📍 #ठाणे |
दहीहंडीच्या सणानिमित्त आज ठाण्यातील विविध गोविंदा उत्सवांना भेट देऊन गोविंदांसोबत संवाद साधला.
यात ठाण्यातील कॅसल मिल नाक्यावरील ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी सुरू केलेल्या गोकुळ उत्सवात सहभागी होऊन सर्वांना या सणाच्या शुभेच्छा दिल्या. सातारा संपर्क प्रमुख शरद कणसे यांनी ज्ञानेश्वर नगर येथे सुरू केलेल्या श्री साई श्रद्धा सेवा समितीच्या दहीहंडीला उपस्थित राहून हा सांघिक खेळ एकमेकांची काळजी घेत साजरा करण्याचे आवाहन केले.
इंदिरा नगर येथील कामगार हॉस्पिटल नगरसेवक एकनाथ भोईर यांच्या शिव प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी महोत्सवाला उपस्थित राहून सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच किसन नगर येथील #शिवसेना सचिव राम रेपाळे यांच्या किसन नगरचा राजा गोविंदा मंडळ आयोजित दहीहंडी उत्सवाला भेट देऊन बाळ गोपाळाचा उत्साह वाढवला.
इंदिरा नगर येथील दादुभाई प्रतिष्ठान, तसेच वागळे इस्टेट परिसरातील अनेक दहीकाला उत्सवांना भेट देऊन गोविंदांना या सणाच्या शुभेच्छा देतानाच सुरक्षित उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.
यावेळी शिवसेना राज्य संघटन प्रमुख आनंद परांजपे, शिवसेना सचिव राम रेपाळे, ठाणे महापालिका उपमहापौर कृष्णा पाटील, शिवसेना सातारा संपर्क प्रमुख शरद कणसे, नगरसेवक एकनाथ भोईर, एकता भोईर, नगरसेवक योगेश जानकर, बबलू शेख तसेच शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Thane #दहीहंडी #गोपाळकाला #EknathShinde #Shivsena #Maharashtra
@Shivsenaofc@paranjpe_anand
📍 #ठाणे |
ठाणे पूर्वेतील अष्टविनायक चौकातील उपमुख्यमंत्री चषक दहीहंडी उत्सवाला आज शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी गोविंदांचा उत्साह द्विगुणित केला.
गोविंदा हा साहसी खेळ असला तरी तो संयम, शिस्त आणि एकमेकांच्या साथीने खेळायचा खेळ आहे. आज थरावर थर रचताना घरी आपली कुणीतरी वाट पाहते आहे हे विसरू नका असेही याप्रसंगी सर्वांना एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
तसेच दहीहंडीच्या निमित्तानं जमलेल्या तरुण गोविंदांना ठाणे पोलिसांनी हाती घेतलेल्या 'से नो टू ड्रग्ज' या उपक्रमाअंतर्गत कधीही ड्रग्सचे सेवन न करण्याची शपथ देण्यात आली. तसेच या उपक्रमाला पाठबळ मिळवून देण्यासाठी बांधलेली हंडी देखील यावेळी फोडली.
याप्रसंगी ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, रोहित पिंपळोलकर, ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश कोटवानी, #शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, विभागप्रमुख रमाकांत पाटील, नगरसेविका मालती पाटील तसेच शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Thane #दहीहंडी #गोपाळकाला #EknathShinde #Shivsena #Maharashtra
📍 #ठाणे |
ठाण्यातील रघुनाथ नगर येथील संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवाला आज शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी गोविंदांशी संवाद साधला.
गोविंदा हा आपला पारंपरिक सण असून मातीतला हा सण आता मॅटवर आला आहे. माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात या सणावरील सर्व निर्बंध आपण हटवून टाकले, दहीहंडीच्या सणाला सुट्टी, गोविंदांना विमा कवच, प्रो गोविंदाला प्रोत्साहन, गोविंदांना स्पेनला पाठवणे असे अनेक निर्णय घेतले असल्याचे याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
त्यासोबतच ठाणे पोलिसांनी सुरू केलेल्या 'से नो टू ड्रग्स' या उपक्रमाला पाठिंबा दर्शवण्यासाठी प्रतिकात्मक दहीहंडी फोडून या उपक्रमाला त्यांनी पाठिंबा दिला.
