आज पोलीस स्मृती दिन!
जनतेचे रक्षण करताना आणि देशासाठी शत्रूशी लढताना प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान देत कर्तव्यनिष्ठेचा आदर्श उभा करणाऱ्या देशभरातील सर्व पोलीस बांधवांना पोलीस स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!!
#Police#पोलीस_स्मृतिदिन
गेल्या १३ वर्षांपासून सुरू असलेल्या आपल्या लढ्याला यश आले आहे! मुंबई उच्च न्यायालयातील खटला आपण जिंकला असून, पुणे येथील भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे!
भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू करून क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या ठिकाणी भारतातील स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली, त्या भिडे वाड्यात सावित्रीबाई फुलेंचे स्मारक उभारण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतल्यानंतर याविरोधात वाड्यातील पोटभाडेकरुंकडून उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. सदर जागेवर दावा करतानाच या ठिकाणी शाळा असल्याचे पुरावे उपलब्ध नसल्याने महापालिकेचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद करण्यात येत होता.
परंतु यासंदर्भात पुणे महापालिकेसमवेत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून आपण उच्च न्यायालयात प्रदीर्घ लढा दिला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत यासंदर्भात वेळोवेळी बैठका घेतल्या, पुण्यामध्ये महापालिका, प्रशासन व विविध विभागांतील अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. यातून न्यायालयातील आपली बाजू आणखी बळकट करण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. मी स्वतः उच्च न्यायालयातील सुनावण्यांना वेळोवेळी उपस्थित राहून या स्मारकाची बाजू भक्कमपणे मांडली. तसेच पुणे महापालिकेच्या वतीने आपल्या प्रयत्नांतून महाराष्ट्राचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ आणि माजी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी देखील अतिशय समर्थपणे बाजू मांडली.
आपल्या आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या या अथक प्रयत्नांना अखेर आज यश आले असून मुंबई उच्च न्यायालयाने स्मारकाविरोधातील याचिका फेटाळली आहे. हा क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांचा विजय असून आता लवकरात लवकर भिडे वाड्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीमाई यांचे स्मारक उभारले जाईल आणि मुलींची शाळा देखील पुनरुज्जीवित करण्यात येईल.
यासाठी देखील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.
#Bhidewada #SavitribaiPhule #JotibaPhule
प्रदीर्घ लढ्यानंतर मिळालेल्या यशाचा आनंद काही औरच असतो! आता भिडे वाड्यात स्त्री शिक्षणासाठी अविरत संघर्ष करणाऱ्या फुले दाम्पत्याचे स्मारक होईपर्यंत आम्ही थांबणार नाही!
लढू आणि जिंकू!
#BhideWada#JotibaPhule#SavitribaiPhule
आज माझ्या जन्मदिनानिमित्त नाशिक येथे माझा अभीष्टचिंतन सोहळा पार पडला.
आजचा हा दिवस विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेच्या माझ्यावरील असीम प्रेमाचा प्रत्यय देणारा ठरला. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. या सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष भेट घेऊन मोठ्या संख्येने लोकांनी माझे अभीष्टचिंतन केले, तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमही राबविण्यात आले.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या जन्मदिनानिमित्त काहीतरी समाजोपयोगी काम घडावे, या विधायक उद्देशाने मी केलेल्या आवाहनाला सर्वांनीच मान दिला. मला शुभेच्छा देण्याकरिता येणाऱ्यांनी शाल, बुके किंवा अन्य कोणत्याही भेटवस्तू न आणता फक्त शालेय वह्या आणण्याचे आवाहन मी केले होते, त्या आवाहनाला सर्वांनी दिलेला उदंड व उत्स्फूर्त प्रतिसाद भारावून टाकणारा आहे. प्रत्येकाने वह्यांच्या स्वरूपात आणलेली ही भेट प्रेमाने स्वीकारली. या वह्या एकत्र करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने माझी वह्यांनी तुला करण्यात आली. या सर्व वह्यांचे गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना वितरण करण्यात येणार आहे.
माझ्या जन्मदिनानिमित्त माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्या प्रत्येकाचा मी मनापासून आभारी आहे.
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी खासदार आणि नाशिकच्या विकासाचे शिल्पकार समीर भुजबळ यांना ५० व्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच पक्षात आणि नाशिकच्या राजकारणात माझ्या बरोबरीने काम करतानाच कुटुंबातील जबाबदाऱ्याही समीर सक्षमपणे सांभाळत आहेत.
नुकत्याच मिळालेल्या मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन जबाबदारीबरोबरच नाशिकला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी तुला निरोगी दीर्घायुष्य लाभो, याच मनापासून सदिच्छा!
@Sameer_Bhujbal
राज्याचे कृषिमंत्री ना. @dhananjay_munde यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात दिवेआगार ता.श्रीवर्धन येथील सुपारी संशोधन केंद्र, गिरणे, ता.तळा येथे खार भूमी संशोधन केंद्र आणि किल्ला, ता.रोहा येथील काढणीपच्छात तंत्रज्ञान व्यवस्थापन महाविद्यालयाचे श्रेणीवर्धन करुन बी.टेक (फुड टेक्नॉलॉजी) महाविद्यालय सुरु करण्याबाबतची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपस्थित राहिले.
