जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर राज्यातील अनेक पर्यटक त्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्यासाठी शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब स्वतः श्रीनगर येथे पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांनी विमानतळाच्या जवळ असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातील पर्यटकांची भेट घेतली.
याठिकाणी अडकलेल्या काही पर्यटकांनी उपमुख्यमंत्री महोदयांशी फोनवरून संवाद साधून मदतीची मागणी केली होती. यासाठी उपमुख्यमंत्री महोदयांनी खासदार मा.डॉ.श्रीकांतजी शिंदे साहेबांचे स्वीय सहाय्यक मा.अभिजीत दरेकर आणि उपजिल्हाप्रमुख मा.राजेश कदम यांच्यासह शिवसेनेच्या मदत पथकाला याठिकाणी अडकलेल्या राज्यातील पर्यटकांच्या मदतीसाठी पाठवले.
या मदतकार्याला वेग येण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांनी श्रीनगर येथे पोहोचून पर्यटकांची भेट घेतली. तसेच त्यांच्याशी संवाद साधून सुखरूप आपल्याला लवकर घरी नेण्यात येईल. त्यासाठी विशेष विमानाची सोय करण्यात आल्याचे सांगत या सर्वांन��� मदतीच��� आधार दिला. तर शिंदे साहेबांच्या रूपाने आपल्यासाठी आपल्या हक्काचा माणूस मदतीला धावून आल्याची भावना यावेळी पर्यटकांनी व्यक्त करत साहेबांचे मनापासून आभार मानले.
#PahalgamTerroristAttack #Shivsena #EknathShinde
ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्था,उमरगा, युथहेड फाऊंडेशन, पुणे व ग्रामऊर्जा फाऊंडेशन, अंबाजोगाई यांच्या वतीने उमरगा येथे आयोजित उद्योजकता समिट 2025 व मकर संक्रांतीनिमित्त विविध साहित्यांची विक्री व प्रदर्शनास भेट दिली.
#djsb#omerga#मकर_संक्रांत
उमरगा - लोहारा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारार्थ आज मतदारसंघात जाहीर सभा पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांना संबोधित केले. आमदार आणि आपले अधिकृत उमेदवार असलेले ज्ञानराज चौगुले यांच्या कार्यकाळात त्यांनी उमरगा ��िधानसभा मतदारसंघात अनेक विकासकामे मार्गी लावली. तर आपले आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आजवर मागणी केलेल्या प्रत्येक विकासकामांसाठी मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी भरीव निधीची तरतुद केली आहे. यामुळे आज उमरगा - लोहाऱ्यासाठी कृष्णा खोऱ्यातील मुबलक पाणी, १०० बेड्सचे आधुनिक रुग्णालय येथील देवस्थानांचा विकास यांसारखी अनेक कल्याणकारी कामे मार्गीं लावण्यास आपण कटिबद्ध आहो��, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. यासाठी ज्या पद्धतीने आपण गेले तीन टर्म ज्ञानराज चौगुले यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहात त्याच पद्धतीने यंदाही आपण धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून ज्ञानराज चौगुले यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन यावेळी सर्वांना केले.
यावेळी महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
#DrShrikantEknathShinde #Shivsena
यावेळी माझे राजकीय गुरू मा.खासदार प्रा.रविंद्र गायकवाड सर, ज्येष्ठ शिवसेना नेते जितेंद्र दादा शिंदे, युवा सेना विभागीय निरीक्षक किरण गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे यांची उपस्थिती होती.
हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघात महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.
@mieknathshinde@Shivsenaofc
गद्दार, खोके करत बसण्यापेक्षा लोकसभेला मराठी मतदारांनी साथ का सोडली याचं उबाठाने आत्मपरीक्षण करावं. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्याने त्यांची ही परिस्थिती झाली आहे. मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात बाळासाहेबांची शिवसेना घोडदौड करत असून य��त्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आण��्याचा आम्ही प्रयत्न करू.
- मा.श्री.डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार
#Eknathshinde #Shivsena