तुम्हाला माहित आहे का?
5 जुलै 1923 पासून भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली करण्यास सुरुवात केली.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट जाणून घेण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली - मुलुंड खाडी पूलाजवळ,
लिगसी म्हणजे काय?
१८७४ चा जन्म ते आज २०२४ साल. दिडशे वर्षांचा प्रचंड मोठा काळ.
यात कितीतरी स्थित्यंतर आली, प्रचंड मोठे अन वेगात बदल झाले. कितीतरी गोष्टी विस्मृतीत गेल्या.
आज एकदंर मानवी समाज बुद्धीने, शिक्षणाने खूप प्रगत झालाय.
तरी आजही छत्रपती शाहू महाराजांचे विचार आधूनिक आहेत. सर्वांना आपले वाटतात.
महाराज खरतर महान तत्ववेत्ते, विचारांचे बीज पेरणारे, ते निष्ठेने रुजविणारे महापुरूष आहेत.
त्यांचे विचार आणि कृती हीच खरी आपली खरी लिगसी. या महान लिगसीचे आपण वारसदार आहोत. आपणच ही जपली पाहिजे.
ती पुढे घेऊन गेली पाहिजे. आपल्या मुलाबाळांपर्यंत, समाजाच्या प्रत्येक स्तरात ती झिरपली पाहिजे. ही लिगसीच आपली खूप मोठी श्रीमंती. तीचा अभिमान बाळगत ती नक्कीच मिरवली पाहिजे.
@abhijeetskamble सर आज महाराजांच्या शैक्षणिक विचारांच्या दूरदृष्टीवर बोलणार आहेत.
नवी मुंबई ऐरोली येथे नक्की या. भेटूया.
लोकराजा राजर्षि छ्त्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त (२६ जून) 'विचारवेध' या विशेष कार्यक्रमांतर्गत मा.श्री.अभिजीत कांबळे (संपादक : बीबीसी न्यूज मराठी) हे “राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्षणिक विचारांची दूरदृष्टी” या विषयावर
@NMMConline
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली येथे राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त (२६ जून) ‘विचारवेध’ या विशेष कार्यक्रमात सर्व सामाजिक घटकांची शिक्षणातूनच सर्वांगीण प्रगती होईल
@NMMConline
हे राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे दूरदूष्टीचे विचार आणि महनीय कार्य जाणून घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहा.
व्याख्यान विषय : राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्षणिक विचारांची दूरदृष्टी
व्याख्याते : मा. श्री. अभिजीत कांबळे (संपादक : बीबीसी न्यूज मराठी)
निरनिराळ्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे जागर करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानस्मारक छायाचित्र दालन, ग्रंथालय, ई-लायब्ररी आणि संविधान कक्ष अशा सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आणि विविधतेने परिपूर्ण आहे.
@NMMConline
सर्वसामान्य माणसे राहण्यासाठी घरे बांधतात, परंतू भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी घर बांधले.
या राजगृहात ५० हजारांहून अधिक पुस्तके आहेत. बाबासाहेबांनी लिहिलेल्या 'भारतीय संविधान' व 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' अशा अनेक पुस्तकांचे हे राजगृह साक्षीदार आहे.
@NMMConline
आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त 'ज्ञान हीच शक्ती' या बाबासाहेबांच्या विचारांचे प्रत्यक्ष दर्शन घडविणाऱ्या ५ हजारांहून अधिक महत्त्वाच्या पुस्तकांनी समृद्ध असलेल्या नवी मुंबई महानगरपालिका भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील ग्रंथालयाला अवश्य भेट द्या.