आज जग जीवनशैलीतून निर्माण होणाऱ्या आजारांचा सामना करत आहे.
२०२१ मध्ये असंसर्गजन्य आजारांमुळे जगभरात ४.३८ कोटी मृत्यू झाले. १.७३ अब्ज निरोगी आयुष्याची वर्षे वाया गेली. २०५० पर्यंत हा आकडा ७.५५ कोटींपर्यंत जाण्याचा धोका आहे.
गेल्या दशकात हेच दिसून आले — बदललेली जीवनशैली हेच या आजारांचे मूळ कारण आहे.
टाइप २ मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार, मूत्रपिंडाचे विकार आणि फॅटी लिव्हर... ही यादी आता प्रत्येक घरात पोहोचली आहे.
यावर उत्तर एकच — आजारांवर प्रतिबंध आणा!प्रतिबंधासाठी खरी साथ मिळते ती 'आहारतज्ज्ञाची'!.
सकस आहार ठेवला तर आजार दूर ठेवता येतात! नियंत्रणात राहतात...
याच गरजेतून १३ मे २०२६ रोजी मुंबईतील परळच्या ग्लेनीगल्स हॉस्पिटलमध्ये 'इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ डायटिशियन्स फॉर मेटाबॉलिक हेल्थ अँड न्यूट्रिशन' (IADMN) ची स्थापना झाली आहे.
ध्येय :
• आहारतज्ज्ञांना उपचार प्रक्रियेत मध्यवर्ती स्थान मिळवून देणे.
• पुराव्यावर आधारित उपचारांना चालना देणे.
• विशेष प्रशिक्षण आणि जागतिक दर्जाची प्रतिष्ठा निर्माण करणे.
• प्रतिबंधात्मक पोषणाला प्राधान्य देणे.
कारण योग्य आहार आणि योग्य जीवनशैली असेल, तरच या जीवघेण्या आजारांना आपण रोखू शकतो.
हे पाऊल केवळ एका संघटनेची निर्मिती नाही — हा निरोगी भारताच्या पायाभरणीसाठी घेतलेला दूरदर्शी निर्णय आहे.
परिचयातल्या सर्व डॉक्टरांना शुभेच्छा!
#LifestyleDiseases #NonCommunicableDiseases #mumbai #healthyeating #HealthMatters
@PMOIndia@narendramodi@MoHFW_INDIA@JPNadda@IADMNOFFICIAL