"आम्ही फक्त परंपरेचे राजे, बाबासाहेब तुम्ही तर ज्ञानाचे राजे" असे म्हणत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची हत्तीवरून मिरवणूक काढणारे, आरक्षणाचे जनक, सामाजिक सुधारणांचे कृतिशील पुरस्कर्ते, लोककल्याणकारी राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा
बहुजनांच्या उद्धारासाठी अजोड कामगिरी करणारे लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज,यांच्या अलौकिक कार्याचा ठसा या देशाच्या मातीत आणि इतिहासावर कायमचा उमटला आहे.छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांना व सर्वसमावेशक कार्याला त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन..!
#छत्रपती_शाहूमहाराज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्याकडे कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला. जे ख-या अर्थाने शूद्र आहेत. जे कायमच समाजाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर राहिले आहेत, त्यांच्या आरक्षणासाठी मी प्रयत्न केले, मंत्री म्हणून शिफारसी केल्या. पण, कुठल्याच मान्य झाल्या नाहीत. मी त्यांच्यासाठी काहीच करु शकलो नाही. हे शल्य माझ्या मनात आहे आणि म्हणूनच मी आपल्या मंत्री मंडळातून राजीनामा देत आहे. हे शल्य मनात ठेवूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अनंतात विलीन झाले.
अनेक वर्षे अनेक प्रयत्न करुन सुद्धा फक्त नव-नवीन मंडळे स्थापन झाली. काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली 1953 साली पहिला ओबीसी आयोग नेमला. 1977 साली जनता पार्टीचे राज्य आले. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण सुरु झाले. मंडळ आयोगाची नेमणूक झाली. बद्रीप्रसाद मंडळ हे बिहारचे.आता आपण ज्यांना इतरमागासवर्गीय समजतो तो इथला वंजारी, माळी, धनगर, कोळी, साळी ह्या जेवढ्या जाती आहेत त्या सर्व जाती ह्या शूद्र आहेत हे आपण कायम लक्षात ठेवावं. आपल्याला देखिल तीच वागणूक दिली जायची जी अतिशूद्रांना दिली जात होती. पण, अतीशूद्रांना माणूस म्हणून पण ओळख दिली जात नव्हती. हे ऐतिहासिक दाखलेच खरतरं नवीन समाजाला समजतच नाहीत. की, समाजामध्ये वर्णव्यवस्था असताना जे शूद्र होते ते आताचे सगळे इतरमागासवर्गीय. पण जे अतिशूद्र होते त्यांची समाजात गिनतीच केली जात नव्हती. म्हणजे ते ख-या अर्थाने बहिष्कृत होते. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय दिला. पण, शूद्रांना जर ख-या अर्थाने कोणी न्याय दिला असेल तर तो व्हि. पी. सिंग यांनी दिला. व्हि. पी. सिंग यांनी बद्रिप्रसाद मंडळ यांनी केलेल्या सर्व शिफारसी स्विकारल्या आणि पहिल्यांदा इतर मागासवर्गीयांना 27 टक्के आरक्षण घोषित केले. त्याचा फायदा घेत अनेक मुले, मुली इंजिनिअर, डॉक्टर झाली. लहान-मोठ्या पदावर गेली. पण, आजही त्यांना स्वत:ला शूद्र म्हणवून घ्यायला लाज वाटते. हा तोच समाज आहे की, ज्या व्हि. पी. सिंग यांना न्याय देऊन मुख्य प्रवाहात आणलं. त्यांचे राजकीय अस्त होत असताना त्यांची साथ सोडून दि़ली. त्या 27 टक्के आरक्षणाची पहिली अंमलबजावणी ही शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रात केली.
