अभिनंदन मंगल कार्यालय पैठण येथे आज गिरगे परिवार व कदम परिवार यांच्या निमंत्रणास मान देऊन शुभविवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहिलो. तसेच परिवाराने केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला.
#VilasBhumare#vilasbappubhumare#paithan
या नव्या वास्तूमध्ये सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद आणि ऐश्वर्याचा अखंड वास राहो, तसेच हे घर प्रेम, आपुलकी आणि मंगलमय क्षणांनी सदैव भरलेले राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
#VilasBhumare#vilasbappubhumare#paithan#वास्तुशांती
📌 दखल वृत्तपत्रांची | Media Coverage
राज्य शासनाच्या 'फार्मर आयडी' नोंदणी प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटींमुळे हजारो शेतकरी शासकीय योजनांपासून वंचित राहत असल्याचा गंभीर प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला.
#दखल#वृत्तपत्रांची#Media#Coverage#mediacoverage
आगामी निवडणुकीचे प्रभावी नियोजन, संघटनात्मक बळकटी,कार्यकर्त्यांची भूमिका,प्रचाराची दिशा तसेच पुढील कृती आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सहकार चळवळीला अधिक गतिमान,पारदर्शक आणि शेतकरी हिताचे स्वरूप देण्यासाठी सर्वांनी समन्वयाने व एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ढोरकिन, ता. पैठण येथे कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
#VilasBhumare#vilasbappubhumare#bankelection#paithan
मराठी भाषेचा प्रचार-प्रसार, संशोधन, साहित्य-संवर्धन आणि नव्या पिढीमध्ये मराठीबद्दल अभिमान जागविण्यासाठी ही केंद्रे महत्त्वाची भूमिका बजावतील. मराठी भाषेच्या विकासासाठी आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी महायुती सरकारने उचललेले हे निश्चितच स्वागतार्ह व दूरदृष्टीचे पाऊल आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती वर्षानिमित्त राज्यातील पुणे, नाशिक, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि कोल्हापूर या ८ ठिकाणी ‘बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा विकास केंद्र’ स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा विधानसभेत करण्यात आली आहे.
बैठकीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी, मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती, कार्यकर्त्यांचे नियोजन तसेच आगामी प्रचाराची दिशा याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. सर्वांनी एकजुटीने काम करत सहकार क्षेत्रात सक्षम नेतृत्व निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आज कन्नड येथे माजी आमदार श्री. नितीन पाटील यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
महावीर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे आज संतोष मोरे यांच्या आई आजारी असल्याकारणाने रुग्णालयात आहेत आज त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. तसेच लवकर बरे होण्याची सदिच्छा व्यक्त केली.
#VilasBhumare#vilasbappubhumare#chatrapatisambhajinagar
या कक्षाच्या माध्यमातून आरक्षणाशी संबंधित न्यायालयीन प्रकरणांचा समन्वय,विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर सातत्याने देखरेख,मराठा युवक-विद्यार्थ्यांना योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी विशेष प्रयत्न,तसेच समाजाकडून येणाऱ्या मागण्या निवेदनांवर तातडीने कार्यवाही केली जाणार आहे.
मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि आरक्षणासंदर्भातील प्रश्नांचा अधिक परिणामकारक पाठपुरावा करण्याच्या उद्देशाने महायुती सरकारने सामान्य प्रशासन विभागात स्वतंत्र ‘मराठा आरक्षण कक्ष’ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या निर्णयाबद्दल महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार!
अंबिका लॉन्स आडगाव फाटा छत्रपती संभाजीनगर येथे आज गायकवाड परिवार व तागड परिवार यांच्या निमंत्रणास मान देऊन शुभविवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहिलो. यावेळी नव दांपत्यांचे अभिनंदन करून पुढील वैवाहिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
#VilasBhumare#chatrapatisambhajinagar#शुभविवाह