💧 स्थानिक नागरिकांच्या पाणीप्रश्नासाठी प्रत्यक्ष पाहणी! 💧
कुर्ला पूर्व, नेहरू नगर येथील धम्मकुटी मार्गावरील इमारत क्र. १२६, १२८, १३४, १३६ तसेच महेश्वर नगर परिसरात कमी दाबामुळे निर्माण झालेल्या पाणीपुरवठ्याच्या समस्येच्या अनुषंगाने महानगरपालिकेमार्फत महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे.
इमारत क्र. १३७, राम सावंत मार्ग येथील ४ इंच जलवाहिनीमधून ६ इंच जलवाहिनीला बूस्टर जोडण्याचे काम सध्या सुरू असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांना लवकरच सुरळीत व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा मिळण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
आज स्थानिक नागरिक व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह संबंधित ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी नागरिकांच्या अडचणी व समस्या महानगरपालिकेच्या जल विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या.
सदर काम येत्या २ ते ३ दिवसांत पूर्ण करून प्रभावित इमारतींना तातडीने सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहे.
जनतेच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरूच राहील.
कामगार नगर येथील ज्येष्ठ नागरिक व आमचे मार्गदर्शक तावडे काका यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या शुभेच्छा व मार्गदर्शन लाभले. यावेळी शाखेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
काल ठरल्याप्रमाणे आज सायंकाळी ७ वाजता कामगार नगर परिसरातील रस्त्यांबाबत नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांच्या अनुषंगाने सर्व पदाधिकारी व स्थानिक नागरिकांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
या पाहणीदरम्यान स्टॉर्म वॉटर ड्रेन म्हणजेच छोट्या गटारांच्या कामांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच कामगार नगरमधील अंतर्गत रस्त्यांवर काही ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने त्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक ठिकाणी होल पाडून संरक्षक जाळ्या बसविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली.
सदर मागणीची दखल घेऊन उद्या महानगरपालिकेचे सहाय्यक अभियंता प्रत्यक्ष पाहणीसाठी येणार आहेत. त्यांच्या निदर्शनास सर्व समस्या व नागरिकांच्या मागण्या आणून देऊन आवश्यक ती कामे तातडीने करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.
जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.
आपला,
गितेश माने
शाखाप्रमुख
#Giteshmane #KamgarNagar #Kurla #Janseva #Shivsena #LocalDevelopment #RoadWork #StormWaterDrain #PublicIssues #Mumbai #CitizenFirst #DevelopmentWork #TeamWork #KurlaVidhansabha #MumbaiDevelopment
आमदार मा. श्री. मंगेश कुडाळकर यांच्या आदेशानुसार आज बाळासाहेब ठाकरे नगर येथील रस्त्यालगत सुरू असलेल्या पदपथाच्या कामाची पाहणी करण्यात आली.
पाहणीदरम्यान काही ठिकाणी झाडांसाठी जागा सोडण्यात आलेली असल्याचे निदर्शनास आले. त्या ठिकाणांची योग्य प्रकारे स्वच्छता करून लाल माती टाकावी, तसेच झाडांच्या मुळांची अधिक चांगल्या प्रकारे जपणूक व संवर्धन करावे, अशा सूचना देण्यात आल्या. याशिवाय अर्धवट राहिलेले पदपथाचे स्टॅम्पिंगचे काम तातडीने पूर्ण करावे व सर्व झाडांच्या परिसरात लाल माती टाकून सुशोभीकरण करावे, असेही सांगण्यात आले.
तसेच कामासाठी वापरण्यात आलेले पाईप, साहित्य व इतर सामान तात्काळ हटवून परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना महानगरपालिका दुय्यम अभियंता श्री. खारटमोल व श्री. माने यांना देण्यात आल्या.
यावेळी परिसरातील स्थानिक नागरिकही उपस्थित होते. नागरिकांच्या सूचना व अपेक्षा जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
आपला
गितेश माने
शाखा प्रमुख
#मंगेशकुडाळकर #शिवसेना #कुर्ला #BalasahebThackerayNagar #DevelopmentWorks #KurlaVidhansabha #GiteshMane #MumbaiDevelopment #PublicWorks #ShivSena
@mlamangesh यांच्या आदेशावरून नेहरू नगर येथील नवरेबाग अपार्टमेंटमधील रहिवासी व सोसायटी पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या विविध नागरी समस्यांची प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी करण्यात आली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी श्री राजेश, श्री प्रदीप घाग व सौ. मनाली सावंत उपस्थित होते. तसेच विधानसभा संघटक श्री संतोष ओव्हाळ, विधानसभा सह-समन्वयक श्री संतोष साळवी, शाखा संघटक श्री भगवान डमरे, श्री प्रभाकर त्रिलोटकर व श्री सुधाकर कारळे यांनीही उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.
आपला,
गितेश माने
शिवसेना शाखा प्रमुख
@mlamangesh यांच्या निर्देशानुसार आज माननीय बाळासाहेब ठाकरे नगर समन्वय समिती कार्यालयात पदाधिकाऱ्यांसमवेत विविध नागरी समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीमध्ये खालील विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली :
🔹 इमारतींच्या कन्व्हेअन्स (Conveyance) विषयक प्रकरणे
🔹 वसाहतीतील पोलिस गस्त व बंदोबस्त वाढविणे
🔹 मोठ्या नाल्यांची तात्काळ साफसफाई करणे
🔹 बंद असलेले पथदिवे सुरू करणे
🔹 सुरू असलेल्या रस्ते कामांच्या ठिकाणी स्वच्छता राखणे
🔹 अपूर्ण फुटपाथची कामे लवकरात लवकर पूर्ण करणे
🔹 वसाहतीलगत असलेल्या मोठ्या नाल्याचे नूतनीकरण करणे
🔹 मोठ्या नाल्यालगत संरक्षक भिंत (Retention Wall) नव्याने बांधणे
या व इतर अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यात आला तसेच काही विषयांचे तत्काळ निराकरण करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना विधानसभा संघटक श्री. संतोष ओव्हाळ, विधानसभा सह-समन्वयक श्री. संतोष साळवी तसेच न्यू म्हाडा कॉलनी समन्वय समितीचे पदाधिकारी श्री. धनंजय मोरे (महासचिव), श्री. संजय निकम (सचिव), श्री. निलेश कदम (खजिनदार), श्री. संतोष खांबे, श्री. शिरीष माने, श्री. नरेंद्र कदम (कार्यकारणी सदस्य) उपस्थित होते.
आपला,
गितेश माने
शिवसेना शाखाप्रमुख
इमारत क्रमांक ११६ येथे पावसाळी गटार साफसफाई करताना इमारतीसमोरील भाग पूर्णपणे चोकअप झाल्याचे निदर्शनास आले.
याची तात्काळ दखल घेत आमदार श्री मंगेश कुडाळकर साहेब यांनी गटाराचा वरचा भाग तोडण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून सदर भाग तोडून आत साचलेला गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांना पावसाळ्यात कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासन सतत कार्यरत आहे. 🙏
आपला,
गितेश माने
शाखाप्रमुख
नवनियुक्त पोलीस उपआयुक्त श्री. गणेश शिंदे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुढील कार्यकाळासाठी @mlamangesh यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
मुंबईतील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम राखत नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी कार्य होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. 🚩
कुर्ल्याच्या मनोरंजनाचा धमाका..
💥💥💥💥💥💥💥💥
मुंबईचा महाउत्सव 'कुर्ला फेस्टिवल २०२६' 🎡
• विविध प्रकारच्या लज्जतदार पदार्थांची मेजवानी
• मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील नामवंत दिग्गज कलाकारांची विशेष उपस्थिती..
दिनांक - १५ मे ते ०७ जून २०२६
वेळ - सायंकाळी ०५ ते रात्री १० वा.
स्थळ - एस. टी. डेपो, शिव सृष्टी रोड, नेहरू नगर कुर्ला (पू.), मुंबई -४०००२४
#MumbaiFestival #KurlaFestival #FunFair #Funactivity #funrides #joyride #mumbaistreetfood #mumbailife #mumbaidiaries #MangeshKudalkar #kurlavidhansabha #tilaknagar #chembur #Shivsena
कुर्ल्याच्या मनोरंजनाचा धमाका..
💥💥💥💥💥💥💥💥
मुंबईचा महाउत्सव 'कुर्ला फेस्टिवल २०२६' 🎡
• विविध प्रकारच्या लज्जतदार पदार्थांची मेजवानी
• मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील नामवंत दिग्गज कलाकारांची विशेष उपस्थिती..
दिनांक - १५ मे ते ०७ जून २०२६
वेळ - सायंकाळी ०५ ते रात्री १० वा.
स्थळ - एस. टी. डेपो, शिव सृष्टी रोड, नेहरू नगर कुर्ला (पू.), मुंबई -४०००२४
#MumbaiFestival #KurlaFestival #FunFair #Funactivity #funrides #joyride #mumbaistreetfood #mumbailife #mumbaidiaries #MangeshKudalkar #kurlavidhansabha #tilaknagar #chembur #Shivsena
मी सकाळी शिवसृष्टी स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाची पाहणी केली असता, तेथील झाडांना नियमित पाणी मिळत नसल्याची गंभीर तक्रार नागरिकांनी केली. हिरवळ जपणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, त्यामुळे ही बाब तातडीने आमदार मंगेश कुडाळकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तत्काळ महानगरपालिकेशी संपर्क साधून झाडांना नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या तत्परतेमुळे आजपासून उद्यानात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध.
#ShivSrushti #tree
कुर्ला, नेहरू नगर प्रभाग क्र. १६९ मध्ये आमदार श्री. मंगेश कुडाळकर साहेब यांच्या आदेशानुसार केदारनाथ मंदिर मार्ग येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या गटार सफाई कामांची पाहणी करण्यात आली.
या पाहणीदरम्यान ज्या ठिकाणी अजूनही कचरा व गाळ साचलेला आढळला, त्या ठिकाणी तात्काळ स्वच्छता मोहीम राबवून पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
नागरिकांना पावसाळ्यात कोणताही त्रास होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आल्या.
कुर्ला पूर्व नेहरू नगर येथील सिटी लाईट बेकरी च्या शेजारील गल्ली मध्ये अदाणी मार्फत अवैद्य केबल टाकल्या आहेत यामुळे शाळकरी लहान मुल पडत आहेत.
अशा अधिकाऱ्यांवर कार्यवाही झाली पाहिजे.
@AshwiniBhide@mybmc@mybmcWardL@Adani_Elec_Mum@MumbaiPolice
‘मुंबई–पुणे मिसिंग लिंक’ हा महाराष्ट्राच्या पायाभूत विकासातील ऐतिहासिक महाप्रकल्प येत्या १ मे, महाराष्ट्र दिनी जनतेच्या सेवेत दाखल होत आहे.
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ आणि शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, दूरदृष्टी आणि प्रत्यक्ष मेहनतीतून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार झाला आहे.
या प्रकल्पामुळे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित व सुलभ होणार असून महाराष्ट्राच्या विकासाच्या चढत्या आलेखात हा प्रकल्प भरीव योगदान देणारा ठरेल. बदलत्या आणि प्रगत महाराष्ट्राची ही नवी ओळख ठरणार आहे. 🚩
#MissingLink #MissingLinkProject #MSRDC #EknathShinde #ShivsenaOfficial
महाराष्ट्राच्या विकासाचा माईलस्टोन, मुंबई–पुणे मिसिंग लिंक! 🚩
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मेपासून मुंबई-पुणे मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुली होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी केली.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबई–पुणे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार असून सुमारे ३० मिनिटांची वेळ बचत होणार आहे. घाटातील धोकादायक वळणे टाळून अधिक सुरक्षित प्रवासासोबत आशियातील सर्वांत मोठ्या बोगद्याचा अनुभवही मिळणार आहे.
मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि विकासाभिमुख भूमिकेमुळे हा प्रकल्प पूर्णत्वास येत असून महाराष्ट्राच्या पायाभूत विकासातील हा ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.
शिवसेना-महायुती सरकार महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. 🚩
@mieknathshinde@Shivsenaofc
#MissingLink #MissingLinkProject #MSRDC #EknathShinde #ShivsenaOfficial
बाळासाहेब ठाकरे नगर, श्रणभर विश्रांती जेष्ठ नागरिक विरंगुळा कट्टा येथे पथदिव्याचे दोन खांब बंद असून, रात्रीच्या वेळी नागरिकांना त्रास होतो. हे लाईट खांब तातडीने दुरुस्त करावेत,ही विनंती. आपल्या सहकार्यांच्या अपॆक्षेत. @mybmcWardL@mybmc@myBESTElectric