@SamsungIndia ended up with the colour Titanium grey. And was disappointed with this inconvenience when you pre booked something and you won't get what you want.
Saddest experience
@SamsungMobile#SamsungGalaxyS25Ultra
@SamsungIndia
Not good experience.
I pre-booked a samsung galaxy s25 ultra titanium jetblack 10 days ago from a samsung store.
Today it was last day for pre booking benefits. But the special colour titanium jetblack was not in stock at store. So ended up with Titanium grey.
@SamsungIndia ended up with the colour Titanium grey. And was disappointed with this inconvenience when you pre booked something and you won't get what you want.
Saddest experience
@SamsungMobile#SamsungGalaxyS25Ultra
@SamsungIndia
Not good experience.
I pre-booked a samsung galaxy s25 ultra titanium jetblack 10 days ago from a samsung store.
Today it was last day for pre booking benefits. But the special colour titanium jetblack was not in stock at store. So ended up with Titanium grey.
राज साहेबांसारखा सारथी असेल तर आमच्या रथी चा विजय हा निश्चित आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे इंजिन या चिन्हावर आपलं मत देऊन मनसे च्या सर्व उमेवारांना भरघोस मतांनी विजयी करा.
@RajThackeray@rajupatilmanase@mnsadhikrut
There is no network for my MTNL sim from the last 2 days, I don't have a number to connect with the dedicated department. What is the issue going on. I'm missing my important calls and OTPs
It's time to switch
@MTNLOfficial@MTNLMbiOfficial@TRAI
लोकसभेची निवडणूक जाहीर झाली, ही संधी ५ वर्षातून एकदाच येते, आता तुमच्या भावना मतपेटीतून व्यक्त करा.. अघोरी राजकारण वठणीवर आणा !
#लोकसभा_निवडणूक#मतदार#राजकारण
मुंबई प्रवेशाच्या पाचही टोलनाक्यावर केलेल्या टोलवाढीविरोधात माझे सहकारी श्री. अविनाश जाधव ह्यांनी व माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी उपोषण केलं... आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर मी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली... त्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :
▪️ मुंबई प्रवेशाच्या पाचही नाक्यावरच्या टोलवाढी विरोधात माझा सहकारी श्री. अविनाश जाधव व माझे महाराष्ट्र सैनिक उपोषणाला बसले आहेत कळल्यावर मी अविनाशला कळवलं "उपोषण वगैरे करणं आपलं काम नाही... मी येतो उद्या ठाण्याला भेटायला."
▪️ गेली अनेक वर्ष टोलधाडीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेक आंदोलनं केली. महाराष्ट्रामध्ये ६५ टोल नाके महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे बंद झाले. त्यानंतरच्या निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात त्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू... काय झालं त्या आश्वासनांचं ? त्यांना कुणीही जाब विचारत नाहीये... ना माध्यमं, ना जाणकार, ना जनता.
▪️ सरकारी भाषा इतकी क्लिष्ट, घाणेरडी असते जेव्हा माझ्यावर केसेस होत्या तेव्हा मला कळायचंच नाही की मला धरलं आहे की सोडलं आहे.
▪️ एका प्रशासकीय अधिकाऱ्याकडून काल मी माहिती घेतली तर त्यांनी एक माहिती पत्रक पाठवलं त्यात म्हटलंय दुचाकी, रिक्षा, ट्रॉली ट्रॅक्टर यांना टोल नाही. त्यानंतर एकीकडे असं म्हणतात १०-१२ प्रवासी असणाऱ्या चारचाकी सुमो ह्यांच्यासाठी अमुक-अमुक पथकर मग ४-५ सीटर कारसाठी वेगळं काय? म्हणजे काहीच सुस्पष्टता नाही. पुढे कळस म्हणजे जो पेडर रोडचा उड्डाणपुलाचाही टोलसाठी उल्लेख आहे, जो पूल अजून बांधलाच नाहीये.
▪️मुंबई प्रवेशाचे पाचही टोलनाके म्हैसकर ह्यांच्याकडे आहेत... हे म्हैसकर कोणाचे लाडके आहेत?
▪️ मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे ह्यांनीही टोल बंद करण्यासाठी एक याचिका दाखल केली होती... मला त्यांना विचारायचं आहे की ती याचिका कुणाच्या सांगण्यावरून मागे घेतलीत तुम्ही?
▪️ मला आपल्या जनतेचंही आश्चर्य वाटतं... जे लोक खोटी आश्वासनं देतात, सत्तेत येऊन पुन्हा तुम्हालाच पिळतात त्यांनाच मतदान कसं करता? जर लोकांना टोल भरून आनंद मिळत असेल तर मग घ्या. खोटी आश्वासनं देणाऱ्या नेत्यांच्या विरोधात मतदान झालं तरच त्यांना त्यांची चूक समजेल.
▪️ मी अविनाशला सांगितलंय की, अशा नादान राजकारण्यांसाठी जीव गमावू नको... एक माणूस दगावला तरी ह्यांना काहीच फरक पडणार नाही. आता मी अविनाशला उपोषण मागे घ्यायला सांगितलं आहे.
