@RajThackeray रायगड मधील या परिस्थिती वर ना भाजप मधील लोक बोलत आहेत, ना राष्ट्रवादी सुनेत्रा पवार गटातील लोक बोलत आहे. भाजप सरकारने ज्याप्रमाणे नाशिकचा छळ केलाय तीच परिस्थिती भाजपने रायगड ची पण केली आहे.
यावर भाजप नेते, मंत्री, भाजप आय टी सेल कोणीही बोलणार नाहीत, फक्त पळ काढणार.
१५ लाख देतो सांगून देशवासियांना चॅाकलेट वाटले, आता जगभर वाटत ‘सुटलेत’ !
देश आर्थिक संकटात आहे. खरी परिस्थिती लोकांना अजूनही सांगितली जात नाही, फक्त काटकसर करा सांगत आहेत. लोकांना देशात सध्या काय चालले आहे याचे अंदाज बांधत संभ्रमात जगावं लागत आहे.अशा परिस्थितीत मोदींनी मेलोनी यांना चॅाकलेट देत सेल्फी व्हिडिओ काढणे म्हणजे लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.
एकीकडे अर्थव्यवस्था गटांगळ्या खातेय,रुपयाचं ऐतिहासिक अवमुल्यन झालंय,डिझेल-पेट्रोल, गॅसचा तुटवडा आहे,शेअर मार्केटचा बाजार उठलाय पर्यायाने महागाई प्रचंड वाढलीये. दुसरीकडे शेतकरी, विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, बेरोजगारी वाढत आहे.देशाचा जवान व किसान दोन्ही हतबल आहेत. आज देश संकटात असताना पंतप्रधानांनी किमान गंभीर असल्याचे नाटक तरी करावे !
रोम जळत असताना रोमचा सम्राट नीरो बासुरी वाजवत होता.आमचे चॅाकलेट वाटत आहेत असा समज देशवासियांचा होणार नाही याची काळजी मोदीजी नक्की घेतील अशी आशा करू या !
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अविनाश अभ्यंकर यांनी मुंबईतून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या रेल्वे गाड्या बंद केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. कोविड किंवा तांत्रिक कारणे देत या गाड्या बंद केल्या जात असताना, इतर राज्यांसाठी नवीन गाड्या सुरू केल्या जात असल्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
त्यांनी रेल्वे प्रशासन आणि सरकारवर मराठी लोकांच्या गरजांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. मुंबई-ठाण्यात राहणाऱ्या कोकणी लोकांना दादर/सीएसएमटीऐवजी दिवा किंवा पनवेलसारख्या दूरच्या स्थानकांवरून प्रवास करावा लागत असल्याची टीका त्यांनी केली.
तसेच, कोकणातील सत्ताधारी खासदार-आमदार गप्प का आहेत असा सवाल करत, ते केंद्र सरकारसमोर झुकत असून मतदारांच्या हक्कासाठी का बोलत नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला...
राज्याचा अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्र्यांनी नव्या मुंबईत भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय एज्यु-सिटीची घोषणा केली. सहा आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी करारही झाले आणि येत्या शैक्षणिक वर्षात त्यांचे अभ्यासक्रमही सुरू होत असल्याचं जाहीर केलं.
बऱ्याच शेतकऱ्यांनी ह्यासाठी जमिनी दिल्या असतील. ह्या सर्वांची उभारणी करण्यासाठी महाराष्ट्राच्या वीज निर्मितीची वीज वापरली जाईल. राज्यसरकारच्या तिजोरीतून, लोकांच्या पैशातून, पाणी पुरवलं जाईल. रस्ते केले जातील. त्यासाठीही अर्थसंकल्पात भरपूर निधी राखून ठेवला आहे.
