यावेळी शिवसेना मुख्य नेते, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी सर्व शिवसैनिकांना संबोधित केले.
याप्रसंगी शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, मंत्री, खासदार, आमदार, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
राज्यभरातील कडवट शिवसैनिकांचा जनसागर त्यांच्याकडून केला जाणारा शिवसेनेचा आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जयघोष हा अधिक ऊर्जा देणारा होता.
पराक्रम, त्याग आणि स्वाभिमान यांचे मूर्तिमंद प्रतीक असलेले थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि राष्ट्रभक्तीचा लौकिक वारसा हा सदैवी प्रेरणादायी राहील.
#VeerSavarkar
#JaiShriRam
मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्र यांच्या जन्मोत्सवाच्या पावन निमित्ताने सर्वांना श्रीराम नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
प्रभु श्रीरामचंद्रांचे आदर्श, सत्य आणि धर्मनिष्ठेचे मूल्य आपल्या जीवनात सदैव प्रेरणा देणारे ठरावेत, हीच प्रार्थना.
#RamaNavami#RamNavami2025
विश्वविजेता भारत! 🇮🇳
दुबई येथे झालेल्या ICC चॅम्पियनशीप ट्रॉफी २०२५ भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाला पराभव करत भारतीय संघाचा दमदार विजय झाल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन.
जय हिंद!
#TeamIndia#ChampionsTrophy2025
आजच्या मराठी भाषा दिवसाच्या तमाम मराठी जनांना मनःपूर्वक शुभेच्छा!
आपली मायमराठी आपण आपल्या अंगी उतावरुया, मनी जोपासुया तिचे संवर्धन आणि जतन करूया. यातूनच मानवी विचारांची देवाणघेवाण होणार आहे. आपल्या भाषेच्या लौकिकात भर पडणार आहे.
समाजातील अन्याय आणि विषमता यांवर आपल्या काव्य, कथा, कादंबरी, लघुनिबंध, नाटक इ. साहित्य प्रकारांच्या माध्यमातून भाष्य करणारे लेखक विचारवंत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.वा.शिरवाडकर कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
रत्नागिरीतल्या २० हजार युवांना रोजगार मिळणार
रत्नागिरी जिल्ह्याला आजवरच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी दिला नाही, तेवढा निधी मागील अडीच वर्षात एकनाथ शिंदे साहेबांनी दिला. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचा कायापालट व्हायला सुरुवात झाल्याचे गौरवोद्गार शिवसेनेच्या आभार मेळाव्या निमित्त काढले.
शिवसेनेच्या वतीने रत्नागिरीच्या चंपक मैदानावर आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रामदास कदम, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण भैया सामंत, आमदार निलेश राणे, माजी आमदार राजन साळवी, माजी आमदार सुभाष बने, राजेंद्र महाडिक, रचना महाडिक, रोहन बने, विलास चाळके, शिवसेना सचिव संजय मोरे, शशिकांत चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नेते उपस्थित होते.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये शिवसेनेचा स्ट्राईक रेट ९५ टक्के
एकनाथ शिंदेंनी देशात पहिल्यांदाच बहिणींना मान-सन्मान मिळवून दिला. त्या भगिनी हजारोंच्या संख्येने एकनाथजी शिंदे साहेबांना आशिर्वाद देण्यासाठी आल्याचे यावेळी सांगितलं. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचा विधानसभेला स्ट्राईक रेट हा ९५ टक्के होता. लढलेल्या जागेपैकी राजेश बेंडल यांचा एकमेव पराभव वगळता सर्वच जागा शिवसेना जिंकलेली आहे. बेंडल पराभूत झाले असले तरी ते शिवसेनेसाठी आमदारच असल्याचे सांगितलं. मागील अडीच वर्षात एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या कुठल्याही मतदारसंघात एकही रुपयाचा निधी कमी पडू दिला नसल्याचे यावेळी सांगितले.
रत्नागिरीवासियांची स्वप्नपूर्ती
वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयचे रत्नागिरीवासियांचे स्वप्न देखील आता पूर्ण झालेले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातले पहिले संशोधन केंद्र १५ कोटी रूपये खर्च करून रत्नागिरीत होत आहे. त्यामुळे या केंद्राच्या उद्घाटनासाठीही ६ महिन्यानंतर शिंदे साहेबांना पुन्हा यावे लागेल, असे निमंत्रणही यावेळी दिले.