श्रीवर्धन येथील दिवेआगर येथे पाच एकर जागेवर सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास त्वरीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी 5 कोटी 64 लाख 31 हजार रुपयांची निधीची तरतूद करण्यात असल्याची माहिती कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी दिली. किल्ला, ता.रोहा येथील काढणीपच्छात तंत्रज्ञान व्यवस्थापन महाविद्यालयाचे श्रेणीवर्धन करुन बी.टेक (फुड टेक्नॉलॉजी) महाविद्यालय सुरु करण्याबाबतचा आराखडा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठ ,दापोली यांनी सादर करावा. तसेच विद्यापिठाला गिरणे, ता.तळा येथे दिलेल्या जागेवर उभारण्याच्या खारभुमी संशोधन केंद्राचा आराखडा तयार करुन मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
हे आराखडे तयार करताना कोकणातील नारळ, सुपारी, आंबा या फळपिका सोबतच विविध प्रकारच्या मसाल्याच्या पिकांचाही संशोधनात समावेश करावा, तसेच श्रीवर्धन रोठा सुपारीला जीआय मानांकन मिळविण्याची कार्यवाहीला गती देण्यात यावी, अशा सूचना यावेळी केल्या.
यावेळी कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषि विद्यापिठाचे अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पर्यटन हे फक्त करमणुकीचं माध्यम नसून तो समृद्धीचा मार्ग आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या, देशातील अनेक महत्त्वाची तीर्थक्षेत्रे असलेल्या आणि पैठणीसारख्या अप्रतिम कलाकुसरीची परंपरा जपणाऱ्या आपल्या नाशिक जिल्ह्याला पर्यायाने राज्याला याच पर्यटनाच्या माध्यमातून आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण सज्ज होऊया!
सर्वांना जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#WorldTourismDay
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच पक्षाच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण,तडफदार नेतृत्व माजी खासदार समीर भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई अध्यक्षपदी निवड झाली, त्याबद्दल त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेच्या हालचाली सुरू होत्या, तेव्हा आमच्या मुंबईतील निवासस्थानी समीर आणि पंकज यांच्यासोबत अनेक तरुण पक्षाचे चिन्ह, नोंदणी,पक्षाची रूपरेषा ठरविणे सभा, बैठका अशा विविध गोष्टींसाठी अथकपणे काम करत होते. नवनव्या कल्पना सुचविण्याचे काम करत होते. राष्ट्रवादी पक्षाची पहिली-वहिली जाहीर बैठक त्यावेळी षण्मुखानंद सभागृहात पार पडली. या बैठकीच्या नियोजनाची सर्व तयारी देखील समीर यांनीच एकहाती अतिशय उत्तम पद्धतीने पार पाडली होती. शिवाजी पार्कवर झालेल्या पक्षाच्या पहिल्या सभेच्या नियोजनाची जबाबदारी देखील समीर यांनी लिलया पार पाडली!
अशा प्रकारे स्थापनेपासूनच पक्षाच्या जडणघडणीत योगदान देणारे समीर आजही सातत्याने पक्ष वाढविण्यासाठी अविरतपणे योगदान देत आहेत. संघटनात्मक कार्यातील किंवा अन्य कोणतीही जबाबदारी चोखपणे पार पाडण्याची त्यांची हातोटी पाहता त्यांच्या नेतृत्वात मुंबईत आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितच आणखी मोठी भरारी घेईल.
त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
@Sameer_Bhujbal
#mumbai #NCP #Maharashtra
त्याबद्दल मी पक्षनेतृत्वाचा मनापासून आभारी आहे. आजवर मा. छगन भुजबळ साहेबांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली पक्षासाठी मी प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करत आलो आहे. पक्षनेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी यापुढील काळातही त्याच निष्ठेने काम करत राहीन व मुंबईमध्ये पक्षसंघटन आणखी बळकट
आज मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत माझी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. माझ्यावर विश्वास ठेऊन मला ही महत्त्वाची संधी दिली,
भारताचे माजी पंतप्रधान, जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ मा. डॉ. मनमोहन सिंह यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान खूप मोठं आहे. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना !
#ManmohanSingh
@AshwiniVaishnaw@narendramodi In vande bharat train, the food served lack tast and the quantity of the food served is not sufficient and also the icecream served was completely melted and was not edible.The pricing of tickit isquite high we expect good service for the price we pay. @IRCTCofficial
In vande bharat train, the food served lack tast and the quantity of the food served is not sufficient and also the icecream served was completely melted and was not edible.The pricing of tickit isquite high we expect good service for the price we pay. @AshwiniVaishnaw
In vande bharat train, the food served lack tast and the quantity of the food served is not sufficient and also the icecream served was completely melted and was not edible.The pricing of tickit isquite high we expect good service for the price we pay. @IRCTCofficial
बहुजन, उपेक्षित वर्गाला शिक्षणाच्या प्रवाहात आणून ज्ञानाची ज्योत अखंड तेवत ठेवणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी खेड्यापाड्यापर्यंत शिक्षण पोहचवले. थोर शिक्षणतज्ज्ञ कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमच्या गणेशोत्सवाच्या आनंदात मलाही सहभागी व्हायला आवडेल. आपल्या घरातील निरोगी बालक, स्वावलंबी महिला आणि तुमचा बाप्पा यांचा एकत्रित फोटो माझ्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर हॅन्डलला टॅग करून शेअर करा. शेअर करताना #बालक_निरोगी_महिला_स्वावलंबी #मोरया #बाप्पा हे हॅशटॅग नक्की वापरा.
#GaneshChaturthi2023 #GaneshaFestival #गणेशचतुर्थी2023 #BappaMorya
गणेशोत्सवासाठी रायगड तालुक्यातील पेण तालुक्यात महिला कारागीरही सुबक गणेश मूर्ती घडवत आहे ते पाहण्यासाठी कारखान्याला भेट दिली. हे महिला सशक्तीकरणाचे उत्तम उदाहरण आहे. याचा संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी https://t.co/iTjB64xC97 या लिंकला भेट द्यावी.