गणेश लांडे उपसरपंच ब्रहानपूर यांनी 3000 वर्क्ष रोपांच्या माध्यमातून आखण्यात आलेल्या बाराखडीतून पंकजा ताईसाहेब यांना वाढदिवसाच्या अनोख्या स्वरूपात शुभेच्छा दिल्या!
@Pankajamunde
माझ्या मतदारसंघातील गाढे पिंपळगाव ता. परळी वैजनाथ जि. बीड येथील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी चैतन्य सुभाष राडकर याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील (CAPF) असिस्टंट कमांडंट पदासाठीच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. त्याची असिस्टंट कमांडंट म्हणून नियुक्ती झाली आहे.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने मिळवलेले हे यश तरूणांसाठी प्रेरणादायी आहे. चैतन्य..तुझे मनःपूर्वक अभिनंदन..!
सह्याद्री अतिथीगृह येथे 'महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन परिषद' आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करणे, नद्यांचा नैसर्गिक प्रवाह जपणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि नदीकाठावरील अतिक्रमण रोखणे या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
परिषदेमार्फत प्रदूषित नद्यांसाठी तातडीने कृती आराखडा (Action Plan) तयार करणे, औद्योगिक प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे, नदीकाठ संवर्धन व वृक्षारोपणाला गती देणे तसेच लोकसहभाग वाढवून दीर्घकालीन धोरण आखण्याबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
नद्यांचे पुनरुज्जीवन व पर्यावरण संवर्धन हेच आमचे ध्येय!
#EnvironmentClimateChange #Environment #RiverConservation #CleanRivers
सह्याद्री अतिथीगृह येथे पशुसंवर्धन विभागाची आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत विभागाच्या विविध योजना, कामकाज आणि प्रलंबित विषयांचा सविस्तर आढावा घेऊन कामाला गती देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
पशुपालक आणि शेतकरी बांधवांचे कल्याण हेच आमचे प्रमुख ध्येय आहे!
#AnimalHusbandry #Maharashtra
#पर्यावरण #पशुसंवर्धन
📍 स्थळ: द ग्रँड थिएटर, NMACC, वांद्रे-कुर्ला संकुल (BKC), मुंबई.
आज मुंबई येथील 'द ग्रँड थिएटर, NMACC' येथे आयोजित 'I.I.M.U.N. Championship Conference 2026' ला उपस्थिती लावली.
या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आदरणीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची विशेष मुलाखत पाहण्याची व त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. राष्ट्रनिर्माण, युवाशक्तीचे योगदान आणि सामाजिक मूल्यांचे जतन यांवर त्यांनी मांडलेला दृष्टिकोन अत्यंत प्रेरणादायी व मार्गदर्शक असा होता.
देशभरातून एकत्र आलेल्या हजारो तरुण प्रतिनिधींचा उत्साह आणि जागतिक विषयांवर त्यांचे विचार मंथन पाहून एका उज्ज्वल व सशक्त भारताचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.
#IIMUN2026 #NMACC #YouthLeadership #Mumbai #NationBuilding #BKC #genz
📍परळी.
आज माझ्या वाढदिवसानिमित्त परळी वैजनाथ येथे मराठी साहित्यातील दिग्गज कवींच्या उपस्थितीत अतिशय सुंदर आणि सुरेल असे 'कवीसंमेलन' उत्साहात पार पडले. या चैतन्यमयी सोहळ्यास उपस्थित राहून शब्दांच्या, विचारांच्या आणि भावनांच्या या अविस्मरणीय मैफिलीचा आनंद लुटता आला.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजींच्या राष्ट्रकार्याला महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री पंकजाताईसाहेब मुंडे यांचे भावनिक समर्थन! ❤️
'देश हाच माझा परिवार' हा केवळ एक शब्द नाही, तर मोदी साहेबांची ती जीवनशैली आहे. याच नि:स्वार्थ कार्यशैलीचा जवळून आलेला अनुभव सांगताना महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री पंकजाताईसाहेब मुंडे अत्यंत भावूक झाल्या. देशाच्या प्रगतीसाठी आणि जनसेवेसाठी असलेले हे निस्सीम समर्पण दर्शवणारा हा खास व्हिडिओ! 🇮🇳
#NarendraModi #ModiFamily #PankajaMunde #RastraSeva #Bjp
@narendramodi@Pankajamunde@BJP4India@BJP4Maharashtra
आज 'श्रद्धानंद गुरुकुल आश्रम' येथे भेट देऊन आश्रमाच्या विविध उपक्रमांची व परिसराची पाहणी केली.
गुरुकुल परंपरेचा समृद्ध वारसा पुढे नेणाऱ्या उपस्थित सर्व आदरणीय संत-महंत आणि मान्यवरांशी सकारात्मक विचारविनिमय केला.
तसेच या प्रसंगी आश्रमातील विद्यार्थ्यांशी अत्यंत मनमोकळा संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी व भविष्यातील ध्येयांबद्दल चर्चा केली.
याप्रसंगी श्री जुगलकिशोरजी लोहीया, स्वामी सोमानंदजी,स्वामी विद्यानंदजी, डॉ. ब्रह्ममुनिजी, श्री आर्यमुनिजी, डॉ. नयनकुमार आचार्य, श्री लक्ष्मण आर्य गुरुजी आदी उपस्थित होते.
संस्कृती, संस्कार आणि ज्ञानाचा वारसा जपणाऱ्या आणि गुरुकुल परंपरा जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि आश्रम परिसरातील पवित्र वातावरण मन प्रसन्न करणारे ठरले.
#श्रद्धानंदगुरुकुलआश्रम #गुरुकुल #विद्यार्थीसंवाद #संस्कृती #आश्रमभेट
"माणुसकी हीच आमची जात,
आणि समता हाच आमचा धर्म!
शोषितांच्या जीवनात प्रकाश आणणे,
हेच आमचे खरे कर्म!"
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती निमित्ताने आज साठे नगर, परळी येथे जयंती उत्सव उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.
आपल्या क्रांतिकारी साहित्यातून आणि धगधगत्या शाहिरीतून कष्टकरी, शोषित आणि वंचित घटकांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या आणि माणुसकीची शिकवण देणाऱ्या महामानव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारप्रणालीचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पावन स्मृतीस आणि विचारांस विनम्र अभिवादन!
याप्रसंगी आमचे बंधू धनंजय मुंडे, पद्मश्री धर्माधिकारी, अजय मुंडे, जुगलकिशोर लोहिया, बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@dhananjay_munde
#AnnabhauSatheJayanti #Parli #लोकशाहीर_अण्णाभाऊ_साठे #परळी #अभिवादन
आज दिनांक ३१/०७/२०२६ 📍बीड
आज बीड जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) अत्यंत महत्त्वाच्या बैठकीच्या निमित्ताने बीड नगरीत आगमन झालेल्या आपल्या लाडक्या नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन अत्यंत उत्साहात आणि मनापासून स्वागत केले! 💐
@Pankajamunde@pmo_munde