भविष्यातील रणनीतीवर मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे परभणी महापालिकेवरील भव्य विजयाबद्दल सर्वांचे अभिनंदन करत नूतन महापौर सय्यद इक्बाल यांचा सत्कारही करण्यात आला.
आजच्या बैठकीने सर्वांना ऊर्जा प्राप्त झाली.
आज शिवसेना भवन येथे परभणी जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक अत्यंत उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात संपन्न झाली.
यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, अंबादास दानवे, सचिव आ. मिलिंद नार्वेकर, प्रवक्ते हर्षल प्रधान, संपर्कप्रमुख प्रदीपकुमार खोपडे आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
मा. उद्धवसाहेबांनी जिल्ह्यातील पक्ष संघटनेचा सविस्तर आढावा घेतला.
आदरणीय शालिनीताई पाटील यांच्या निधनाच्या वृत्तानं दुःख झालं. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या अर्धांगिनी, महाराष्ट्राच्या माजी महसूल मंत्री शालिनीताई पाटिल यांच्या निधनानं एक खंबीर महिला नेतृत्व नाहीसं झाल्याचं दुःख आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!
नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री असा प्रवास करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राच्या राजकारणातील अनुभवी, सुसंस्कृत आणि विनम्र व्यक्तिमत्त्व शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनानं एक मोठं व्यक्तित्व काळाच्या पडद्याआड गेल्याचं दुःख आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!
महाराष्ट्र राज्य गांव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीनं आयोजित पोलीस पाटील पदावरील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना संबोधित करत त्यांच्या सर्व न्याय्य मागण्यांना व संपूर्ण आंदोलनाला माझा पाठिंबा असल्याचं जाहीर केलं.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 11 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या बेरोजगार प्रशिक्षणार्थीना आस्थापनेवर कायमस्वरुपी सामावून घेण्याबाबत आंदोलन करणाऱ्या आपल्या परभणीसह राज्यभरातील आंदोलनकर्त्यांची भेट घेत पाठिंबा दिला.
महाराष्ट्र विधानसभेत तालिका अध्यक्षपद भूषवत विधान व्यवस्थेचं मुख्य पद स्वीकारताना आनंद झाला. विधानसभेतील सर्वात महत्वाचं, जबाबदारीचं पद म्हणजे विधानसभा अध्यक्षपद! आज तालिका अध्यक्ष म्हणून या जागेवर बसण्याचा मान मिळाला.
छत्रपती संभाजीनगरच्या मोर्च्यातून आम्ही सरकारला शेतकऱ्यांचा हंबरडा ऐकवला. जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांना या संकटातून काढण्यासाठी या शेतकरीविरोधी सरकारला धडा शिकवू! शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शिवसेना उभी आहे, काळजी करू नका, हा विश्वास साहेबांनी उपस्थित तमाम शेतकऱ्यांना दिला.
शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पिंगळी येथील दौऱ्यात हजारो संकटग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या अडचणींचा पाढा वाचला. शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. जगाचा अन्नदाता आज विपरीत परिस्थितीत आहे. या पोशिंद्याला तारलं तरच ते जगतील.
महाराष्ट्रात दुर्बल घटकांची संख्या वाढली आहे. आरोग्यसेवा फार खर्चिक झालेली आहे. जे आयपीएफ फंड आहेत ते चार टक्क्यांपर्यंत वाढवणार का? विशेष सवलत देणार का? मॉनिटरिंग कमिटीवर लोकप्रतिनिधी नियुक्त करणार का? आरोग्यदूतांना रुग्णलयामध्ये कशा प्रकारचे अधिकार असतील?
- राहुल पाटील, आमदार
@MLA_RahulPatil
मराठी माणूस जिंकला... ‘ब्रँड ठाकरे.'
हिंदीसक्तीचा जीआर रद्द झाल्याची बातमी तमाम मराठीजनांना आनंद देणारी आहे. महाराष्ट्रातील सर्व स्वाभिमानी जनतेचे या विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन. #मराठी
जय महाराष्ट्र! 🚩
मराठा संघर्षयोद्धा श्री. मनोज जरांगे पाटील यांची आज अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. आरक्षणाच्या आंदोलनाबाबत व 29 जूनच्या बैठकीबाबत यावेळी चर्चा करत समाजाच्या प्रत्येक लढ्यात तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली!
भारतीय सैन्याच्या अचूक हल्ल्याने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणं उध्वस्त झाली. अतिरेक्यांच्या मुळावर घाव घालणं हीच पहलगाम मधील निधन झालेल्या भारतीयांना मिळालेली श्रद्धांजली ठरेल! भारतीय लष्कराचे अभिनंदन.
जय हिंद!
#OperationSindoor
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा,
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा!
महाराष्ट्रातील तमाम जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या मराठी मातीचा अभिमान आणि संस्कृतीचा गौरव साजरा करूया! #महाराष्ट्रदिन
अनेक दिवसांची येथील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होत आहे. मागणी आल्यानंतर तात्काळ यासाठी प्रयत्न करून हा महत्वाकांक्षी रस्ता पूर्ण करून घेतला. या सर्वांची गैरसोय दूर झाल्याचा आनंद होतो आहे.
धार – मांगणगाव रस्त्याच्या ११ कोटींच्या कामाचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले...
परभणी तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती आणि मजबुतीकरण करण्याचा आपला संकल्प पूर्णत्वास जात आहे. रस्त्यामुळे या दोन्ही गावातील संपर्क अधिक सुकर होणार असून शेतकरी व नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे.