#परभणी मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळावर राज्य शासनाकडून वेळीच उपाययोजना करण्यात येत असून, जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या आवर्तनाचे पा��ी परभणी जिल्ह्यात सिंगणापूर - बोरवंड परिसरातील कालव्यात पोहचले आहे. या पाण्यामुळे ऊस, तूर, ज्वारी आदी पिकांना या आवर्तनाचा लाभ मिळणार आहे.
अकोला शहरात एकीकडे भीषण पाणी टंचाई असताना दुसरीकडे वाटर सर्व्हिसिंग वाले खुशाल उधळपट्टी करताना दिसतात.जिल्हा प्रशासनाला केराची टोपली फेकून मारणारे हे लो��� व त्याला आर्थिक साटलोट करून अभय देणारे जिल्हा प्रशासन खरच किती ग्रेट म्हणावे लागेल.तिसरीकडे राज्य सरकारने मोर्णा ते महान २५.२० किलोमीटर साठी तब्बल १३२ कोटी रुपयांचा टंचाई निवारण आराखडा मंजुर करून ४४ नवे टँकर विकत घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जात असल्याचेही समोर येत आहे.सगळ कस गोलमाल आहे ना 😀#धन्य आहात सगळे
शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी सहकाराचा मार्ग दाखवणारे, ग्रामीण भागाच्या विकासाला नवी दिशा देणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, पद्मभूषण वसंतदादा पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
सहकारी साखर कारखाने, कृषी क्षेत्र आणि ग्रा��ीण विकासाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आर्थिक वाटचालीला गती देण्यात सहकारमहर्षी वसंतदादांचे मोलाचे योगदान राहिले. त्यांचे कार्य आणि विचार कायम सहकार क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरतील.
Chaired the Standing Committee meeting on #PetroleumandNaturalGas, Lok Sabha, reviewing ongoing Oil PSU projects with senior officials of the Ministry, Oil PSUs and Maharashtra Govt. departments, including Industries, Environment, Labour, MIDC and MPCB.
युवा ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंचा सुवर्णमय पराक्रम!
डाकार २०२६ युवा ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा तिरंगा अभिमानाने उंचावणाऱ्या गुंजन आणि लैरेंलकपम अंबेकर मीतेई यांचे अभिनंदन!
गुंजनने महिलांच्या ४८ किलो वजनी गटात ५-० असा शानदार विजय मिळवला, तर लैरेंलकपम अंबेकर मीतेईने पुरुषांच्या ५० किलो वजनी गटात ३-२ असा रोमांचक विजय नोंदवला. विशेष म्हणजे, युवा ऑलिम्प���कमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ��ॉक्सर ठरल्या आहेत.
दोघांच्या या उल्लेखनीय कामगिरीने भारतीय बॉक्सिंगच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
#youtholympics
शेतकऱ्यांच्या कष्टांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे. रब्बी हंगाम २०२६-२७ साठी पुणे जिल्ह्यात सात पिकांची विमा नोंदणी सुरू झाली असून, शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करून नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून संरक्षण मिळवावे.
नागपूरची राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती खेळाडू अवनी मुकेश बघेल हिच्या अपघाती निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. अवघ्या १७ व्या वर्षी आपल्या कर्तृत्वाने तिने महाराष्ट्राचा गौरव वाढवला होता.
या दुःखाच्या प्रसंगी मी तिच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. या कठीण काळात राज्य शासन त्यांच्���ा पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
अवनीला भावपूर्ण श्रद्धांजली!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी बारामती आणि माळेगाव नगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठका घेतल्या. यावेळी सुरू असलेली, प्रलंबित आणि प्रस्तावित विकासकामांची त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली.
#baramati
'मिशन शक्ती-संबल' अंतर्गत 'वन स्टॉप सेंटर'साठी १ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, केंद्र शासनाचा १००% निधी वितरित करण्यात आला आहे.
हिंसाचारग्रस्त आणि संकटात सापडलेल्या महिलांना वैद्यकी��� मदत, कायदेशीर सहाय्य, पोलीस मदत, तात्पुरता निवारा तसेच मानसिक आधार व समुपदेशन अशा सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. संकटात सापडलेल्या महिलांना पुन्हा आत्मविश्वासान�� उभे राहण्यासाठी सुरक्षित वातावरण, योग्य मदत आणि नवी दिशा देणारा हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
नातं प्रेमाचं, बंध मायेचा आणि सण भाऊबीजेचा..!
आज आंदर मावळमधील वडेश्वर येथे आयोजित भाऊबीज सोहळ्यात उपस्थित राहून माता-भगिनींच्या ओवाळणीचा स्वीकार केला आणि त्यांच्यासोबत हा सण अत्यंत आनंदाने साजरा केला.
पिंपरी-चिंचवडला राज्यातील सर्वात स्वच्छ शहराचा मान!
‘स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२५-२६’ मध्ये पिंपरी-चिंचवडने महाराष्ट्रातील सर्वोत्तम स्वच्�� शहर म्हणून प्रथम क्रमांक मिळवला आहे. नवी दिल्ली येथे माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदीजी मुर्मू यांच्या हस्ते शहराला हा सन्मान प्रदान करण्यात आला.
