Official X handle of the Office of the Collector & District Magistrate, Chhatrapati Sambhajinagar, Government of Maharashtra. Citizen-centric governance.
शाळा परिसर तंबाखूमुक्त करा!
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा जी सी यांनी शाळा व शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्याचे, तसेच तंबाखूविरोधी जनजागृती प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले
#TobaccoFree
दिशा समितीच्या बैठकीत विविध केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा.
जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांना भारनियमनमुक्त वीजपुरवठा करण्याचे निर्देश खा. संदिपान भुमरे यांनी दिले.
राष्ट्रीय महामार्ग व प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबतहर्ण चर्चा
रस्ते सुरक्षा समितीची आढावा बैठक
रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, हेल्मेट वापराबाबत ज���जागृती व अंमलबजावणी, फुलंब्री अपघात याचिका,
अतिक्रमण हटविणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी शिक्षण विभागाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली.
#RoadSafety #रस्तेसुरक्षा
शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक विमा योजने��ा लाभ घ्या!
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी १० ऑगस्टपर्यंत पीक विमा भरून आपल्या पिकांना विमा संरक्षण द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा जी. सी. यांनी केले.
पीक सुरक्षित, शेतकरी सुरक्षित!
#PMFBY #पीकविमा #शेतकरी
महसूल दिनानिमित्त आयोजित गौरव समारंभात विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारी, सेवानिवृत्त अधिकारी व गुणवंत पाल्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., भा.प्र.से., पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपस्थित होते.
#महसूलदिन#Csn
महसूल दिना��िमित्त आयोजित गौरव समारंभात विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारी, सेवानिवृत्त अधिकारी व गुणवंत पाल्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., भा.प्र.से., पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपस्थित होते.
#महसूलदिन #Csn
जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा मा. जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा जी. सी. यांनी आढावा घेत जलसंधारणाची सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
#जलयुक्तशिवार#WaterConservation
मा. विभागीय आयुक्त श्री. जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय क्रीडा संकुल समितीची आढावा बैठक छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाली. यावेळी मा. जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा उपस्थित होते.
#ChhatrapatiSambhajinagar#SportsInfrastructure
मा. विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर श्री. जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय क्रीडा संकुल समितीची आढावा बैठक स्मार्ट सिटी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाली.मा. जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा उपस्थित. विकासकामे, पायाभूत सुविधा व प्रलंबित विषयावर सूचना दिल्या.
विशेष मतदार यादी पुनरीक्षण (SIR) २०२६ संदर्भातील सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.मतदार म्हणून आपले नाव मतदार यादीत आहे का, याची खात्री करा. आवश्यक असल्यास विहित कालावधीत दावे किंवा हरकती नोंदवा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्या मतदानाच्या अधिकाराची नोंद निश्चित करा#India
५ ऑगस्ट २०२६ रोजी मुख्��मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली(MIDC) अंतर्गत विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासंदर्भात आढावा बैठक पार पडली. राज्यात ६६,३४३ एकर जमीन भूसंपादन प्रक्रिया सुरू असून, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचाही समावेश आहे.
#MIDC #ChhatrapatiSambhajinagar
मा. जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली आज अमली पदार्थ विरोधी कार्यकार��� समितीची बैठक संपन्न झाली. १२ ते १८ वयोगटातील युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक श्री. प्रकाश जाधव उपस्थित होते.
#maharashtra #csn
जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवा��ा विद्यापीठ व SAI क्रीडा विभागास सदिच्छा भेट देऊन विविध विषयांचा आढावा घेतला.
#CollectorCSN #ChhatrapatiSambhajinagar
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाचा शुभारंभ मा. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मंत्री अतुल सावे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत (भा.प्र.से.) व जिल्हाधिकारी तथा जिल्ह��दंडाधिकारी विनय गौडा (भा.प्र.से.) उपस्थित होते.#CollectorCSN #छत्रपतीसंभाजीनगर