Thank You Captain ❤️🇮🇳
भारताचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवत केवळ 12 महिन्यांच्या आता 2 ट्रॉफी मिळवून दिल्याबद्दल भारतीय क्रिकेट नेहमी तुझे आभारी असेल.
तुझ्याकडे कर्णधार म्हणून ती प्रतिष्ठेची ODI वर्ल्ड कप ट्रॉफी असावी अशी मनापासून इच्छा होती,��ण जिवनात काही बाबी अपूर्णच राहतात....
Great victory for India at Edgbaston. Fearless and kept pushing England to the wall. Brilliantly led by Shubhman with the bat and in the field and impactful performances from everyone. Special mention to Siraj and Akash for the way they bowled on this pitch. 👏🇮🇳
@ShubmanGill@mdsirajofficial #AkashDeep
Illustrious legacy 🇮🇳
Inspiring intensity 👏
Incredible icon ❤️
The Former #TeamIndia Captain gave it all to Test Cricket 🙌
Thank you for the memories in whites, Virat Kohli 🫡
#ViratKohli | @imVkohli
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजे��ं नाही, असं विधान केल्याच ऐकलं .
देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भय्याजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचं कारण काय ? भय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं.... आणि भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का ? उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता... भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का ?
सध्या MMR रिजन मधे चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरवात होताना दि��त आहेत . हे काय चाललय हे न समजण्या इतकी मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं ! हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडाव ?
आत्ताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला , त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील इथे येउन मराठीत बोलून गेले . त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजते तर मग जोशी बुवांना हे समजू नये ? ���ा असल्या काड्या घालून ( अर्थात राजकीय हेतू असल्या शिवाय हे होणे नाही ) नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावे ! बाकी सविस्तर ३० तारखेला गुढीपाडव्याला बोलूच !
महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं !
राज ठाकरे ।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपट���वरून बोध :
माझ्या मुलांशी शिवजयंती निमित्त महाराजांनी वापरलेली तत्वे आजच्या काळात सुद्धा कशी हमखास यशाचा मार्ग आहेत याबद्दल केलेल्या चर्चेचा सारांश आपल्या सुद्धा उपयोगासाठी पोस्ट करीत आहे.
१. कृती विना स्वप्नपूर्ती अशक्य (दूरदृष्टी, ��ृतीशीलता)
•जिजाऊंनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांनी कृतीद्वारे प्रत्यक्षात उतरवले.
•मुठभर मावळ्यांसोबत नियोजनबद्ध, कल्पक व धाडसाने कृती करत बलाढ्यांविरुद्ध लढून विजय मिळवला.
बोध:
•मोठी स्वप्न बघा, पण त्यासाठी योग्य नियोजन आणि कृतीही हवी.
• फक्त सरकारी नोकरीच्या मागे धावण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप उभारा.
•“परिस्थिती प्रतिकूल आहे” म्हणून हार मानू नका.
२. अपयशाने खचू नका (संघर्षाला सामोरे जा)
•पुरंदरच्या तहानंतर २३ किल्ले सोडावे लागले, पण नव्याने ताकद निर्माण केली.
•आग्रा कैदेत नाउमेद न होता सुटकेचा मार्ग शोधला, यशस्वीपणे बाहेर पडले.
बोध:
•अपयश आले तरी प्रयत्न थांबवू नका.
•कामात, परीक्षेत ��पयश आले, त्यातून शिकून पुढे जा.
•संघर्षाशिवाय यश नाही, धैर्य आणि चिकाटी ठेवा.
३. धोरणीपणा, हुशारी
•मुघलांशी थेट लढण्याऐवजी गनिमी काव्याने पराजित केले.
•अफझलखानाला हुशारीने ठार मारून दक्षिणेत वर्चस्व निर्माण केले.
•आपल्या विरोधातल्या शक्तींना कायम एकमेकांविरुद्ध झुंजत ठेवले. मुघलाविरुद्ध निर्णायक लढाई सुरू झाली तेव्हा ज्या कुतुबशाही व आदिलशाहीविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला त्यां��ा सोबत घेतले.
बोध:
•फक्त मेहनत नाही, तर स्मार्टनेसही हवा.
•मार्केटिंग स्किल्स, टेक्नॉलॉजी आणि नवे तंत्रज्ञान सातत्याने आत्मसात करा.
•मोठ्यांशी स्पर्धा करण्यासाठी त्यांच्यासारखेच खेळा, स्मार्ट वर्क करा.
४. स्वतःच्या मर्यादा ओळखा आणि योग्य सहकारी निवडा (टीम बिल्डिंग आणि नेतृत्व)
•स्वतः सर्व काही करण्याचा प्रयत्न केला नाही, तर योग्य लोकांची निवड केली ( उदा बहिर्जी नाईक, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, नेताजी पालकर मोठी यादी आहे ).