शहराच्या सुनियोजित विकासासाठी आदरणीय अजितदादांनी नेहमीच दूरदृष्टीने नियोजन आणि विकासकामांना प्राधान्य दिले आहे. त्याचबरोबर स्वच्छतेसाठी राबवण्यात आलेले विविध उपक्रम, महापालिका प्रशासनाचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि नागरिकांचा सक्र��य सहभाग यामुळे पिंपरी-चिंचवडने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
हा सन्मान म्हणजे शहराच्या विकासासाठी घेतलेले सामूहिक प्रयत्न आणि स्वच्छतेप्रती असलेल्या बांधिलकीची पावती आहे. या अभिमानास्पद यशासाठी महापालिका प्रशासन, अधिकारी-कर्मचारी, स्वच्छता सेव�� आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व नागरिकांचे अभिनंदन!
दुष्काळाच्या संकटाशी सामना करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या सुख-दुःखात सहभागी होत, मतदारसंघातील विविध गावांमध्ये शेतकरी बांधव, माता-भगिनी आणि ग्रामस्थांसोबत भाऊबीजेचा सण साजरा केला.
दुष्काळाच्या कठीण परिस्थितीतही माता-भगिनींनी प्रेमाने केलेले औक्षण आणि दिलेले आशीर्वाद हीच या सणाची खरी भेट ठरली.
#भाऊबीज #शेतकरीबांधव #दुष्काळ
निसर्गसौंदर्याने नटलेल्या आपल्या कोकणची जागतिक स्तरावर आनंदाची भरारी!
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत श्रीवर्धन ठरला महाराष्ट्रातील पहिला 'ब्लू फ्लॅग' बीच, तर सोबतच गुहागर आणि लाडघर किनाऱ्यांनाही मिळाला आंतरराष्ट्रीय 'फायनल ब्लू फ्लॅग अवॉर्ड'! कोकणच्या विकासाची आणि सौंदर्याची ही शान अशीच वाढो.
#shriwardhan #raigad #blueflagbeach #adititatkare #kokan #maharashtra
सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी दे���ारे, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहणारे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, पद्मभूषण वसंतदादा पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
सहकाराच्या विचारांतून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा त्यांचा दृष्टिकोन महाराष्ट्राच्या प्रगतीच्या वाटचालीत नेहमीच मोलाचा ठरला.
मौलाना अबुल कलाम आझाद यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात दिलेले मोलाचे योगदान, राष्ट्रीय एकात्मतेसाठी केलेले अथक प्रयत्न आणि शिक्षण क्षेत्राच्या उभारणीत बजावलेली ऐतिहासिक भूमिका सदैव प्रेरणादायी आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच भारतात आधुनिक, सर्वसमावेशक आणि गुणवत्ता���ूर्ण शिक्षणव्यवस्थेची पायाभरणी झाली. देशभक्ती, धर्मनिरपेक्षता, बंधुता आणि प्रगतिशील विचारांची ज्योत आयुष्यभर प्रज्वलित ठेवणारे देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या 138व्या जयंती निमित विनम्र आदरांजली!
राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या शुभेच्छा!
#NationalEducationDay #MaulanaAbulKalamAzad
दिवाळीचा पाडवा.. पण यंद��� दादा सोबत नाहीत, ही उणीव प्रत्येक क्षणी जाणवतेय..!
आदरणीय अजितदादांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बारामती सनसेट पॉईंटवर यंदा बारामतीकरांनी एकत्र येत ‘चला, एक पणती घेऊन या...’ या उपक्रमातून दादांच्या स्मृतींना उजाळा दिला. या उपक्रमाला उपस्थित राहून बारामतीकरांशी संवाद साधला.
प्रत्येक ��णतीच्या प्रकाशात दादांच्या आठवणी होत्या, त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता होती आणि त्यांनी दिलेल्या प्रेमाची जाणीव होती. दादा आज आपल्यात नसले, तरी बारामतीच्या मातीशी, इथल्या माणसांशी आणि प्रत्येकाच्या मनाशी त्यांचं नातं कायम आहे. हा जिव्हाळा, हे प्रेम आणि या आठवणीच माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद आहे.
दादा, तुमची उणीव कधीच भरून निघणार नाही... पण तुम्ही दिलेला प्रकाश असाच कायम तेवत ठेवण्याचा प्रयत्न करत राहीन..!
आज सहयोग निवासस्थान, बारामती येथे माळेगाव नगरपंचायत क्षेत्रातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी माळेगाव येथे सुरू असलेल्या तसेच प्रलंबित विकासकामांची स��िस्तर माहिती घेतली. ही कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माळेगाव येथील पाणीपुरवठ्याचाही विशेष आढावा घेतला. नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन व्हावे आणि पाणीटंचाईचा सामना करावा लाग��� नये, यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
माळेगावच्या सर्वांगीण विकासासोबतच नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देऊन विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, अशा सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
📍 सहयोग निवासस्थान, बारामती