२० हजार युवांना रोजगार
देशातला पहिला थ्रीडी मल्टिमीडिया शो देखील रत्नागिरीमध्येच होतो आहे. ज्या चंपक मैदानावर आभार मेळावा भरविण्यात आला होता. ते मैदान एमआयडीसीच्या मालकीचे आहे. याच ठिकाणी व्हीआयपी सेमी कंडक्टर कंपनीचा १९ हजार ५०० कोटी रुपयांचा प्रकल्प उभारला जाणार आहे. याप्रकल्पातून रत्नागिरीत सुमारे २० हजार युवांना रोजगार मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात औद्योगिक क्रांती करण्याची भूमिका ही एकनाथ शिंदे साहेबांनी घेतल्याचे आवर्जून सांगितले. आमच्या प्रत्येकाच्या मतदारसंघात बळ देण्याचे काम शिंदे साहेबांनी आजवर केलं. (1)
@mieknathshinde@iYogeshRKadam@MLAkiransamant@meNeeleshNRane
#shivsena #EknathShinde #Ratnagiri #UdaySamant
रत्नागिरी जिल्हा परिषदेवरही भगवाच फडकेल
व्यासपीठावरील नेते मंडळी आणि जनतेच्या आशिर्वादाने रत्नागिरी जिल्हा परिषदेवरही भगवाच फडकेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
*एकनाथ शिंदे साहेबांनी रत्नागिरीला भरघोस निधी दिला
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातली रखडलेली सर्व विकासकामे झाले. मागील अडीच वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात जी विकासकामे झाली ती मागील पन्नास वर्षात झाली नव्हती. आजवरच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी एवढा निधी दिला नव्हता, एवढा हजारो कोटींचा निधी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिला.
लाडक्या बहिणींचाही सन्मान
आभार मेळाव्यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी उपस्थित महिलांना फेटे बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला होता. लाडक्या बहिणी आणि भावांनी केलेल्या मतदानामुळेच महायुतीचे सरकार आले. एकनाथ शिेंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. सूर्य, चंद्र असेपर्यंत ही योजना सुरूच राहणार आहे, अशी ग्वाही देखील यावेळी दिली.
शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत आणि आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या उपस्थितीत आज ठाण्यातील टेंभी नाका येथे माजी आमदार राजन साळवी यांनी धनुष्यबाण हाती घेत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी राजनजी साळवी यांनी धनुष्यबाण हातात घेऊन शिवसेनेच्या बळकटीसाठी योगदान देण्याचा संकल्प केला. मागच्या साडेतीन वर्षांत जो धनुष्यबाण शिवसैनिकांच्या हातात नव्हता, तो काही लोकांनी काँग्रेसच्या खांद्याला टेकवण्याचे काम केले. मात्र, एकनाथ शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा धनुष्यबाण शिवसैनिकांकडे कायम ठेवण्याचे पवित्र कार्य केले.
ही शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणारी खरी शिवसेना आहे. एकनाथजी शिंदे यांच्या आशिर्वादाने मी जिल्ह्याचा पालकमंत्री ही आहे. मी आज आपल्याला शब्द देतो, ज्या ज्या ठिकाणी शिंदे साहेबांची ताकद वाढणार असेल, ज्या ज्या ठिकाणी शिंदे साहेबांचे हात बळकट होणार असतील तिथे कुठलंही कॉम्प्रमाइज करायला मी व किरण भय्या तयार आहेत हे जाहीररित्या सांगतो असं ही उदय सामंत आपल्या भाषणात म्हणाले.
राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाबाबत कोणतीही नाराजी नसून, आम्ही त्यांचे शिवसेनेत मनःपूर्वक स्वागत करीत आहोत, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी जाहीर केले. @MLAkiransamant
यावेळेस तात्काळ मार्ग काढू आणि लोकांच्या समस्या सोडून त्यांना न्याय मिळवून देऊ असा शब्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार किरण सामंत यांना दिला आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन संदर्भातील अडीअडचणी आणि समस्या बाबत तसेच सीआरएफ फंडातून पुलाची कामे प्रस्तावित करण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली.
@nitin_gadkari
यावेळी लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघातील तसेच राष्ट्रीय महामार्ग सुरू असणाऱ्या विविध समस्या आणि भूसंपादन संदर्भात आमदार किरण सामंत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली.