नागपूरची राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती खेळाडू अवनी मुकेश बघेल हिच्या अपघाती निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. अवघ्या १७ व्या वर्षी आपल्या कर्तृत्वाने तिने महाराष्ट्राचा गौरव वाढवला होता.
या दुःखाच्या प्रसंगी मी तिच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. या कठीण काळात राज्य शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
अवनीला भावपूर्ण श्रद्धांजली!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी बारामती आणि माळेगाव नगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठका घेतल्या. यावेळी सुरू असलेली, प्रलंबित आणि प्रस्तावित विकासकामांची त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली.
#baramati
'मिशन शक्ती-संबल' अंतर्गत 'वन स्टॉप सेंटर'साठी १ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, केंद्र शासनाचा १००% निधी वितरित करण्यात आला आहे.
हिंसाचारग्रस्त आणि संकटात सापडलेल्या महिलांना वैद्यकीय मदत, कायदेशीर सहाय्य, पोलीस मदत, तात्पुरता निवारा तसेच मानसिक आधार व समुपदेशन अशा सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. संकटात सापडलेल्या महिलांना पुन्हा आत्मविश्वासाने उभे राहण्यासाठी सुरक्षित वातावरण, योग्य मदत आणि नवी दिशा देणारा हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
नातं प्रेमाचं, बंध मायेचा आणि सण भाऊबीजेचा..!
आज आंदर मावळमधील वडेश्वर येथे आयोजित भाऊबीज सोहळ्यात उपस्थित राहून माता-भगिनींच्या ओवाळणीचा स्वीकार केला आणि त्यांच्यासोबत हा सण अत्यंत आनंदाने साजरा केला.
पिंपरी-चिंचवडला राज्यातील सर्वात स्वच्छ शहराचा मान!
‘स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२५-२६’ मध्ये पिंपरी-चिंचवडने महाराष्ट्रातील सर्वोत्तम स्वच्छ शहर म्हणून प्रथम क्रमांक मिळवला आहे. नवी दिल्ली येथे माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदीजी मुर्मू यांच्या हस्ते शहराला हा सन्मान प्रदान करण्यात आला.
शहराच्या सुनियोजित विकासासाठी आदरणीय अजितदादांनी नेहमीच दूरदृष्टीने नियोजन आणि विकासकामांना प्राधान्य दिले आहे. त्याचबरोबर स्वच्छतेसाठी राबवण्यात आलेले विविध उपक्रम, महापालिका प्रशासनाचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यामुळे पिंपरी-चिंचवडने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
हा सन्मान म्हणजे शहराच्या विकासासाठी घेतलेले सामूहिक प्रयत्न आणि स्वच्छतेप्रती असलेल्या बांधिलकीची पावती आहे. या अभिमानास्पद यशासाठी महापालिका प्रशासन, अधिकारी-कर्मचारी, स्वच्छता सेवक आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व नागरिकांचे अभिनंदन!
दुष्काळाच्या संकटाशी सामना करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या सुख-दुःखात सहभागी होत, मतदारसंघातील विविध गावांमध्ये शेतकरी बांधव, माता-भगिनी आणि ग्रामस्थांसोबत भाऊबीजेचा सण साजरा केला.
दुष्काळाच्या कठीण परिस्थितीतही माता-भगिनींनी प्रेमाने केलेले औक्षण आणि दिलेले आशीर्वाद हीच या सणाची खरी भेट ठरली.
#भाऊबीज #शेतकरीबांधव #दुष्काळ
निसर्गसौंदर्याने नटलेल्या आपल्या कोकणची जागतिक स्तरावर आनंदाची भरारी!
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत श्रीवर्धन ठरला महाराष्ट्रातील पहिला 'ब्लू फ्लॅग' बीच, तर सोबतच गुहागर आणि लाडघर किनाऱ्यांनाही मिळाला आंतरराष्ट्रीय 'फायनल ब्लू फ्लॅग अवॉर्ड'! कोकणच्या विकासाची आणि सौंदर्याची ही शान अशीच वाढो.
#shriwardhan #raigad #blueflagbeach #adititatkare #kokan #maharashtra
सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहणारे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, पद्मभूषण वसंतदादा पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
सहकाराच्या विचारांतून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा त्यांचा दृष्टिकोन महाराष्ट्राच्या प्रगतीच्या वाटचालीत नेहमीच मोलाचा ठरला.
मौलाना अबुल कलाम आझाद यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात दिलेले मोलाचे योगदान, राष्ट्रीय एकात्मतेसाठी केलेले अथक प्रयत्न आणि शिक्षण क्षेत्राच्या उभारणीत बजावलेली ऐतिहासिक भूमिका सदैव प्रेरणादायी आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच भारतात आधुनिक, सर्वसमावेशक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणव्यवस्थेची पायाभरणी झाली. देशभक्ती, धर्मनिरपेक्षता, बंधुता आणि प्रगतिशील विचारांची ज्योत आयुष्यभर प्रज्वलित ठेवणारे देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या 138व्या जयंती निमित विनम्र आदरांजली!
राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या शुभेच्छा!
#NationalEducationDay #MaulanaAbulKalamAzad
दिवाळीचा पाडवा.. पण यंदा दादा सोबत नाहीत, ही उणीव प्रत्येक क्षणी जाणवतेय..!
आदरणीय अजितदादांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बारामती सनसेट पॉईंटवर यंदा बारामतीकरांनी एकत्र येत ‘चला, एक पणती घेऊन या...’ या उपक्रमातून दादांच्या स्मृतींना उजाळा दिला. या उपक्रमाला उपस्थित राहून बारामतीकरांशी संवाद साधला.
प्रत्येक पणतीच्या प्रकाशात दादांच्या आठवणी होत्या, त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता होती आणि त्यांनी दिलेल्या प्रेमाची जाणीव होती. दादा आज आपल्यात नसले, तरी बारामतीच्या मातीशी, इथल्या माणसांशी आणि प्रत्येकाच्या मनाशी त्यांचं नातं कायम आहे. हा जिव्हाळा, हे प्रेम आणि या आठवणीच माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद आहे.
दादा, तुमची उणीव कधीच भरून निघणार नाही... पण तुम्ही दिलेला प्रकाश असाच कायम तेवत ठेवण्याचा प्रयत्न करत राहीन..!
आज सहयोग निवासस्थान, बारामती येथे माळेगाव नगरपंचायत क्षेत्रातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी माळेगाव येथे सुरू असलेल्या तसेच प्रलंबित विकासकामांची सविस्तर माहिती घेतली. ही कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माळेगाव येथील पाणीपुरवठ्याचाही विशेष आढावा घेतला. नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन व्हावे आणि पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
माळेगावच्या सर्वांगीण विकासासोबतच नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देऊन विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, अशा सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
📍 सहयोग निवासस्थान, बारामती
बारामती आणि माळेगावच्या विकासकामांना गती देण्यासाठी आढावा बैठक घेतली. नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांना प्राधान्य देत आवश्यक सूचना दिल्या.
📍 सहयोग निवासस्थान, बारामती
स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२५-२६
नवी मुंबई देशात अव्वल; महाराष्ट्रातील पाच शहरांचा गौरव!
स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२५-२६ मध्ये महाराष्ट्राने उल्लेखनीय कामगिरी करत देशपातळीवर आपला ठसा उमटवला आहे. भारताच्या महामहिम राष्ट्रपती मा. श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात नवी मुंबई शहराला देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहराचा प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला आहे.
यासोबतच विटा (जि. सांगली) शहराने २० हजार ते ५० हजार लोकसंख्या गटात प्रथम, पाचगणी (जि. सातारा) शहराने २० हजारांपेक्षा कमी लोकसंख्या गटात द्वितीय, रत्नागिरीने स्वच्छ कोस्टल टाऊन श्रेणीत तृतीय, तर पिंपरी-चिंचवडने महाराष्ट्रातील सर्वोत्तम स्वच्छ शहराचा बहुमान पटकावला आहे.
