भारत हे विभिन्न भाषिक प्रांतांचे संघराज्य क्षेत्र आहे, त्यात महाराष्ट्र हे एकभाषिक मराठी प्रांत आहे.
महाराष्ट्रात व्यवहार करताना, संवाद साधताना, ग्राहकसेवा उपभोगताना 'पुलं' च्या भाषेत मराठीची मागणी करा, नाही ऐकलं तर 'ढसाळ' आहेतच!
#मराठीभाषा
आपल्या विचारांनी जातीभेद, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमतेविरुद्ध समाजप्रबोधन करणारे महान संत कबीर दास यांची आज जयंती. प्रेम, समता आणि मानवतेचा संदेश देत त्यांनी धर्म, जात आणि पंथ यापलीकडे माणुसकीला सर्वोच्च स्थान दिले. त्यांच्या लिखाणातून आजही विवेक, बंधुता आणि सामाजिक ऐक्याची प्रेरणा मिळते. समतेचा, मानवतेचा आणि सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या संत कबीर दास यांना जयंतीदिनी शत्-शत् नमन!
#संतकबीर
🚩 **जय शिवराय!** 🚩
भिवंडी येथील **छत्रपती शिवाजी महाराज चौक** येथे उभारण्यात येत असलेल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन भव्य पुतळ्याच्या कामाची आज प्रत्यक्ष पाहणी केली. महाराजांचे हे स्मारक संपूर्ण भिवंडीकरांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा स्त्रोत ठरणार आहे, त्यामुळे हे काम अत्यंत दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे.
या प्रसंगी भिवंडीचे **महापौर मा. नारायणजी चौधरी** देखील सोबत उपस्थित होते. आम्ही दोघांनी मिळून कामाच्या गतीचा आढावा घेतला आणि प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या.
शिवरायांचे हे भव्य रूप लवकरच भिवंडीच्या वैभवात भर घालणार आहे!
भिवंडीकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या एकमेव **स्वर्गीय मीनाताई ठाकरे रंगायतन (नाट्यगृह)** च्या सुरू असलेल्या कामाची आज प्रत्यक्ष पाहणी केली.
गेल्या दीड वर्षांपासून हे काम रखडलेले असून, ठेकेदाराकडून वारंवार वेळ पाळली जात नसल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, कामाचा दर्जा आणि गती सुधारण्यासाठी प्रशासनाला आणि ठेकेदाराला **अंतिम ४ महिन्यांची मुदत** देण्यात आली आहे.
भिवंडीतील सांस्कृतिक केंद्र असलेल्या या नाट्यगृहाचे काम दिलेल्या वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाले नाही, तर संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर **कडक कारवाई** करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत!
अधिक माहितीसाठी नक्की बघा हा संपूर्ण व्हिडिओ. 👇
🚩 **जय शिवराय!** 🚩
भिवंडी येथील **छत्रपती शिवाजी महाराज चौक** येथे उभारण्यात येत असलेल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन भव्य पुतळ्याच्या कामाची आज प्रत्यक्ष पाहणी केली. महाराजांचे हे स्मारक संपूर्ण भिवंडीकरांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा स्त्रोत ठरणार आहे, त्यामुळे हे काम अत्यंत दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे.
या प्रसंगी भिवंडीचे **महापौर मा. नारायणजी चौधरी** देखील सोबत उपस्थित होते. आम्ही दोघांनी मिळून कामाच्या गतीचा आढावा घेतला आणि प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या.
शिवरायांचे हे भव्य रूप लवकरच भिवंडीच्या वैभवात भर घालणार आहे!
आपलो कोकण फक्त पर्यटनावर महाराष्ट्राला पोसू शकतो याशिवाय महाराष्ट्रात सह्याद्री, लेण्या, पठार, जंगलं व ऐतिहासिक वारसास्थळांची मांदियाळी आहे.
जगभरात अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर उभी आहे. महाराष्ट्राला परप्रांतीयांची गरज म्हणण्यापेक्षा, परप्रांतीयांना महाराष्ट्राची गरज आहे.
अखंड सौभाग्य, प्रेम, विश्वास आणि दृढ नात्याचे प्रतीक असलेला वट पौर्णिमा हा पवित्र सण आज उत्साहात साजरा केला जात आहे. कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी, निरोगी आयुष्यासाठी आणि नात्यांतील प्रेम अधिक दृढ व्हावे, या भावनेने साजरा होणारा हा सण आपल्या संस्कृतीतील श्रद्धा, परंपरा आणि कौटुंबिक मूल्यांचे प्रतीक आहे. याच पवित्र सणाच्या निमित्ताने राज्यातील सर्व माता-भगिनींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
#वटपौर्णिमा
Take away all your temporary labels: race, nationality, religion, gender, age, etc, and what is left? Who are you behind all these changeable designations, the unseen, ever existing witness travelling from life to life in a dream.