म्हणजे ज्यांना समाजातील समाजकारण समजतं, समाजातील दु:ख समजतात असे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे नेते आहेत. त्याच्यातील शंभर टक्के एक नाव घेतले पाहिजे ते म्हणजे शरद पवार साहेब. कारण, महाराष्ट्र हे पहिले राज्य होतं की, ज्यांनी मंडळ आयोगाच्या सर्व शिफारसी स्विकारल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न व्हि. पी. सिंग यांनी पूर्णत्वास आणलं आणि शरद पवार साहेबांनी ते अंमलात आणलं. पण, दुर्देवाने इतर मागासवर्गीय म्हणजे शूद्र यांना आपण कोण आहोत याची अजून ओळखचं झालेली नाही. आपण, काय होतो हे त्यांना आठवतचं नाही आणि असेच जर राजकारण राहिले तर आपण काय होणार आहोत हे त्यांना कळत नाही.
इथल्या आरक्षणामुळे हा समाज 20 वर्षांत अनेक मोठ्या जागांवर जाऊन बसला. त्याचे आरक्षण काढून घेतले आहे हे त्याच्या ध्यानीमनी देखिल नाही. क्रिमीलियर लावून त्याच्यावर मर्यादा आणली होती तेव्हासुद्धा तो लढला नाही. किंबहुना हा शूद्र म्हणजेच इतरमागासवर्गीय याला हातात तलवार घ्यावीच लागेल. लढावेच लागेल. तरच तो अस्तित्व टिकवून बसेल. नाहीतर परत एकदा त्यांच्या मनात जो सनातनी विचार आहे तो वर्णव्यवस्थेचा आहे. परत एकदा वर्णव्यवस्था आपल्याला नव्याने आलेली दिसेल आणि तेव्हा आपल्याकडे बोलायला शब्दच नसतील. कारण आपणच आपला पाय खोलात घालत आहोत.
काही दिवसांपूर्वी विटाव्यामधील 8 मजल्याच्या इमारतीच्या बेकायदेशीर बांधकामा बाबत मी फोटो पाठविले होते. आता ही 3 नवीन बांधकामे विटाव्यामध्ये सुरु आहेत. आपले अधिकारी तिथून 500 ते 700 रुपये स्क्वेअर फूट मागे घेतात. ते कोणाच्या नावाने घेतात हे देखिल मला माहित आहे. प्रश्न असा आहे कि, जिथे-जिथे अनधिकृत इमारती होत आहेत तिथे आता पाण्याची समस्या निर्माण व्हायला लागली आहे. म्हणजे आम्ही मेहनत करुन निधी आणायचे, पाण्याची पाईप लाईन टाकून पाणी वाढवून घ्यायचे आणि बिल्डरने अनधिकृत बांधकाम करुन करोडो रुपये कमवायचे. अधिका-यांनी करोडो रुपये कमवायचे.
सगळ्यांचे खिशे भरलेले असतांना आम्ही उगाच हमाली करतोय. एखादं शहर सुधरवत असताना अशी परिस्थिती येणे हे अत्यंत दु;खदायक व मनाशी खंत आणणारे असतं. आपण कळवा, मुंब्र्याचा संपूर्ण दौरा यापूर्वी काढला आहे असे मला नाही वाटत. आपण कळवा, मुंब्र्याचा पूर्ण दौरा एक संपूर्ण दौरा काढा म्हणजे नागरिकांना देखिल बरे वाटेल आणि आपल्या नजरेला कळेल कि, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी नेमकं काय करीत आहेत. कळवा, मुंब्रा परिसरातील एक-एका प्रभागामध्ये 15-25 इमारती उभारल्या जात आहेत.
तुमचे एक अधिकारी डॉन असल्यासारखे गाडीतून येतात. त्यांच्या मागे पुढे एक गाडी, मोटार सायकलचा ताफा घेऊन असतो. तेथिल मुले एखाद्या गँगस्टरच्या आजूबाजूला ज्या प्रमाणे उभी राहतात तशी त्यांच्या बाजूला उभी राहतात. नक्की काय चालू आहे हेच कळेनासे झाले आहे. इतकी अधिका-यांची मुजोरी मी याआधी कधीच पाहिलेली नव्हती. जगामध्ये काहीच कायमस्वरुपी नसतं. काळ बदलत असतो. तरी आपण या प्रकरणी जातीने लक्ष देऊन तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत ही विनंती.
@TMCaTweetAway @abhijitbangar
सन 1973 च्या सुमाराच गुजरामध्ये पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी नवनिर्माण आंदोलन सुरु केले. ती आग बिहारमध्येही पसरली. दोन्हीकडे म्हणजेच केंद्रातही काँग्रसेच सरकार होतं. पण, विद्यार्थी आंदोलन मागे घ्यायला काही तयार नव्हते. ते खरं विद्यार्थी आंदोलन होतं. पण, विद्यार्थ्यांनी जाऊन जयप्रकाश नारायण यांना विनंती केली की, आंदोलनाचे नेतृत्व आपण करावे.
इंदिरा गांधींच्या राजवटीविरुद्ध पहिली सभा गांधी मैदान पटना येथे झाली. तिथून ख-या अर्थाने देशाचे राजकीय वातावरण बदलायला सुरुवात झाली. तेव्हाही असचं म्हटलं जायचं की, इंदिरा गांधींच्या समोर कोण ? पण, जेव्हा निवडणूक लागली तेव्हा 17 दिवसांमध्ये एक पक्ष स्थापन झाला. अनेक पक्ष या पक्षामध्ये विलीन झाले. त्या पक्षाने नांगरधारी शेतकरी ह्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली. आणि जगाला आश्चर्य वाटेल असे निकाल लागले. त्यामध्ये इंदिरा गांधी पराभूत झाल्या. इंदिरा गांधींना सत्तेची प्रचंड गुर्मी आली आहे, असा जनतेच्या मनात रोष होता. आणि हा प्रश्न विचारला जात असताना इंदिरा गांधींसमोर कोण लोकांनी इंदिरा गांधींनाच पराभूत केलं. नंतर मग बैठका झाल्या आणि पहिल्यांदा बिगर काँग्रेसी मोरारजी देसाई हे प्रधानमंत्री झाले.
तेव्हा पटनामध्ये जेव्हा हालचाली होतात; तेव्हा भारताची राजकीय दिशा बदलते, हा या देशाचा इतिहास आहे.
आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांना जेंव्हापासुन मी बघितलं आहे, तेव्हापासून त्यांच्या खिशाला दोनच पेन असतात. एक निळे आणि एक लाल ती देखिल साधी पेनं असतात. फक्त त्यांची सवय एवढीच आहे कि, त्यांच्याकडे सहीसाठी कुठलेही पत्र आले कि ते पत्र गाडीत ठेवतात. आणि नंतर पत्र व्यवस्थित वाचून त्याच्यावर सही करतात. तसेच फाईल असतील तर पूर्वी मंत्री असताना ते घरी किंवा ऑफिसमध्ये मागवायचे आणि पूर्ण वाचल्याशिवाय कुठल्याही फाईलवर त्यांनी कधिही सही केलेली नाही.
त्यामुळे मी दोन पेन लावतो म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवावे कि, दोन पेन लावणं ही आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांची काम करण्याची पद्धत होती. पण, ते कुठेही उभे राहून कशावरही सह्या करीत नव्हते. ते कुठलीही गोष्ट वाचल्याशिवाय त्याच्यावर कुठलेही आदेश देत नव्हते.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील अनेक महिन्यांच्या कालावधीनंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिलेला आहे. राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील राजकारणाला नवी दिशा देणारा हा निकाल सर्वसामान्यांना सहजपणे समजून घेता यावा आणि त्यातील बारकावे लक्षात घेता यावा ,
विठूनामाच्या गजरात,विद्यार्थ्यांच्या तालात,सर्वसामान्य नागरिकांच्या जल्लोषात आज माझ्या मतदारसंघात मोठ्या उत्साहात,"आषाढी वारी आपल्या दारी"तसेच "योग महाकुंभ" हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी परिसरातील नागरिक,भाविक आणि बच्चे कंपनी मोठ्या जल्लोषात यात सहभागी झाली होती.