१५ सेकंदांच्या reels च्या काळात focus वाढवायचा आहे?
तर लांब स्वरूपाचं (long-form) एखाद पुस्तक नक्की वाचा. 📚
ते तुमच्या मेंदूला दीर्घकाळ लक्ष केंद्रित ठेवायला ट्रेन करतं. 🧠
#books#Focus
अरुणाचल प्रदेशमधून समोर आलेल्या एका व्हायरल व्हिडिओने दे���भरातील नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. खेळात रमलेली चिमुकली मुले अचानक थांबून भारतीय लष्कराच्या ताफ्याला आदराने सलाम करत “जय हिंद”चा जयघोष करत आहेत.
#ArunachalPradesh #IndianArmy #JaiHind #Patriotism #ViralVideo
“सातारा कोर्टात जेठमलानी”
दिवाळीच्या “जत्रे”त हास्या���े भूसनळे आणि
टाळ्यांचे आपटबार!
— विश्वास पाटील
मुख्यमंत्री वसंतदादा पैलवान गुलाबराव माने भाऊंना म्हणाले,
“मी आता महाराष्ट्रात पाच-सहा जणांना इंजिनिअरिंग कॉलेज काढायची परवानगी देतोय. तू एक अप्लिकेशन दे, झटकन मंजुरी देऊन टाकतो.”
“दादा, लक्ष्मीच्या टांकसाळीपेक्षा इज्जतीला महत्त्व देणारा मी कार्यकर्ता आ��े. मला त्या चिंगटे वकिलाचं नाक कापायचं आहे.”
“अरे पण बाळ, एका डिस्ट्रिक्ट कोर्टात जेठमलानीसारखा वकील येईलच कसा?”
“दादा, तुम्ही आवाज दिला की वाघाचाही ससा बनतो, असं बाहेर लोक बोलतात. त्यापुढे जेठमलानी हाय काय नाय काय! तुम्ही नुसतं मनावर घ्या.”
आणि शेवटी सेरेमोनियस अपिअरन्ससाठी का होईना, जेठमलानी सातारा कोर्टात आले. चार दशकांपूर्वी घडून गेलेल्या त्या जिद्दीच्या जलव्याच्या पोटातील हास्याचे उमाळे आणि टाळ्यांचे भूसनळे!
माझी ही धमाल विनोदी कथा मेनका प्रकाशनाच्या या वर्षीच्या “जत्रा”च्या दिवाळी अंकात जरूर वाचा.
— विश्वास पाटील
@jatraofficial @marathi_sahitya
#VishwasPatil #JatraDiwaliAnk #MenakaPrakashan #MarathiLiterature #MarathiStory #HumorStory #SataraCourt #Jethmalani #MarathiReading #DiwaliSpecial #MarathiWriter #LaughterAndApplause #MustRead #MarathiCulture #ClassicMarathi #VishwasPatilWritings #MarathiSahitya #DiwaliEdition #MenakaJatra #MarathiKatha
“पुण्यनगरी”च्या कार्यालयात “ग्रेट कांचना”चा बहारदार प्रकाशन समारंभ.
नुकताच पुण्यात पुण्यनगरीच्या कार्यालयामध्ये माझ्या “द ग्रेट कांचना सर्कस” या कादंबरीचा प्रकाशन सोहळा पार पडला. गेली वर्षभर पुण्यनगरीच्या गुरुवार आणि रविवारच्या अंकात कांचना धारावाहिक स्वरूपात प्रकाशित होत होती. तिला महाराष्ट्रातील लाखोच्या वाचक संख्येने ज्या उत्साहाने आणि प्रेमाने डोक्यावर घेतले, त्याबद्दल मी सर्वांचाच ऋणी आहे.
या कार्यक्रमास प्रकाशक मॅजेस्टिक प्रकाशनचे अशोक कोठावळे , तसेच पुण्यनगरीचे राजकीय संपादक उदय दादा तानपाठक, साहित्य परिषदेचे मिलिंद जोशी, पुणे आवृत्तीचे साबळे साहेब तसेच अनेक रसिक वाचक उपस्थित होते. एका वृत्तपत्राने मराठी साहित्याला दिलेला हा पुरस्कार, याचे सर्वांनीच अनुकरण करावे असा आहे. सहकार्याबद्दल सर्वांचेच आभार.
@punyanagari
#VishwasPatil #Punyanagari #GreatKanchana #BookLaunch #MajesticPublication #MarathiLiterature #KanchanaNovel #BestSeller #MarathiSahitya #LiteraryEvent #PuneLiteraryScene #BookLovers #AuthorLife #NewRelease #MarathiBooks