•प्रत्येकाला त्यांच्या कौशल्यांनुसार जबाबदारी दिली.
बोध:
•एकट्याने सर्व करण्याचा अट्टहास न धरता योग्य टीम तयार करा.
•कोणत्याही उद्योग, व्यवसाय, सामाजिक चळवळीत योग्य व्यक्तींना जबाबदारी द्या.
•चांगल्या सल्लागारांचे ऐका, पण अंतिमता निर्णय स्वतः घ्या.
५. महिलांचा सन्मान, सुरक्षा
•स्त्रियांचा अनादर करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली.
•शत्रूच्या स्त्रियांना सन्मानाने त्यांच्या घरी पाठवले.
बोध:
•सोशल मीडियावर, प्रत्यक्षात महिलांबद्दल असभ्य भाषा आणि वर्तन टाळा.
•महिलांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घ्या, “हे माझं काम नाही” असं समजू नका.
•नात्यात आणि समाजात स्त्रियांना समान संधी द्या.
६. सर्वधर्मसमभाव, एकात्मता
•त्यांच्या सैन्यात 18 पगड जातींचे सैनिक होते.
•त्यांच्या दरबारात लोकांना जातीप्रमाणे नव्हे तर गुणवत्तेप्रमाणे स्थान होते. त्या काळाच्या बुरसटलेल्या सामाजिक धारणांच्या तुलनेत हे धोरण क्रांतिकारक होते.
•कधीही मंदिर किंवा मशिदीवर हल्ला केला नाही.
बोध:
•जातीपातीच्या भिंती तोडा, गुणवत्तेनुसार लोकांना सन्मान द्या.
•कोणत्याही प्रकारच्या धार्मिक, सामाजिक, जातीय दंगलीत अडकू नका,समाजाच्या एकोप्यासाठी काम करा.
७. आरोग्य आणि शिस्त (फिटनेस, टाईम मॅन���जमेंट)
•संपूर्णतः निर्व्यसनी होते.
•स्वतः तंदुरुस्त राहिले आणि संपूर्ण सैन्याचे आरोग्य काटेकोरपणे राहील असे पाहिले.
•वेळेचे नियोजन उत्कृष्ट ठेवले. लढाया, लोकप्रशासन संतुलन ठेवले.
बोध:
•फिजिकल आणि मानसिक आरोग्यावर लक्ष द्या.
•फिटनेससाठी दररोज वेळ द्या,फक्त मोबाईलवर गेम खेळू नका.
•वेळेचे नियोजन करा, वेळ नाही हे कारण पूर्ण पणे टाका, नियोजन करून काम करा.
८. अंधश्रद्धा व बुवाबाजी थारा ��ाही
•शिवाजी महाराजांनी कधीही अंधश्रद्धांवर विश्वास ठेवला नाही किंवा बुवाबाबांच्या नादी लागले नाहीत.
•मुहूर्ता नव्हे कर्तुत्वावर विश्वास ठेवला.
•उलट मुहूर्ताप्रमाणे नियोजन करायच्या परंपरे थकवा देण्यासाठी अनेक मोहिमा तर अनिष्ट मुहूर्तावर करून शत्रूला चकित केले.
९) सरधोपटपणा सोडून नवविचाराचा स्वीकार
महाराजांकडे मोठे वतन होते, वडिलांचे आदिलशाही दरबारी मोठे वजन होते. ठरवले असते तर आपले वतन वाढवून ऐशो आरामात जगले असते. प���ंतु त्यांनी स्वराज्याचा नवा विचार स्वीकारला.
आज उपलब्ध कुठल्याही मोटिवेशनल, ट्रान्सफॉर्मेशन टेक्नॉलॉजी पेक्षा सरस, अधिक उपयुक्त महाराजांचे जीवनचरित्र आहे. आपण अंगीकारल्यास हमखास यशाची खात्री बाळगा. शिवचरित्राकडे नव्या दृष्टिकोनाने पहायची गरज आहे.
शिवजयंतीच्या शुभेच्छांसह !
डॉ प्रशांत भामरे
💬💬 Don’t let distractions disrupt your career, value everything you have, take the game and country’s name forward.
𝗖𝗼𝗹. 𝗖.𝗞. 𝗡𝗮𝘆𝘂𝗱𝘂 𝗟𝗶𝗳𝗲𝘁𝗶𝗺𝗲 𝗔𝗰𝗵𝗶𝗲𝘃𝗲𝗺𝗲𝗻𝘁 𝗔𝘄𝗮𝗿𝗱 winner @sachin_rt's inspirational message to all the cricketers 🙌
#NamanAwards