अशा परिस्थितीत स्थानिक भूमिपुत्रांच्या मुलींना, मुलांना काही विशेष फायदा मिळणार आहे का ह्या विद्यापीठांचा? तसेच महाराष्ट्रातील इतर भागातील मुलांनाही काही सवलत? नाहीतर, सगळ्या पायाभूत सुविधा राज्यानं द्यायच्या आणि फायदा मात्र त्यांना फारसा नाही, असं व्हायचं. @CMOMaharashtra
#महाराष्ट्र #अर्थसंकल्प #शिक्षण
१ ली पासून तीन भाषा शिकवण्याची सक्ती करणाऱ्या शासन निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी हा सोपा गूगल फॉर्म भरा. मराठीसाठी, लहान मुलांच्या भविष्यासाठी एवढे तर आपण नक्कीच करू शकतो.
https://t.co/CHKkE6ecSl
#मराठी#महाराष्ट्र#हिंदी_सक्ती#राजठाकरे#MNSAdhikrut
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लाडके नेते आदरणीय श्री.बाळा नांदगावकर साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! त्यांना उदंड आयुष्य लाभो हिच आई जगदंबे चरणी प्रार्थना.
@BalaNandgaonkar
प्रार्थनेसाठी भोंगे वापरणे म्हणजे धार्मिकता नव्हे असा स्वच्छ निकाल माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे . याबद्दल माननीय उच्च न्यायालयाचे मनापासून अभिनंदन. मशिदींवरचे कर्णकर्कश्श भोंगे आणि त्यामुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास याबद्दल राजसाहेब गेली अनेक वर्ष बोलत आहेत. इतकंच काय पण या विरोधात २०२२ साली पक्षातर्फे एक मोठं राज्यव्यापी आंदोलन देखील उभारलं गेलं. पण यात तत्कालीन हिंदुविरोधी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र सैनिकांनाच अटक केली, त्यांच्यावर केसेस टाकल्या.
पण आज आता न्यायालयाने देखील एक प्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे. राजसाहेब नेहमी म्हणतात तुमचा धर्म तुमच्या घरात ठेवा, कोणालाच आक्षेप नसेल पण तुम्ही तो रस्त्यावर आणून लोकांना त्रास देणार असाल तर मात्र हे आम्ही खपवून घेणार नाही.
आता राज्यसरकारने न्यायालयाच्या आदेशाचं पालन करून या भोंग्यावर कारवाई करावीच.
#MNSAdhikrut #भोंगे
#loudspeakers #HighCourt
महाराष्ट्र शासनाचं सांस्कृतिक संचालनालय ६३ वी हिंदी नाट्य स्पर्धा पुण्यात आयोजित करत आहे. मराठी वृत्तपत्रात त्याच्या जाहिराती छापल्या आहेत. ही ६३ वी नाट्य स्पर्धा असल्यानं एक लक्षात येतं की ही काही आजचीच गोष्ट नाही. अशी स्पर्धा बरीच वर्ष भरवली जात असणार. तरीदेखील राज्याचे “सांस्कृतिक कार्य” मंत्री श्री. आशिष शेलार ह्यांना दोन प्रश्न विचारू इच्छितो.
१) महाराष्ट्र राज्याच्या “सांस्कृतिक कार्य संचालनालयानं” हिंदी भाषेतील नाटकांची नाट्य-स्पर्धा घेण्याचं प्रयोजन काय? हिंदी ही काही राष्ट्रभाषा नव्हे, मग काय कारण?
२) भाषेला विरोध असण्याचं कारण नाही. हिंदी देखील मराठीसारखीच एक भाषा आहे. परंतु, महाराष्ट्राची स्थापनाच मराठीसाठी झाली असताना, आधीच राज्यावर प्रचंड कर्ज असताना जितका निधी उपलब्ध आहे तो फक्त आणि फक्त मराठीसाठी का खर्च केला जात नाही? प्राधान्य “फक्त” मराठीला का नाही? @ShelarAshish
#मराठी #सांस्कृतिक #महाराष्ट्र #महाराष्ट्रशासन
सस्नेह जय महाराष्ट्र,
कल्याणमध्ये एका मुजोर अमराठी माणसाने मराठी माणसाला, मराठीपणावरून अर्वाच्य शिव्या देत, जबर मारहाण केली. अशीच मुजोरी काही दिवसांपूर्वी गिरगावमध्ये एका अमराठी माणसाने दाखवली. तिकडे त्याला महाराष्ट्र सैनिकांनी जागच्या जागी प्रसाद दिला. कालच्या प्रकरणानंतर पण माझे महाराष्ट्र सैनिक कल्याणमध्ये प्रसाद द्यायला गेले होते. कल्याणच्या घटनेत कोणीतरी शुक्ला नावाचा माणूस होता, महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्रद्वेषी शुक्ला , गुप्तपणे राहत आहेत. मध्यंतरी गिरगावमध्ये घडलेली घटना असो की ही कल्याणमधली, प्रत्येकवेळेला हे असले महाराष्ट्रद्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात आणि अजून किती तुम्हाला वाकवता येईल हे बघत असतात. बरं असं पण नाही की महाराष्ट्रा बाहेरून इथे आलेले सगळेच महाराष्ट्रद्वेषी आहेत. आज कित्येक पिढ्या इथल्या मातीत मिसळून राहिलेले असंख्य अमराठी माणसं आहेतच. पण ही जी महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिलावळ इथे गेले काही वर्ष वळवळायाला लागली आहे, ज्यांचा डोळा इथल्या जमिनीवर आहे, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे. मराठी माणसा आता तरी जागा हो, अन्यथा हे तुमच्या पायाखालची जमीन कधी खेचतील आणि कधी तुम्ही नेस्तनाबूत व्हाल हे समजणार पण नाही !