यावेळी आमदार रवींद्र फाटक, #शिवसेना राज्य संघटक प्रमुख आनंद परांजपे, नगरसेवक दीपक वेतकर, नगरसेवक राजेंद्र फाटक, नगरसेविका मीनल संख्ये तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Shivsena #EknathShinde #dahihandi #govinda #thane
📍 #ठाणे |
दहीहंडीच्या सणानिमित्त आज ठाण्यातील विविध गोविंदा उत्सवांना शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी गोविंदांसोबत संवाद साधला.
यात ठाण्यातील कॅसल मिल नाक्यावरील ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी सुरू केलेल्या गोकुळ उत्सवात सहभागी होऊन सर्वांना या सणाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर सातारा संपर्क प्रमुख शरद कणसे यांनी ज्ञानेश्वर नगर येथे सुरू केलेल्या श्री साई श्रद्धा सेवा समितीच्या दहीहंडीला उपस्थित राहून हा सांघिक खेळ एकमेकांची काळजी घेत साजरा करण्याचे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.
इंदिरा नगर येथील कामगार हॉस्पिटल नगरसेवक एकनाथ भोईर यांच्या शिव प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी महोत्सवाला उपस्थित राहून सर्वांना दहीहंडीच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यासोबतच किसन नगर येथील #शिवसेना सचिव राम रेपाळे यांच्या किसन नगरचा राजा गोविंदा मंडळ आयोजित दहीहंडी उत्सवाला भेट देऊन बाळ गोपाळांचा उत्साह एकनाथ शिंदे यांनी वाढवला.
यासोबतच इंदिरा नगर येथील दादुभाई प्रतिष्ठान, तसेच वागळे इस्टेट परिसरातील अनेक दहीकाला उत्सवांना भेट देऊन गोविंदांना या सणाच्या शुभेच्छा देतानाच सुरक्षित उत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शिवसेना राज्य संघटन प्रमुख आनंद परांजपे, शिवसेना सचिव राम रेपाळे, ठाणे महापालिका उपमहापौर कृष्णा पाटील, शिवसेना सातारा संपर्क प्रमुख शरद कणसे, नगरसेवक एकनाथ भोईर, एकता भोईर, नगरसेवक योगेश जानकर, बबलू शेख तसेच शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Thane #दहीहंडी #गोपाळकाला #EknathShinde #Shivsena #Maharashtra
थोर शिक्षणतज्ञ, भारताचे दुसरे राष्ट्रपती #भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन...
शिक्षण हे परिवर्तनाचे खरे माध्यम तसेच देशाच्या उन्नतीचा मूलमंत्र आहे. देशाची सशक्त पिढी घडवण्यासाठी शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. देशाचे सुजाण आणि जबाबदार नागरिक घडवण्याचे मौलिक कार्य करणाऱ्या तमाम शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
#TeachersDay #डॉ_सर्वपल्ली_राधाकृष्णन #शिक्षक_दिन #DrSarvepalliRadhakrishnan
📍 #मुंबई |
मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित नागरी प्रश्न, पुनर्विकास प्रकल्प आणि पायाभूत सुविधांबाबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होऊन स्थानिक प्रश्नांचा त्यांनी आढावा घेतला.
* उत्तर पश्चिम मुंबईतील एसआरए प्रकल्पांबाबत तक्रारींच्या अनुषंगाने ओशिवरा व्हीलेज येथील प्रकल्पात अपात्र लोकांना घरे वाटप केल्याप्रकरणी दोषी संबंधित एसआरएचे सक्षम प्राधिकारी, सहायक निबंधक या दोघा अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे त्यांनी निर्देश दिले.
