भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथील अनेक युवकांनी जिजाऊ संघटनेच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आणि प्रेरित होवून जिजाऊ संघटनेत जाहीर प्रवेश केला.
.
.
.
#भिवंडी#अंबाडी#जिजाऊसंघटना#पक्षप्रवेश
जिजाऊ संस्था शैक्षणिक क्रांतीची मशाल घेऊन जेव्हा या व्यवस्थेसमोर उभी राहील .....
ज्ञानदानाचे पवित्र मंदिर म्हणजे शाळा मात्र याच पवित्र मंदिराची दुर्दशा होणे ही अत्यंत खेदजनक आणि तितकीच दुर्दवी गोष्ट आहे. शिक्षणाचे महत्व आपल्या जीवनात किती आहे याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर . या महामानवाने जी अद्भुत क्रांती करून दाखवली ती केवळ शिक्षणाच्या जोरावर . मात्र अजूनही ही शिक्षणाचे हे महत्व इथल्या व्यवस्थेला खऱ्या अर्थाने काळालेलेच नाही असे ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यात असलेल्या कुडवळपाडा जिल्हा परिषद शाळेची अवस्था पाहून म्हणावे लागेल .
भिवंडी तालुक्यातील दौऱ्यादरम्यान कुडवळपाडा या गावाला भेट दिली असता , जिल्हा परिषद शाळा कुडवळपाडा या शाळेच्या दुरावास्थेबाद्द्ल येथील ग्रामस्थांनी परिस्थिती कथन केली . या ठिकाणी भेट दिल्यानंतर विदारक चित्र पाह्यला मिळाले . २२ पटसंख्या असलेल्या या शाळेत पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा नाही, स्वच्छता गृह असून नसल्यासारखे , कधीही कोसळून पडतील अश्या शाळेच्या भिंती आणि डोक्यावर कधीही पडेल असे छप्पर . या सर्व बाबी B.D.O यांच्याकडे पोहचलेल्या असतानाही अद्यापही यावर कोणतीच उपाययोजना झालेली नाही .
ही अशी परिस्थिती असताना गोर - गरीबांची मुलं कधी शिकणार आणि कशी शिकणार आणि कधी साहेब होणार ? की गरीबांच्या मुलांनी अजूनही केवळ शेणा मातीतच आपले आयुष्य घालवायचे ? हा प्रश्न या ग्रामस्थांच्यावतीने या व्यवस्थेला आम्ही विचारात आहोत ?
सदरील परिस्थिती पाहून जिजाऊ संस्था कदापी स्वस्थ बसणार नाही . आम्ही आमच्या परीने या ठिकाणी ज्या ज्या उपायोजना करता येतील त्या करूच...मात्र निर्ढावलेल्या सिस्टीमला याची दखल घ्यावीच लागेल.... कारण महामानवांचे तेजस्वी विचार घेऊन चालणारी जिजाऊ संस्था शैक्षणिक क्रांतीची मशाल घेऊन जेव्हा या व्यवस्थेसमोर उभी राहील तेव्हा या ढोंगी व्यवस्थेचा काळा चेहरा आम्ही उघड केल्याशिवाय राहणार नाही. !.
.
.
.
#भिवंडी #जिजाऊसामाजिकसंस्था #शाळा
जिजाऊ MPSC / UPSC अकॅडेमी झडपोली येथील विद्यार्थी हरिश्चंद्र मौले (मु.पोस्ट. मोखाडा, जिल्हा -पालघर ) यांची ग्रामविकास अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन ! व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !
#upsc#mpsc#मोफतवाचनालय#jijau#jijausanstha#zadpoli#konkan #maharashtra
जिजाऊ शैक्षणिक व सामजिक संस्थेच्या माध्यतुन चालवण्यात येत जिजाऊ मोफत UPSC/MPSC वाचनालयाचा लाभ घेऊन जिजाऊ वाचनालय, जव्हार येथील विद्यार्थी योगेश जयवंत कामडी (मु.कळभोंडे, पो. वाशाळा, ता. शहापूर, जि. ठाणे ) यांची कृषिसेवक (पालघर) व जिजाऊ वाचनालय, मनोर येथील विद्यार्थी अजय तांडेल (मु. कुंदल, पो. कंचाड, ता. वाडा, जि. पालघर ) यांची कृषिसेवक (ठाणे) पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !
.
.
.
