असोचेमच्या मते भारतातील ग्राहकांच्या आत्मविश्वासामध्ये पुढील सणासुदीच्या काळाआधी चांगली सुधारणा दिसून येत आहे. वस्तूंची मागणी वाढते आहे आणि ह्याचे सकारात्मक पडसाद सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या आर्थिक कामगिरीत परिवर्तित होतील.
निफ्टी १७००० च्या वर स्थिरावण्याच्या प्रयत्नात. भारतीय अर्थव्यवस्था जुन तिमाहीत २०.१% एवढी झेप नोंदवित सुस्थितीत येण्याची लक्षणे दाखवीत आहे. बॅंकनिफटीने आज ३७००० च्या जवळ मजल मारली आहे आणि सध्या बँक इंडेक्स सहा महिन्याच्या उचांकापाशी आहे.
जागतिक बाजारात चांगली तेजी असताना निफ्टीची मात्र सावध सुरुवात. इंडेक्स १६५०० च्या आसपास रेंगाळत आहे. २० तासाची चलत सरासरी म्हणजेच १६५०२ हा महत्वाचा बिंदू राहण्याची शक्यता. क्रूड ऑइल मधील कालच्या ५% तेजीचे सावट मार्केटला मोठी झेप घेण्यापासून रोखताना दिसत आहे.
निफ्टी रोज नवे उच्चान्क नोंदवित असतानाही बँकिंग शेयर्स मध्ये अजून तेजीस वाव. बँकनिफ्टी ह्या महिन्यात ५% वर आहे तर निफ्टीने ३.७८% एवढी वाढ दाखवली आहे. बँकनिफ्टी सध्या ३६२६० वर आहे व त्याच्या सार्वकालीन उच्चान्क ३७७०८ अजूनही बराच दूर आहे.
जागतिक आर्थिक वाढ ह्या वर्षी ६% राहण्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे भाकीत. भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज १२.५% वरून ९.५% एवढा खाली. नाणेनिधीच्या मते कमोडिटी मार्केट मध्ये आधीपेक्षा जास्त जोमदार झेप अपेक्षित. कच्च्या तेलाची किंमत ह्या वर्षी मागील वर्षीच्या तुलनेत ६०% जास्त राहणार!
कालच्या अप्रतिम कामगिरीनंतर निफ्टीमध्ये आज सुस्ती. इंडेक्स १५८३० च्या आसपास रेंगाळत आहे. जागतिक बाजारातही आज विशेष हालचाल नाही. निफ्टी ह्या आठवड्यात एका महिन्याच्या नीचांकी भावाला स्पर्श करून चांगला वर आला आहे.
ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन च्या मते जून २०२१ मध्ये भारतातील वाहनांची एकूण किरकोळ विक्री मागील वर्षीच्या जूनच्या तुलनेत २२.६०% वर गेली. पण २०१९ जून च्या तुलनेत विक्री अजूनही २८% खालीच आहे. ट्रॅक्टर्स च्या विक्रीत मात्र चांगला जोर!
मागील आठ्वडातील जोरदार घसरणीनंतर जागतिक बाजारात चांगली तेजी दिसते आहे. सतत घटणाऱ्या कॉवीड केसेस आणि आर्थिक पातळीवरील एकंदरीत सुस्थिती ह्यांच्यामुळे काल डाऊ जोन्स १.८% वर गेला. निफ्टीनेदेखील आज १४९०० च्या आसपास आश्वासक मजल मारली आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीत काहीशी घसरण येत आहे. अमेरिकन क्रूड ऑइल सध्या ६९.४६ प्रति बॅरलच्या आसपास आहे. हा भाव अडीच वर्षातील सर्वात वरील पातळीपासून थोडाच खाली आहे. अमेरिकेत इंधनाची मागणी गेल्या काही आठवड्यात सतत वाढते आहे. ह्या परिस्थितीत क्रूड ऑइल मध्ये अजून तेजी दिसणे शक्य आहे.
जागतिक बाजारातील तेजीचे भारतात अपेक्षित पडसाद. निफ्टी १.१ टक्के वाढीसह १४८४० च्या आसपास. गेल्या काही दिवसात भारतातील दैनिक कॉवीड १९ केसेस ची संख्या मोठ्या प्रमाणात. काल दैनिक रुग्णसंख्या ३ लाखाच्या खाली आली जी गेल्या महिन्याभरातली सर्वात कमी पातळी आहे.
क्रूड ऑइल मध्ये जबरदस्त तेजीचे संकेत. अमेरिकन क्रूड ऑइल चा भाव सध्या ६६.४० डॉलर म्हणजेच तीन टक्के वर. गेल्या दोन महिन्यातील ही सर्वोत्तम पातळी आहे. अमेरिकेत कोरोनाच्या केसेस सतत घटत आहेत आणि आर्थिक परिस्थितीतही चांगली सुधारणा होत आहे.
जागतिक बाजारामधील तेजी आज निफ्टीसाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे. इंडेक्स मागील आठवड्यात अडीच महिन्याचा नीचांक नोंदवून वर आला आहे आणि सध्या १.३% एवढ्या वाढीसह १४५०० च्या वर रेंगाळतो आहे. कॉवीड केसेस ३.५ लाखाचा टप्पा पार करूनही आज तेजी दिसते आहे.
निफ्टीमध्ये मोठी घसरण. भारतातील दैनिक कॉवीड केसेस १६९०००! निफ्टी फेब्रुवारी २०२० नंतर प्रथमच २० आठवड्याच्या चलत सरासरीच्या (१४३९६) खाली. ह्या पातळीच्या वर जाणे इंडेक्ससाठी पुढील वाटचालीसाठी महत्चाचे राहणार!
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार जागतिक अर्थव्यवस्था ह्या वर्षी ६% वाढ दाखवणार. ऑक्टोबर मध्ये केलेल्या अंदाजापेक्षा ही वाढ ०.८०% नी जास्त आहे. मागील वर्षीच्या ३.३% एवढ्या आकुंचनानंतर जागतिक अर्थव्यवस्था ताळ्यावर येत आहे पण नाणेनिधीने एकंदरीत वाटचाल अनिश्चित राहण्याचे सूतोवाच केले आहे.
रोजच्या खानपानातील मुख्य घटक असणाऱ्या कडधान्ये आणि खाद्यतेले ह्यांच्या किमतीत मागील वर्षीच्या तुलनेत १२.५४% आणि २०.७८% एवढी मोठी झेप नोंदवण्यात आली आहे. पुढील काही दिवसात रब्बी पिके बाजारात आल्यावर ह्या वाढीस काहीसा आळा शकतो.
भारतातील महागाईचा दार गेल्या काही दिवसात सतत चढा राहिलेला आहे. दिवाळीनंतरच्या काळात उद्योगधंद्यांमध्यें चांगला जोम दिसला आहे आणि खरेदीदारांची पाऊले परत परत बाजारपेठांकडे वळली आहेत. झपाट्याने वाढलेल्या इंधनाच्या किमती, जागतिक मार्केट मधील तेजी
आणि करोनावरील लसीकरण ह्यांचा परिमाण म्हणून खाद्यपदार्थांच्या किमतीत जबरदस्त वाढ दिसून आली. ग्राहक किंमत निर्देशांक फेब्रुवारी २०२१ मध्ये फेब्रुवारी २०२० च्या तुलनेत ५.०३% नी वर गेला. खाद्यपदार्थांच्या किमती साधारण ३.८७% नी वर गेल्या.