Honoring the legacy of Dr. Patangrao Kadam Saheb.
Sharing his inspiring journey, contributions to Maharashtra, and stories that continue to motivate us.
व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेल्या तरी त्यांनी जपलेली ही सुंदर नाती आणि त्यांच्या आठवणी कायम अजरामर राहतात त्यापैकीच हे एक !
लोकनेते स्व. विलासराव देशमुख साहेब यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !
#Vilasraodeshmukh#Punyatithi#Maharastrachepatangra
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अनेक दिग्गज नेत्यांची नावे आदराने घेतली जातात, पण स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब आणि स्व. विलासराव देशमुख साहेब या जोडीची बातच वेगळी होती. सत्तेच्या आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी जपलेला आपुलकीचा आणि विश्वासाचा तो बंध अनोखा होता.
आज लोकनेते स्व. विलासराव देशमुख साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करताना स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांसोबतच्या त्यांच्या या अतुट बंधाची आठवण होणे अत्यंत स्वाभाविक आहे.
महाराष्ट्र कसा ठरला "India's Best Tiger State" ?
२०१२ मध्ये महाराष्ट्राला हा राष्ट्रीय सन्मान मिळाला... या यशामागे होते दूरदृष्टीचे निर्णय, प्रभावी व्याघ्र संवर्धन आणि स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांचे नेतृत्व.
जाणून घ्या हा अभिमानास्पद प्रवास... ➜
#worldstigerday
भारती विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात भारतरत्न, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी औपचारिक भाषणाऐवजी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला.
स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या शिक्षणदृष्टीला आणि डॉ. कलाम यांच्या युवा प्रेरणादायी विचारांना लाभलेला हा सुंदर संगम विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची, ज्ञानाच्या बळावर राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्याची प्रेरणा देणारा अविस्मरणीय क्षण ठरला.
सुमधूर आवाजाने अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतविश्वातील एक सुवर्णपान हरपले. भारती विद्यापीठतर्फे डी.लिट. सन्मान स्वीकारताना आणि ‘चांदण्यात फिरताना’ सादर केलेला त्यांचा तो क्षण आजही अविस्मरणीय.