#upscmpsc #jijauforall #स्पर्धापरीक्षावाचनालय #जिजाऊसंस्था #पालघर #शहापूर #वाडा
जिजाऊ शैक्षणिक व सामजिक संस्थेच्या माध्यतुन चालवण्यात येत असलेल्या जिजाऊ मोफत UPSC/MPSC वाचनालयाचा लाभ घेऊन जिजाऊ वाचनालय, वासिंद येथील विद्यार्थी निखिल तुलशीराम पाटील (मु. पो. वासिंद , ता. शहापूर, जि. ठाणे) व जिजाऊ वाचनालय, खनिवली येथील विद्यार्थी रुपेश सुरेश सुतार (मु. बिलोशी , पो. खानिवली, ता. वाडा, जि. पालघर ) यांची आरोग्यसेवक (पालघर) पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !
.
.
.
#upscmpsc #jijauforall #स्पर्धापरीक्षावाचनालय #जिजाऊसंस्था #पालघर #वाडा #शहापुर
जिजाऊ शैक्षणिक व सामजिक संस्थेच्या माध्यतुन चालवण्यात येत असलेल्या जिजाऊ मोफत UPSC/MPSC वाचनालयाचा लाभ घेउन जिजाऊ अकॅडेमी, झडपोली येथील विद्यार्थी भावेश देवराम जनाठे (मु.आंबेसरी, पो. जामशेत, ता.डहाणू, जि. पालघर ) यांची जलसंधारण अधिकारी (Water Conservation Officer) पदी निवड झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन ! व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !
.
.
.
#jijauforall #upscmpsc #पालघर #जिजाऊसामाजिकसंस्था #डहाणू
ठाणे शहरातील दौऱ्या दरम्यान चर्णी पाडा, कौसा गांव आम्रपाली बौध्द विहार येथे गौतम बुध्द आणि समस्त महामानवांना अभिवादन करत येथील नागरिकांची भेट घेतली. यावेळी येथील नागरिकांसह विद्यार्थ्यांशी संवाद साधला ..
.
.
.
#jijauforall#thane#जिजाऊसामाजिकसंस्था
रत्नागिरीतील प्रस्तावित वाटद एमआयडीसीला ग्रामस्थांचा विरोध असून जिजाऊ संघटना शेतकऱ्यांच्या बाजुने या लढ्यात उतरली आहे . याबाबत TV9 मराठी वृत्तवाहिनीने घेतलेली दखल..!
.
.
.
#रत्नागिरी#जिजाऊसंघटनामहाराष्ट्र#वाटदएमआयडीसी#tv9marathi
जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात असलेल्या मनोर तालुक्यातील श्री मनोरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे दि. १४-९-२०२४ रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या शिबिरामध्ये डोळ्यांचे डॉक्टर तसेच जनरल डॉक्टर नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होते. या शिबिराचा अनेक गरजू नागरिकांना फायदा झाला . त्याबद्दल या गणेशोत्सव मंडळाने एक पत्राच्या माध्यमातून जिजाऊ संस्थेचे आणि माझे आभार व्यक्त केले.
.
.
.
#मनोर #पालघर #मनोरचामहाराजा #जिजाऊ_सामाजिक_संस्था #निलेशसांबरे
पालघर जिल्ह्यातील अनेक युवकांनी जिजाऊसंघटनेच्या कार्यप्रणालीवर विश्वास दाखवत आज जिजाऊ नगरीत येऊन जिजाऊ संघटनेत जाहीर प्रवेश केला.
.
.
.
#jijauforall#जिजाऊसंघटना#पालघर#जाहीरप्रवेश
जिजाऊ संस्थेच्या वतीने आज श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरचे श्री नागनाथ माध्य. व उच्च माध्यमिक विद्यामंदिर, बुध ता. खटाव, जि. सातारा येथे मोफत वह्या वाटप उपक्रमाच्या माध्यमातुन येथील विद्यार्थ्याना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या . यावेळी शाळेच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला .
.
.
.
#जिजाऊ_सामाजिक_संस्था #NileshSambare #निलेशसांबरे #सातारा #मोफतवह्यावाटप
जिजाऊ संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील युवक आणि युवतींसाठी सरकारी नोकरीचा महामेळावा या कार्यक्रमासाठी रत्नागिरीत उपस्थित असताना पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला...
.
.
.
#jijauforall#निलेशसांबरे#रत्नागिरी
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सरकारी नोकरीचा महामेळावा या कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रख्यात व्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांचे स्वागत करण्यात आले.
.
.
.
#jijauforall#निलेशसांबरे#नितीनबानगुडे#रत्नागिरी#रोजगारमहामेळावा
रत्नागिरी जिल्ह्यातील युवक आणि युवतींसाठी जिजाऊ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला सरकारी नोकरीचा महामेळावा रत्नागिरीतील वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहपूर्ण गर्दीत संपन्न झाला.
.
.
.
#jijauforall#NileshSambare#ratnagiri