▪️ येत्या २-४ दिवसांमध्ये मी मुख्यमंत्र्याची भेट घेईन. त्यांच्यासमोर सविस्तर विषय मांडेन. त्यानंतर वाढीव टोलबाबतीत काय भूमिका घ्यायची ती घेऊच.
▪️ मुंबईत, ठाण्यात दरवर्षी फुटपाथ खोदून पेवर ब्लॉक लावले जातात. हे का केलं जातं? एकदा अधिकाऱ्यांनाही जाब विचारलं गेला पाहिजे.
▪️ मुंबई-नाशिक असो व अन्य रस्ते असोत, दरवर्षी खड्डे पडतातच कसे? हे एक रॅकेट आहे... एकदाच २०-२५ वर्षांसाठी रस्ता बनवला तर दरवर्षी काम निघणार नाही ... काम नाही तर टेंडर नाही आणि टेंडर नसेल तर कमिशन कसं खायचं ?
▪️ निवडणुकांच्या वेळी जनता जेव्हा मतदान करायला जाते तेव्हा त्यांच्या डोक्यात ना वाढलेला टोल असतो, ना वाढलेली शाळेची फी असते, ना इतर भेडसावणाऱ्या समस्या असतात तेव्हा भलत्याच मुद्द्यांवर मतदान करतात आणि नंतर ५ वर्ष पश्चातापाचा हात कपाळावर मारावा लागतो.
▪️ मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक रस्त्यावर दरवर्षी खड्डे पडतात. का? हे एक रॅकेट आहे... चांगले रस्ते केले तर २०-२५ वर्षासाठी ते चांगले टिकतात मग कामं निघत नाहीत कामं निघाली नाहीत तर टेंडर निघत नाहीत टेंडर निघाले नाहीत तर कमिशन निघत नाही, असं भ्रष्टचक्र आहे.
▪️ मुंबई-ठाण्यात चांगला असलेला फुटपाथ खोदतात तिथे पेव्हर ब्लॉक लावतात, मग पेव्हर ब्लॉक पुन्हा खराब होतात मग पुन्हा टेंडर... हे असंच सुरु असतं. कधीतरी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही तुम्ही जाब विचारला पाहिजे.
▪️ निवडणुकीच्या वेळी जेव्हा तुम्ही मतदानाला जात तेव्हा ना तुमच्या डोक्यात टोल असतो ना शाळेची फी असते ना राष्ट्रावरील खड्डे तुम्हाला दिसत असतात तुम्ही वेगळ्याच विषयांवर मतदान करता आणि नंतर ५ वर्ष डोक्यावर हाथ लावून बसता या सर्व गोष्टींचा जनतेने विचार करावा.
@mnsadhikrut
नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या २४ तासात २४ मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे 'औषध पुरवून वापरा' असा सल्ला दिला जातोय असं कळतंय.
आणि ह्या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत.
तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचं काय ?
दुर्दैव असं की सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे अशी परिस्थिती आहे.
सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल ह्याकडे अधिक लक्ष द्यावं.
सस्नेह जय महाराष्ट्र
महाराष्ट्रातला गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला, आणि तो पार पडावा ह्यासाठी ज्या प्रशासकीय यंत्रणा राबल्या त्यांचं मनापासून अभिनंदन. नेहमीप्रमाणे स्वतःच्या घरातील सण, सणाचा आनंद बाजूला ठेवून त्यांनी जे काम केलं ते नक्कीच प्रशंसेस पात्र आहे.
मी आज ज्यावर बोलतोय त्याची पार्श्वभूमी नुकताच पार पडलेला महाराष्ट्रातील महाउत्सव आणि त्याचं बदलत चाललेलं स्वरूप हे आहे. गणपती असो, दहीहंडी असो की नवरात्रोत्सव असो, रामजन्माचा उत्सव असो की इतर हिंदू देवतांचे उत्सव असोत, ते ह्या देशात उत्साहाने साजरे व्हायलाच पाहिजेत. आणि त्यावर सरकारांनी जरी निर्बंध आणले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेळेस सरकारशी संघर्ष केला आहे आणि ह्यापुढे पण गरज पडली तर करत राहू.
आपल्या धर्मातील उत्सवांना विरोध करायचा आणि इतर धर्मातील उन्मादावर मौन बाळगायचं अशी एक जमात आपल्याकडे आहे त्यांचा मुखभंग पण आम्हीच केला आहे. त्यामुळे धर्माभिमान इत्यादी गोष्टी आम्हाला कोणी शिकवू शकत नाही हे नक्की.