महाराष्ट्राचा गौरव वाढवणाऱ्या या पाचही शहरांचे, स्वच्छता मोहिमेत मोलाचे योगदान देणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आणि संबंधित सर्व विभागांचे अभिनंदन!
#cleancity #स्वच्छसर्वेक्षण
भारतीय नेमबाजांची जागतिक स्तरावर सुवर्ण भरारी!
ISSF जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत ईशा सिंग, मनू भाकर आणि दिव्या सुब्बाराजू यांनी महिलांच्या २५ मीटर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकत भारताला मोठे यश मिळवून दिले आहे.
जागतिक स्तरावरील या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दाखवलेले कौशल्य, चिकाटी आणि सांघिक भावना कौतुकास्पद आहे. त्यांच्या या विजयामुळे भारतीय क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ईशा, मनू आणि दिव्या यांच्या या यशाचा मनापासून आनंद आणि अभिमान आहे. तिघींचेही हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!
महाराष्ट्राच्या पर्यटनाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणारी अभिमानास्पद बातमी!
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर व लाडघर या कोकणातील तीन सुंदर समुद्रकिनाऱ्यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय ‘ब्लू फ्लॅग’ पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे, श्रीवर्धन हा महाराष्ट्रातील पहिला ‘ब्लू फ्लॅग’ पुरस्कार प्राप्त करणारा समुद्रकिनारा ठरला आहे.
स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सुरक्षितता आणि पर्यटनाच्या उत्तम सुविधांच्या निकषांवर मिळालेला हा सन्मान म्हणजे कोकणच्या निसर्गसौंदर्याची जागतिक स्तरावर उमटलेली मोहोर आहे. या यशासाठी योगदान देणारे सर्व अधिकारी, स्थानिक नागरिक आणि सहकाऱ्यांचे अभिनंदन!
शेतकऱ्यांच्या बांधावर मा. सुनेत्रावहिनी यांनी पिठलं-भाकरीच्या घासातून जपली आपुलकी!
दिवाळी भाऊबीजेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी बारामती तालुक्यातील मूर्टी व परिसरातील गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी शेतकरी बांधवांसोबत शेतातच पिठलं-भाकरीचा आस्वाद घेत त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत आपुलकीने संवाद साधला.
यावेळी दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, पिकांची सद्यस्थिती आणि शेतीविषयक अडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नांवर आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा, यासाठी चारा बियाण्यांच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले.
शेतकरी बांधवांच्या प्रत्येक अडचणीत शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, त्यांना आवश्यक ती मदत आणि दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
📍 मूर्टी, बारामती
#farmers #sunetravahini #bhaubeej
मा. सुनेत्रावहिनी यांनी आदरणीय अजितदादांच्या लाडक्या शेतकरी बहिणींशी संवाद साधला!
दिवाळी भाऊबीजेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी जोगवडी आणि अंबी बुद्रुक, बारामती येथे शेतकरी बांधव आणि आदरणीय अजितदादांच्या लाडक्या शेतकरी भगिनींची भेट घेतली. यावेळी त्यांनी दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि शेतकरी कुटुंबांसमोरील आर्थिक अडचणी जाणून घेतल्या.
शेतकऱ्यांच्या कष्टांची आणि त्यांच्या व्यथांची जाणीव ठेवत त्यांनी शासनाकडून मिळालेल्या अग्रीम मदतीबाबत विचारपूस केली. विशेषतः शेतकरी भगिनींशी त्यांनी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि व्यथा समजून घेतल्या. आदरणीय अजितदादांनी जपलेले शेतकरी बांधवांशी आणि लाडक्या बहिणींशी असलेले जिव्हाळ्याचे नाते पुढे नेत मा. सुनेत्रावहिनी यांनी त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत आपुलकीचा विश्वास दिला.
शेतकरी बांधवांना या संकटातून दिलासा मिळावा आणि त्यांच्या प्रश्नांवर योग्य तोडगा निघावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-महायुती सरकार कटिबद्ध आहे.
📍 बारामती