* कायमस्वरूपी संक्रमण शिबीर (पीटीसी) इमारती विकासकाने एसआरएकडे हस्तांतरीत न केल्याच्या प्रकरणाची देखील चौकशी करण्याचे त्यांनी निर्देश दिले.
* मेट्रो मार्गिका क्रमांक दोन ब येथील पूर्व पश्चिम स्थानकास जोडणाऱ्या स्थानकाला 'हरे रामा हरे कृष्णा' असे नामकरणाच्या प्रस्तावाला कृष्णजन्माष्टीच्या दिवशी मंजुरी देत असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
* जोगेश्वरी गुंफांचा पर्यटन विभागामार्फत सर्वांगीण विकास केला जावा, यासाठी लागणारा निधी राज्य शासन उपलब्ध करून देईल असे याप्रसंगी त्यांनी स्पष्ट केले.
* फोर्स वन च्या मुख्यालयातील जागेची मागणी असून त्या जागेचा सातबारा वेगळा करण्यासाठी म्हाडाने आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
* आरे कॉलनीतील आप्पा पाडा येथील नागरिकांना मुलभूत नागरी सुविधा मिळाव्यात यावा यासाठी मुंबई महापालिका, वन विभाग आणि आदिवासी विकास आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी याभागाला भेट देऊन नागरिकांना सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी निर्देश दिले.
* सर्वोदयनगर येथील मेट्रो ६ च्या प्रकल्पामुळे बाधीत झालेल्या रहिवाशांना सदनिका वाटप करण्यात येणार असून त्यातील सहा जणांना एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज प्रातिनिधीक स्वरूपात चावी वाटप करण्यात आले.
यावेळी खासदार रविंद्र वायकर, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, एसआरएचे व्यवस्थापकीय संचालक महेंद्र कल्याणकर, म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद बोरीकर, मुंबई महापालिकेचे मुख्य अभियंता, सहायक आयुक्त आदी या बैठकीत दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
#Shivsena #EknathShinde #devlopment #mumbai
📍 #ठाणे |
ठाण्यातील टेंभीनाका मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'दहीहंडी उत्सव २०२६' मध्ये सहभागी होऊन उपस्थित असलेल्या गोविंदासोबत संवाद साधला.
टेंभीनाक्याची दहीहंडी ही केवळ एक स्पर्धा नसून वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जपलेल्या परंपरेची आणि ठाण्याच्या सांस्कृतिक ओळखीची मानाची खूण आहे. या दहीहंडीला सलामी देऊन गोविंदा पुढील दहीहंड्यांकडे जातात. त्यामुळे या उत्सवाला ठाण्यात विशेष महत्त्व असल्याचे याप्रसंगी सांगितले.
गोविंदा उत्सवाला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी शासनाने साहसी खेळाचा दर्जा, सार्वजनिक सुट्टी तसेच गोविंदांचा विमा अशा माध्यमातून या पारंपरिक खेळाला संस्थात्मक पाठबळ देण्यात आले आहे. ‘प्रो गोविंदा’च्या माध्यमातून गोविंदाला क्रीडा क्षेत्रात नवी ओळख मिळाल्याचेही यावेळी नमूद केले.
या दहीहंडीसाठी खास उपस्थित असलेले अभिनेता गोविंदा, अभिनेता सिद्धार्थ जाधव, दत्तू मोरे आणि इतर कलावंतांना सन्मानित केले. तसेच टेंभी नाक्यावर थर रचणाऱ्या विविध गोविंदा पथकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
यावेळी उबाठा गटाचे ठाणे महानगर संघटक महेश कदम यांचा #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश झाला.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, महापौर शर्मिला पिंपळोलकर, ठाणे जिल्हा महिला संघटिका सौ.मीनाक्षी शिंदे, प्रवक्ते राहुल लोंढे, निखिल बुडजडे, स्वानंद पवार, जॅकी भोईर तसेच शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Thane #दहीहंडी #गोपाळकाला #EknathShinde #Shivsena #Maharashtra
@Shivsenaofc@nareshmhaske