पण, ह्या उत्सवात १० दिवस आणि मुख्यतः मिरवणुकांच्या वेळेस डीजे,डॉल्बी ह्यांच्या आवाजच्या कर्कश्श पातळीमुळे हृदय बंद पडणं आणि मृत्यू येणं, किंवा तात्कालिक किंवा कायमचं बहिरेपण येणं, किंवा गेले काही वर्ष तर मिरवणुकीच्या दरम्यान लेझर लाईटमुळे अनेकांची दृष्टी जाणं हे प्रकार वाढले आहेत. ह्यात मिरवणुकीत येऊन, नाचून, आनंद व्यक्त करून लोकं निघून जातात पण पोलीस असतील किंवा इतर प्रशासकीय यंत्रणांमधील लोकं असतील, त्या भागात राहणारे स्थानिक रहिवासी असतील त्यांची अवस्था खरंच गंभीर आहे. सलग २४,२४ तास आवाज कानावर पडून अनेकांची श्रवण शक्ती कमी झाली असेल तर आश्चर्य वाटायला नको. आपल्या आनंदाची, उत्सवाची मोजावी लागणारी ही किंमत ही मोठी नाही का ?
त्यातच एक बातमी आली की एका कुटुंबात एका तरुणाचा मृत्यू झाला होता, आणि त्या घराच्या बाहेर सुरु असलेला डीजेचा आवाज कमी करा सांगितलं म्हणून राग येऊन त्या घरातील लोकांना मारहाण झाली. ही घटना एखादीच असेल, त्यामुळे शितावरून भाताची परीक्षा करण्याचं कारण नाही. पण कुठेतरी आपलं चुकतंय ह्याचा विचार करायला लावणारी नक्कीच आहे.
आज एका बाजूला कौटुंबिक गणेशोत्सवात तो पर्यावरण पूरक असेल, थर्माकोलचा वापर टाळत, कृत्रिम तलावात विसर्जन करत, आपल्या आनंदामुळे निसर्गाची किंवा इतर कोणाची हानी होऊ नये हे पाहण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. आणि दुसरीकडे जेंव्हा त्याचं सार्वजनिक स्वरूप येतं तेंव्हा त्यातल्या वर उल्लेखलेल्या त्रुटी दुर्लक्षित करता येत नाहीत. ह्यासाठी सर्व राजकीय नेत्यांनी, सरकारने, समाजातील विचारवंतांनी आणि अर्थात गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेऊन ह्याला काहीसं बीभत्स स्वरूप येतंय ते वेळीच थांबवलं पाहिजे.
उत्सव आणि आनंद साजरा व्हायलाच पाहिजे, पण माफक प्रमाणात पारंपरिक ढोलताशा पथकं, लेझीम अशा पद्धतीने मिरवणूक जर आपण काढली तर त्याचं पावित्र्य टिकेल, आनंद द्विगुणित होईल आणि हे बघायला जगभरातून लोकं पण येतील.
मी लवकरच सार्वजनिक मंडळांच्या प्रमुखांशी बोलणार आहेच. पण एकूण सरकारने आणि राजकीय पक्षांनी मतांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्यावर विचार आणि कृती करायला हवी.
शहरातील होर्डिंग्स ह्याने शहर विद्रुप होतात असे ताशेरे न्यायालयाने ओढले होते. न्यायालयाच्या ह्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. आणि मी ह्या आधी म्हणलं तसं होर्डिंग संस्कृती जर सगळे राजकीय पक्ष बंद करणार असतील तर माझा पक्ष पहिला त्यात उतरेल. त्याच धर्तीवर, ह्या उत्सवातल्या काही खटकणाऱ्या गोष्टी दूर करायला संपूर्ण राजकीय व्यवस्था तयार असेल तर माझा पक्ष त्यात सगळ्यात पुढे असेल.
हिंदू सणांसाठी आम्हीच संघर्ष करतो आणि ते साजरे करताना जर काही चुकीचं आढळलं तर आम्ही पुढाकार घेऊ हा माझा शब्द आहे. आता विचार सगळ्या राजकीय पक्षांनी आणि अर्थातच समाजाचं नेतृत्व किंवा प्रबोधन करण्याची क्षमता असणाऱ्यांनी करायचा आहे.
आपला
राज ठाकरे
@onepluscareIN This one is such a frustrating experience. What I can do with the 230801-005236 case ID when I didn't get resolution even after 20 days. OnePlus kept my phone with them and always told me about the new date of repair done. @jagograhakjago
@OnePlus_IN
I have been a user of OnePlus for the last 7 years. But the current incident with my OnePlus disappointed me.
I have submitted in warranty Device on 12 july. Even after 9 days i didn't get any update from OnePlus. I called service centre but not received by them.
मा. राजसाहेब ठाकरे यांनी महिन्या भरा पूर्वीच कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात दरडी कोसळतील अशी आशंका व्यक्त केली होती..
तसेच प्रशासनाने जागृत राहायला हवं असं आवाहन पण राजसाहेबांनी यावेळी केलं होत.
माझ्या महाराष्ट्र सैनिकांना,
सस्नेह जय महाराष्ट्र
दर वर्षी १४ जूनला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात.
पण ह्यावर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की,कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. तुम्हाला अगदीच काही आणावंसं वाटत असेल तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसंच एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा. तुम्ही दिलेली झाडांची रोपं आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ. आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणाल ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान ठेवाल ह्याची मला खात्री आहे.
सकाळी ८:३० ते दुपारी १२:०० ह्या वेळेत मी उपस्थित असेन.तेंव्हा भेटूया १४ जूनला.
आपला नम्र
राज ठाकरे