कल्याणमध्ये जे घडलं त्यावर तिथले खासदार, आमदार हे व्यक्त होत नाहीत किंवा मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा म्हणून पाठपुरावा करत नाहीत, हे का घडतं ? कारण याच नाही एकूणच सर्व आमदार खासदारांनी मराठी जनतेला पुरतं ओळखलं आहे. यांना थोडीफार आमिषं दाखवा की हे करतात मतदान आम्हाला ! मी गेली अनेक वर्ष जे नेहमी तुम्हाला सांगतोय की या सर्वांनी तुम्हाला गृहीत धरलं आहे.
आणि अशी घटना घडली की सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दरवाजे ठोठवावेसे वाटतात, कारण तेंव्हा खात्री असते की इतर पक्ष तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत. मात्र मतदानाच्या वेळेला मात्र हाच मराठी माणूस इतर पक्षांच्या दरवाजावर जाऊन टकटक करतो !
अर्थात आमच्यासाठी मराठी माणूस हा सगळ्यात महत्वाचा आहे, त्यामुळे आम्ही काहीही झालं तरी धावून जाणारच ! 'लाडकी बहीण'च्या नावाखाली मतं मागणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की, ज्यांना मारहाण झाली त्या व्यक्तीची बायको, आई, बहीण ही तुमची लाडकी बहीण नाही का ? मंत्रिपदं महाराष्ट्राची उपभोगणार परंतू त्याच भूमिपुत्राला तुमचा आधार नसणार ! तुम्हाला तुमचा मराठी बांधव सोडून हे असले मुजोर जास्त जवळचे का वाटतात ? तुमची ही लाचारी कशातून येते ते मला माहित नाही आणि तुमची लाचारी तुम्हाला लखलाभ....
हिंदू म्हणून आज आपण एकत्र आलं पाहिजे हे ठीक आहे, पण हिंदू म्हणून एकत्र येताना, प्रत्येक राज्यात तिथली भाषा, तिथली स्थानिक माणसं , तिथली संस्कृती यांना चिरडण्याचा प्रयत्न होता कामा नये. हिंदूत्व आम्ही देखील पुजतो परंतू हिंदूना एकत्र आणायच्या नावाखाली मराठी माणसाच्या किंवा इतर राज्यातील कुठच्याही स्थानिक माणसाच्या गळ्याला नख लगणार नाही हे देखील आपण पाहिले पाहिजे !
मी स्पष्ट सांगतो की या कल्याण प्रकरणात आरोपीना अटक करा, त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा. आणि जर सरकारला जमत नसेल, तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका.
मी नेहमी म्हणतो की पोलिसांवर माझा विश्वास आहे, त्यांनी या विश्वासाला सार्थ ठरावं. बाकी सरकारने पण हे असले प्रकार परत होणार नाहीत यासाठी ठोस कारवाई करावी.
राज ठाकरे ।
आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या नवनिर्माणातील राजसाहेबांचे शिलेदार !!
श्री. अविनाश जाधव @avinash_mns
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकृत उमेदवार ठाणे शहर विधानसभा.
#MNSAdhikrut#विधानसभा_२०२४