मराठी साहित्याला पहिल्या 'ज्ञानपीठ पुरस्कारा'चा बहुमान मिळवून देणारे श्रेष्ठ साहित्यिक, विचारवंत 'ययाति'कार वि. स. खांडेकर यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! 💐
संतुलित आहार, निरोगी आरोग्याचा खरा आधार!
सशक्त आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीसाठी योग्य पोषण ही मूलभूत गरज आहे. दैनंदिन आहारात पोषक घटकांचा समावेश करूया, कुपोषणाला दूर ठेवूया आणि निरोगी जीवनशैलीची सुरुवात स्वतःपासून करूया.
राष्ट्रीय पोषण सप्ताहाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
गर्जला अमर शाहिरी बाणा,
जागवला ज्यांनी कष्टकऱ्यांचा स्वाभिमान!
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बुलंद आवाज, थोर लोकशाहीर अमर शेख यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या क्रांतीमय स्मृतीस त्रिवार वंदन! 💐🙏
रेशमी धागा, प्रेमाची साद,
कधी खोडकर भांडण, कधी गोड संवाद...
नात्याची ही वीण राहो अशीच खास,
आयुष्यभर पुरेल विश्वासाचा हा सहवास!
रक्षाबंधन निमित्त खूप खूप शुभेच्छा!
माटुंगा लेबर कॅम्प येथील २ कुटुंबांसाठी स्थानिक नगरसेविका सौ. हर्षला आशिष मोरे यांच्या विशेष पुढाकारातून पक्के व सुरक्षित घर बांधण्याच्या कामास सुरुवात!
नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी सदैव कटिबद्ध!
माटुंगा लेबर कॅम्पमधील अनियमित पाणी व खंडित वीजपुरवठ्याची दखल घेत नगरसेविका सौ. हर्षला आशिष मोरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित प्रशासनाला तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले.
नागरिकांच्या समस्यांसाठी सदैव तत्पर!
माटुंगा लेबर कॅम्प येथे लादीकरण, गटर दुरुस्ती व पुनर्बांधणी अशा विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
स्थानिक नगरसेविका सौ. हर्षला आशिष मोरे यांच्या विशेष प्रयत्नांतून नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी विकासकामांना सुरुवात! परिसराच्या प्रगतीसाठी सदैव कटिबद्ध.
खेळाची मैदाने वाचवण्यासाठी मुंबईकरांचा बुलंद एल्गार! वांद्रे येथील नेव्हिल डिसोझा फुटबॉल मैदानावर युवासेनाप्रमुख मा. श्री. आदित्य साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘तिरंगा आंदोलन’ करण्यात आले. क्रीडांगणे नफेखोरांचा सौदा नव्हे; हा लढा मैदाने वाचवण्यासाठी असाच सुरू राहील!
खेळाची मैदाने आमचा हक्क आहेत, नफेखोरांचा सौदा नव्हे!
मुंबईची मैदाने वाचवण्यासाठी आता आवाज उठवूया! मुलांचे भविष्य आणि क्रीडासंस्कृती जपण्यासाठी तिरंगा आंदोलन 🇮🇳
२३ ऑगस्ट २०२६
सायं. ५ वा.
नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदान, वांद्रे (प.)
मोठ्या संख्येने सहभागी व्हा!
तीन रंगांत सजलाय आज आसमंत सारा,
अभिमानाने फडकत राहो तिरंगा आमचा प्यारा!
विविधतेत एकता हीच भारताची शान,
साऱ्या विश्वात उंच राहू दे देश आमचा महान!
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🇮🇳✨
क्षमाशीलता, आत्मचिंतन आणि नव्या सकारात्मक सुरुवातीचा संदेश देणाऱ्या पतेतीच्या पवित्र दिनानिमित्त सर्वांच्या जीवनात सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि समृद्धी नांदो. पारशी समाजाच्या समृद्ध संस्कृती, परंपरा आणि समाजहिताच्या अमूल्य योगदानाला मनःपूर्वक अभिवादन.
पतेतीच्या हार्दिक शुभेच्छा!
आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त देशाच्या प्रगतीची ऊर्जा, नव्या विचारांची ताकद आणि उज्ज्वल भविष्याची आशा असणाऱ्या सर्व युवक-युवतींना मनःपूर्वक शुभेच्छा!
युवाशक्तीच्या कर्तृत्वातून सक्षम, प्रगत आणि समृद्ध भारत घडत राहो, हीच सदिच्छा.
धारावी ट्रांझिट कॅम्प येथील मनपा शाळेला मा. आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन पाहणी केली. नगरसेविका सौ. हर्षला आशिष मोरे यांनी विद्यार्थ्यांना गणवेश, बूट व स्टेशनरी वेळेवर न मिळण्याच्या समस्या निदर्शनास आणल्या.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि सुविधांसाठी पाठपुरावा कायम सुरू राहील.
नगरसेविका सौ. हर्षला आशिष मोरे यांच्या पुढाकाराने माटुंगा लेबर कॅम्प येथे ‘पावसाळी आजार तपासणी व वैद्यकीय शिबिर’ यशस्वीरीत्या पार पडले. नागरिकांची विनामूल्य आरोग्य तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन देण्यात आले.
मराठी नाट्यसृष्टीला नवी दिशा देणारे युवा नेतृत्व!
मराठी नाट्य संस्थेच्या अध्यक्षपदी राहुल भंडारे यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
आपल्या नेतृत्वातून रंगभूमीचा वारसा समृद्ध होवो आणि नवोदित कलाकारांना नवी संधी मिळो, हीच सदिच्छा.
“नामा म्हणे, ध्यानी ध्यावा विठोबासी; अखंड मानसी भजा देवा।”
आपल्या अभंगवाणीतून भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश जनमानसात रुजविणारे थोर वारकरी संत श्री संत नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
निसर्गाशी अतूट नाते जपत, आपली संस्कृती, परंपरा आणि अस्मिता पिढ्यान्पिढ्या जपणाऱ्या आदिवासी बांधवांचे देशाच्या सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीत अमूल्य योगदान आहे.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्व आदिवासी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!
जनतेच्या विश्वासाला विकासकामांची भक्कम जोड!
प्रभाग क्र. १८९ मध्ये नगरसेविका सौ. हर्षला आशिष मोरे यांच्या हस्ते विविध लोकहितकारी विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. दर्जेदार नागरी सुविधा, मूलभूत सोयी आणि सर्वांगीण विकासासाठी आमची वचनबद्धता कायम राहील.
प्रतिसरकारचे प्रणेते, स्वातंत्र्यसैनिक क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
त्यांच्या अदम्य धैर्य, त्याग आणि राष्ट्रसेवेचा वारसा प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणादायी राहील.
अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेनिमित्त मनःपूर्वक वंदन. गुरुंचे मार्गदर्शन, संस्कार आणि आशीर्वाद आपल्या जीवनाला सदैव प्रेरणा व सामर्थ्य देत राहो.
सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!