आज माझ्या हस्ते मुंबई प्रेस क्लबच्या इमारतीत छायाचित्रकार श्री. गजानन दुधाळकर यांच्या 'डान्स ऑफ डेमोक्रसी' या छायाचित्र प्रदर्शनाचं उदघाट्न झालं. त्यानंतर पत्रकारांशी संवाद झाला. त्या संवादातील महत्वाचे मुद्दे...
२०१८ पासून मी बॅलेटपेपरवर निवडणुका व्हाव्यात यासाठी प्रयत्न करतोय. त्यावेळी मी देशातील अनेक नेते आणि निवडणूक आयुक्तांनाही भेटलो होतो. त्यावेळी मी काय बोलतोय हे लोकांना कळालं नाही ते आता कळतंय.
• मतदानाच्या प्रक्रियेत पारदर्शकता असायला हवी. मी मतदान करतोय याचं समाधान मला असलं पाहिजे.
• जगातील बहुतांश पुढारलेल्या देशांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान होतं. फ्रान्समध्ये एका मतदाराने तक्रार केल्यानंतर तिथली ईव्हीएम मशीन्स बंद करून बॅलेट पेपरवर मतदान सुरू झालं मग भारतात ईव्हीएम मशिन्स कशाला हव्यात?
• पुढच्या साधारण ३ ते ४ महिन्याांमध्ये या देशात काहीतरी मोठी गडबड होईल एवढं निश्चित.
• पुढील काळात सरकारमधल्या अनेक गोष्टी समोर येतील. सरकार चुकांवर चुका करत राहील त्यातून काही महिन्यांमध्ये संपूर्ण देश रस्त्यावर आला तरी मला आश्चर्य वाटणार नाही.
• सरकारने महाराष्ट्रातील ३००-३२५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. ही परिस्थिती आणखी खराब होणार आहे आणि कोणतीही पूर्वतयारी नसल्याने ती परिस्थिती सरकारला झेपणार नाही.
• अमेरिकेतील कलाकार राष्ट्राध्यक्षांविषयी मत मांडतात म्हणून लगेच त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घातला जात नाही. आपल्याकडे त्याच भीतीने अनेक कलाकार बोलत नाहीत.
• शांततेत आंदोलन करणाऱ्या मुलांवर तुम्ही लाठीचार्ज केला, पोलिसांच्या गणवेशात तुम्ही तुमच्या पक्षाचे लोकं घुसवलेत, तुम्ही हंगामा केला, मुलांनी काहीच केलं नव्हतं.
• सबीर भाटीया यांनी अदानींवर एक डॉक्युमेंट्री बनवली आहे, ती काढून टाकायला सांगितलं आहे. कशाला काढायची? लोकांना पाहुदेत. प्रत्येक वेळी भाजपने स्पॉन्सर केलेलेच चित्रपट पाहायचे का आम्ही?
• नागरी सुरक्षेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. हीच परिस्थिती जर भारतीय जनता पक्ष विरोधात असताना घडली असती तर ते काय बोलले असते?
• लॉरेन्स बिश्नोईसारख्या लोकांना जेलमधून बाहेर काढून फटकावून काढला पाहिजे. त्याशिवाय कायद्याची भीती कशी राहिल?
• मी अनेकदा हे सांगितलं आहे, आपल्याकडे लॉ आहे पण ऑर्डर नाही. माझा मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांवर १०० टक्के विश्वास आहे, त्यांना फ्री हँड दिला तर ते क्राईम रेट शून्यावर आणतील.
• गेल्या काही वर्षांमध्ये देशात साचलेल्या गोष्टी फार काळ दबून राहू शकत नाहीत. प्रत्येकाचा राग हा एक ना एक दिवस बाहेर येईल.
