प्रगती हेच धोरण, विकास हाच ध्यास !
शिवसेना श्री. चिमणराव पाटील यांनी महायुतीच्या अडीच वर्षातील यशस्वी आणि विकसनशील कार्यांचा 'रिपोर्ट कार्ड' आपल्या मतदारसंघात सादर केला.
याप्रसंगी महायुतीने केलेले विविध विकासकार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी त्यांच्यासह शिवसेना नेते श्री. अमोल पाटील तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Shivsena #EknathShinde
रामायण या महाकाव्याच्या माध्यमातून आदर्श जीवन जगण्यास मोलाचं मार्गदर्शन करणारे, सत्य व कर्तव्याची जाणीव करून देणारे आदिकवी महर्षी वाल्मिकी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#ValmikiJayanti
कोजागिरी पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा ..!
येणारी कोजागिरी पौर्णिमा तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो, हीच मंगलमय कामना..!
दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत भगिरथी महिला शहरस्तर संघाव्दारे सोनचिरैय्या उपजिविका केंद्राचा उद्घाटन सोहळा आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या शुभहस्ते पारोळा येथील नगरपरिषद सभागृहात पार पडला.
उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना, जळगांव जिल्हा
तालुकास्तरीय अधिवेशन तथा उमेद संघटना मागणी जनजागृती मेळावा पारोळा येथील पंचायत समितीच्या सभागृहात पार पडला.
यावेळी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी या मेळावा व अधिवेशनाला भेट देली.
*आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रौत्सवाच्या (घटस्थापना) च्या मन:पूर्वक शुभेच्छा...!*
*आदिशक्तीच्या कृपेने सुख, समृद्धी व उत्तम आरोग्य लाभो ही प्रार्थना...!*
*भव्य सलुन किट वितरण सोहळा...*
आज पारोळा येथे आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मा.अमोलदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नाभिक समाज बांधवांना सलुन वितरण सोहळा पार पडला.
'राज्याचा सर्वांगीण विकास हाच ध्यास' बाळगून काम करत असल्याचे मत आज मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी व्यक्त केले. निमित्त होते 'इंडिया टुडे' वृत्त समूहाच्या 'आज तक' वृत्तवाहिनीने आयोजित केलेला 'कॉनक्लेव्ह- २०२४' कार्यक्रम. या कार्यक्रमात पत्रकार राजदीप सरदेसाई आणि पत्रकार साहिल जोशी यांनी मुख्यमंत्री महोदयांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्रातले विविध प्रकल्प, सुविधा, सर्वसामान्य जनतेच्या कल्याणकारी योजना, निर्णयांबद्दल माहिती दिली. तसेच समृद्ध महाराष्ट्राबद्दल आपली भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.
#Eknathshinde #Shivsena
इंडिया टुडे वृत्तसमूहाच्या कॉनक्लेव्ह कार्यक्रमात मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेल्या खास मुलाखतीतील प्रमुख मुद्दे
#Eknathshinde#Shivsena