच्या ओझ्याखाली महाराष्ट्रातील सर्वसामान्या कुटुंब ही दबली जात आहेत. परंतु महायुती सरकारला याचं सोयरसुतक देखील उरलेलं नाही. ऐन दिवाळीत महागाई करणा-या महायुती सरकारला नाकारायलाच हवं. जनतेला महागाईमुक्त करणारं सरकार आणण्यासाठी 7030120012 या क्रमांकावर मिसकॉल द्या आणि 'हक्क मागतोय महाराष्ट्र' या मोहीमेत सहभागी व्हा!
उद्योग आणि नोक-या गुजरातला पाठवून महाराष्ट्रातील तरूणांचा अपमान करणा-या भ्रष्टयुतीला धडा शिकवायची वेळ आली आहे. कॉंग्रेसचा हात देईल साथ!
#गुजरातची_लाडकी_भ्रष्टयुती
तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित भव्य रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
@AnilDeshmukhNCP
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील साहेब यांचे मनःपूर्वक आभार!
६०-तुमसर मतदारसंघातील उमेदवारी देऊन जो विश्वास दाखवला, त्याबद्दल अभिमान वाटतो.
आपल्या विश्वासाने मी सदैव समर्पित राहीन.
ही संधी म्हणजे जनतेची सेवा करण्याची एक नवी पायरी आहे. आपल्या सर्वांच्या विश्वासाने मी माझे कर्तव्य अधिक बळकटपणे पार पाडेन आणि जनतेच्या हितासाठी सदैव समर्पित राहीन.
आपल्या पाठिंब्याने विजय नक्कीच आहे!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील साहेब यांचे मनःपूर्वक आभार!
महाराष्ट्र विधानसभेच्या ६०- तुमसर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी देऊन माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मला अभिमान व जबाबदारीची जाणीव आहे.
देशाच्या प्रगतीसाठी आणि समाजसेवेसाठी अविरत कार्य करणारे रतन टाटा यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या नेतृत्वाने उद्योगजगताला नवी दिशा दिली आणि संकटसमयी देशासाठी मदतीचा हात सदैव पुढे केला. अशा महान व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली!
#TATA
घटस्थापना व शारदीय नवरात्रौत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
या नवरात्रीमध्ये देवीचे आशीर्वाद आपणा सर्वांवर सदैव राहो आणि आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो.
#घटस्थापना#नवरात्री
भंडारा-गोंदिया लोकसभेचे खासदार मा. डॉ. प्रशांतजी पडोळे आपल्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणांस यापुढील वाटचालीसाठी भरपूर यश, उत्तम आरोग्य, आणि आनंद लाभो, हीच प्रार्थना.
@_Prashantpadole
यावेळी जि.प.भंडारा कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री. राजेश भाऊ सेलोकर, पं.स.सभापती श्री.नंदु भाऊ रहांगडाले, अध्यक्ष विकास फाऊंडेशन ट्रस्ट श्रीमती. विजया ताई वाघमारे, पं.स.तुमसर सदस्या श्रीमती पल्लवी ताई कटरे तसेच समस्त विकास फाऊंडेशन महिला पदाधिकारी व कार्यकर्ता गण उपस्थित होते.
📍तुमसर ।१४-०९-२०२४।
विकास फाऊंडेशन तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्र भव्य महिला मेळावा आणि रक्तदान शिबिर माजी आमदार तथा विकास फाऊंडेशन संस्थापक श्री. चरणभाऊ वाघमारे यांच्या मार्गदर्शन मध्ये विकास फाऊंडेशन जनसंपर्क कार्यालय,तुमसर मध्ये पार पाडण्यात आले.
गणरायाच्या वाजत-गाजत आगमनाची चाहूल आपल्यापैकी प्रत्येकाला लागली होती. उत्साह तर शिगेला पोहोचला आहे.
विकास फाउंडेशन च्या आपल्या कार्यालयात श्री ची स्थापना करताना माजी आमदार चरणभाऊ वाघमारे व कार्यकर्त्यात उत्साह दिसला,गणपती बाप्पा मोरया
आनंद, उत्साह आणि भक्तीभावाच्या वातावरणात आज गणरायाचे आगमन होत आहे. चैतन्याने सळसळणारा गणेशोत्सव, आपण सर्वजण या उत्सवात सहभागी होऊन आनंदाची उधळण करुया. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
#GaneshChaturthi2024#Ganeshotsav2024
आपल्यासाठी वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा-राजा प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा “बैलपोळा” सणानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#बैलपोळा
आज रक्षाबंधन, बहीण - भावाच्या नात्याला मायेचे रेशमी बंध प्रदाण करणारा आणि त्यांच्या नात्यातील प्रेम अधिक वृध्दिंगत करणारा सण. सर्व बहीणभावांना रक्षाबंधन निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.
#rakshabandhan2024
मार्गदर्शक मो. तारीकजी कुरेशी, पं.स. तुमसरचे सभापती तथा कार्याध्यक्ष विकास फाऊंडेशन जिल्हा नंदूभाऊ रहांगडाले, उपाध्यक्ष हिरालालजी नागपुरे अनिल भाऊ जिभकाटे, ललितजी शुक्ला, राजु भाऊ गायधने, पं.स. सदस्य पल्लवी कटरे, परमानंदजी कटरे, शेखरजी बिसने, वसंतरावजी आगासे उपस्थित होते.
📍तुमसर ।१५/०८/२०२४।
विकास फाऊंडेशन भंडारा जिल्हा मुख्यालय तुमसर येथे स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री विजयजी रहांगडाले निवृत्त शिक्षक यांचें हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.