सरकारला ही डॉक्युमेंट्री समाजमाध्यमांवरून गायब करायची आहे. याचं कारण काय असेल ते तुम्हाला ही डॉक्युमेंट्री बघितल्यावर कळेलच. त्यामुळे सरकारने ही डॉक्युमेंट्री गायब करायच्या आधी बघून घ्या !
भारतीय जनता पक्ष, RSS ह्या दोघांचे एकही चिंदी चोर चोंग्या आजच्या "पार्कतल्या आंदोलन" स्थळी येण्याची हिंमत केली नाही!
आज माहिती होत, गेलो की पळून पळून फटके पडणार जसे Little Boy ला पडले 🤣🤣
महाराष्ट्रसैनिक आणि शिवसैनिक आक्रमक 🔥
#Mumbai
दादरच्या शिवाजी पार्कमध्ये केवळ फिरण्यासाठी आलेल्या निष्पाप लोकांना पोलिसांनी ताब्यात घेणं अत्यंत संतापजनक आहे. मनसे नेते श्री. अमित ठाकरेंनी स्वतः घटनास्थळी धाव घेत त्या नागरिकांची सुटका करून घेतली आणि या मुजोरीविरोधात खणखणीत आवाज उठवला.
#AmitThackeray
आज आपण सत्तेत आहोत म्हणजे अनंत काळापर्यंत असू ही अपेक्षा बाळगू नका. तुम्ही काही सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आलेले नाही आहात. जेव्हा सत्तेतून एखादा हुकूमशाही मानसिकतेचा सत्ताधारी जातो त्यानंतर त्याची जनताच कशी पळताभुई करतात याची जगभरातील उदाहरणं आठवा. जगभरातील सोडा भारताचा इतिहास वाचलात तरी कळेल जिथे मुघलांपासून, पोर्तुगीजांपासून ते आमच्या साम्रज्यावरचा सूर्य मावळत नाही असा माज करणाऱ्या ब्रिटिशांचा जिथे या देशाने माज उतरवला, तिथे स्वकीयांचा माज इथली जनता उतरवणार नाही, असं वाटतंय का तुम्हा सत्ताधाऱ्यांना ? सरकार म्हणून तुमच्याकडून मॅच्युरिटीची अपेक्षा आहे, ती नसेलच तर शिकून घ्या, आत्मसात करा.
आंदोलन करणाऱ्या प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, आणि तो अबाधितच राहिला पाहिजे हे निश्चित !
राज ठाकरे ।
"No nation can be grateful at the cost of its liberty" हे उद्गार आहेत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. नोव्हेंबर १९४९ ला भारतीय राज्यघटनेचा मसुदा सादर करताना त्यांनी हे अतिशय महत्वाचे उद्गार काढले होते.
एखाद्या नेत्याच्या आंधळ्या भक्तीसाठी किंवा त्याच्या तऱ्हेवाईक वागण्याला खतपाणी घालण्यासाठी या देशाची स्वातंत्र्य, अभिव्यक्ती ही मूल्य अजिबात पणाला लागता कामा नयेत.
हे वाक्य आज पुन्हा म्हणावं लागतंय. कारण मोदी आणि शाह या जोडीच्या मनात आणि डोक्यात अत्यंत पराकोटीची हुकूमशाही बसली आहे . या हुकूमशाहीच्या जोरावर या जोडीने देशातील सगळ्या यंत्रणांना काबीज करून जी सत्ता मिळवली. आणि जी सत्ता फक्त मूठभर उद्योगपतींच्या हितासाठी राबवली जात आहे. सत्तेच्या या मस्तीला विरोध केला, त्याच्या विरोधात निदर्शनं केली म्हणून, जर आंदोलकांना चिरडलं जाणार असेल आणि त्यांना अटक केली जाणार असेल तर, त्यांच्या या बेबंदशाहीला या देशातून खालपासून वरपर्यंत उखडूनच काढलं पाहिजे !
या देशांत आंदोलनं करायचीच नाहीत? तुम्हाला प्रश्न विचारायचेच नाहीत ? आंदोलन करणं हा अधिकार हिरावून घेणारे तुम्ही कोण ? भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन ३ ऑक्टोबरपासून दिल्लीत आंदोलनं सुरु आहेत. दिल्ली पोलिसांना हाताशी धरून हे सरकार फक्त आंदोलकांना चिरडत होतं असं नाही तर हे आंदोलन कव्हर करणाऱ्या महिला पत्रकारांचा पण छळ करत होतं.
आज दिल्लीत आंदोलनं होतील या भीतीने दिल्लीत मेट्रो सेवा बंद केलीत, रस्ते अडवलेत, इंटरनेट सेवा बंद केली आहे, बस सेवा थांबवली आहे, आंदोलकांना विमानातून उचलून नेलं जात आहे. ही कोणती पद्धत ? देशातील २०,३० वर्षांचे तरुण तरुणी अस्वस्थ आहेत, त्यांना त्यांचं भविष्य दिसत नाहीये, म्हणून ती शांततेत रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत आणि तुम्ही त्यांनाच चिरडायचा प्रयत्न करताय? जगभर मोदी जाऊन आमच्या देशात लोकशाही आहे हे आता कोणत्या तोंडाने सांगणार आहेत ? ही असली लोकशाही?
मला समजत नाही या ज्ञानेश कुमारबद्दल इतकं प्रेम का ? ज्ञानेश कुमार आणि त्या आधीचे निवडणूक अधिकारी हे तुमचे सत्ता काबीज करण्याचे मार्ग आहेत म्हणून ? निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे, त्याच्या प्रमुखाने काही गोंधळ घातला असेल तर त्याचा राजीनामा व्हायलाच हवा. तसंच संपूर्ण निवडणूक यंत्रणा ही प्रामाणिक आणि पारदर्शक असायला हवी या मागणीत गैर ते काय ? माझ्या मताचा अधिकार काढून घेतला जातोय, किंवा माझं मत कुठे आणि कोणाला जातंय हे मला समजत नाहीये. आणि त्यातून माझ्या मताचा अपमान होतोय हा राग व्यक्त करण्याचा अधिकार पण नसावा ? का वरच्या दोघांना भीती आहे की ज्ञानेश कुमारला राजीनामा द्यायला लागला आणि त्याने माझे मतचोरीचे करवते धनी कोण हे जर सांगितलं तर आत्तापर्यंतचं सत्तेचं सगळंच बिंग फुटेल म्हणून!
भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ (१) (अ) आणि (ब) यानुसार नागरिकांना शांततेत निदर्शनं करण्याचा पूर्ण अधिकार आहे. हा अधिकार तुम्हाला का चिरडायचा आहे ? काल तर चक्क माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील विचारलं, माशी मारायला हातोडा कशाला वापरताय ?. बरं आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि सोडून दिलं असं सहसा महाराष्ट्रात पोलीस डिपार्टमेंट करतं. आणि हे करताना नागरिकांच्या संविधानिक अधिकारांना धक्का बसणार नाही हे पाहतात. पण इथे दिल्लीत तर महिला पत्रकार ज्या हे आंदोलन कव्हर करत होत्या, त्यांच्या तक्रारी आहेत की पोलिसांनी स्थानबद्ध केल्यावर त्यांचा छळ केला म्हणून. जर आंदोलन कव्हर करणाऱ्यांचा छळ होत असेल तर आंदोलकांना नीट वागवतील याची काय खात्री ?
या देशातील तरुणांनी तुम्हाला झुकवलं आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला लावला हा राग अजून शमला नाहीये असं दिसतंय. अण्णा हजारे आंदोलनाच्या वेळेस मोदी-शाह गुजरातमध्ये आंदोलनं होऊ देत होते कारण ती फायद्याची होती. पण त्याच गुजरातमध्ये त्यांनी सत्तेच्या काळात त्यांच्या सरकारच्या विरोधातील अनेक आंदोलनं चिरडली. थोडक्यात हे बेगडी आणि दुटप्पी आहेत हे स्पष्ट दिसतंय.
नेटफ्लिक्सवर एक डॉक्युमेंट्री आहे, How to Become a Tyrant (tyarant म्हणजे जुलमी शासक ) ही डॉक्युमेंट्री बहुदा अमित शाह रोज गांभीर्याने बघत आहेत असं दिसतंय. त्यापेक्षा ज्या गुजरातमधून तुम्ही येता त्याच राज्यातून आलेल्या महात्मा गांधींनी शांततेतली केलेल्या आंदोलनांबद्दल आणि स्वातंत्र्य चळवळीबद्दल जरा वाचा. अर्थात यांच्याकडून मी अपेक्षा का बाळगतोय हेच समजत नाही ! असो . . .
सस्नेह जय महाराष्ट्र,
५ ऑक्टोबर २०२६ ला मी जेंव्हा पुण्यात एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली तेंव्हा मी तुमचं म्हणणं, तुमच्या रास्त अपेक्षा याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलेन असं आश्वस्त केलं होतं.
स्वतःचा राहता जिल्हा, तालुका, आपलं घर तसेच आपल्या कुटुंबाला सोडून नोकरीसाठी राब राब राबणाऱ्या तरुणांना आणि तरुणींना पाहिलं की जिवाची कालवाकालव होते.
म्हणून आज या विषयावर माझी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. ते देखील पूर्णपणे सकारात्मक आहेत हे जाणवलं. आणि येत्या काही दिवसांत MPSC च्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यां संदर्भात एक चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे . तेंव्हा विद्यार्थ्यांनी देखील संयम ठेवावा.
राज ठाकरे ।
एका उद्योगसमूहाच्या फायद्यासाठी हे सरकार कसं काम करतंय यावर राजसाहेब ठाकरे दीर्घकाळ मांडणी करत आहेत. मुंबईचं सध्याचं विमानतळ टप्प्याटप्प्याने हलवून हळूच एक दिवस ती जमीन कशी गिळंकृत केली जाईल हे राजसाहेबांनी ठासून सांगितलं. त्याची प्रचिती मुंबई विमानतळाच्या T १ चा पुनर्विकास करायचा म्हणून विमानं नवी मुंबईत हलवण्याचा निर्णय लादण्याचा प्रयत्न सुरु झाला आणि याला आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांचा विरोध असून देखील तो रेटण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्यातून याची प्रचिती दिसते.
#Airport #Mumbai #MNSAdhikrut
घाणेरेड्या,गलिच्छ आणि खोटारड्या राजकारणी लोकांच्या जगात, मी "ठाकरेंचा" माणूस आहे ह्याचा अभिमान आहे!
राज ठाकरे डोळ्यात डोळे घालून नेहमी "खरं" बोलतो!
#Mumbai
मुख्यमंत्री ह्यांचा जेवढा AURA आणि CRAZE नाही त्या पेक्षा जास्त "एकट्या राज ठाकरेचा" AURA आहे!
तरुण वर्ग २००६ साली पण राज ठाकरे सोबत होता आणि आता २०२६ साली पण राज ठाकरे सोबतच आहे!
एकटा राज ठाकरे >> ₹२० ठेशन आणि ३५ पुरणपोळ्या Anytime Bhai
#Mumbai
राजकारणात खोटी आश्वासनं देऊन टाळ्या मिळवणं सोपं असतं, पण सत्य बोलण्यासाठी हिंमत लागते. "७० हजार पदभरती होणार नाही आणि उद्या दुसरं सरकार आलं तरी होऊ शकत नाही," हे स्पष्ट सांगायला फक्त राज ठाकरेच धाडस दाखवू शकतात. म्हणूनच ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात!
#MPSCProtest#Pune