आधी स्मार्ट फोन शरीराचा एक अवयव झाला.
आता युपीआय , जीपे, फोनपे, पेटीएम हि आणि अशी नावे कोट्यवधी नागरिकांच्या दैनंदिन बोलीभाषेचा अविभाज्य भाग झाल�� आहेत
भारतातील ॲप बेस्ड यू पी आय (युनायटेड पेमेंट इंटरफेस) मार्केट जगातील सर्वात मोठे मार्केट बनत आहे. एका महिन्यात वीस लाख कोटीपेक्षा जास्त पेमेंटचे व्यवहार होत असतात. ते दर महिन्याला वाढत आहेत.
या मार्केटमध्ये शेअर मिळावा म्हणून अनेक बँका, कंपन्या त्यात उतरत आहेत. फक्त २०२४ मध्ये २० नवीन युपीआय ॲप लाँच केली गेली.
__________________________
वरकरणी असे वाटेल की जेवढे जास्त विक्रेते तेवढी त्या क्षेत्रात आरोग्यदायी स्पर्धा असेल. चालू लोकांनी पसरलेला हा भ्रम आहे.
उदा युपीआय मार्केटमध्ये ९२ टक्के मार्केट शेअर फक्त तीन पेमेंट ऍप्सचा आहे : फोनपे (४८), जीपे (३७) आणि पेटीएम (७) .
त्यामुळे इतर सर्वाना उरलेल्या फक्त ८ टक्यात मारामारी करावी लागत आहे. त्यांचे मॉडेल उभे रहात नाहीये. तोटा होणार / काही चक्क बंद ��डणार हे विधिलिखित आहे
हे त्यांना कळतंय. आता या उरलेल्यांनी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला, जी यू पी आय चे नियमन करते, साकडे घातले आहे की एका कंपनीला किती मार्केट शेअर मिळावा यावर बंधने घालावीत. जास्तीत जास्त ३० टक्के हिस्सा मर्यादा घातली जावी अशी मागणी
बुडाशी जाळ आ��ा की यांना स्पर्धा नको होते.
३० टक्केच का ? २० का नाही ? ४० का नाही ? याची उत्तरे ते देणार नाहीत.
____________________
अजून एक.
फोनपे वॉलमार्टचे आहे आणि जिपे गुगलचे. या दोन्ही बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे हजारो कोटी रुपयांचे जोखीम भांडवल आहे. या भांडवलाचा उपयोग करून या कंपन्या तोटा सहन करून विक्रेत्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवरूनच व्यवहार करायला प्रोत्साहन योजना राबवतात. आपला मार्केट शेअर टिकवून ठेवतात ���णि वाढवत आहेत. याला कॅश बर्निंग म्हणतात.
बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे भारतातील कोट्यावधी ग्राहकांचा कंझंपशन डेटा, पॅटर्न, बँक अकाउंट, मार्केट इंटेलिजन्स साठी लागणारा डेटा जमा झाला आहे. या डेटा ची किंमत कोट्यावधी रुपये असेल.
भविष्यात देशाच्या सार्वभौम / सुरक्षिततेला देखील यातून भविष्यात आव्हान मिळू शकते.
___________________________
मार्केटवले गुडूप. नेहमीप्र���ाणे. ते ना कॅश बर्निंग जे स्पर्धा मारते / अँटी कॉम्पिटिशन आहे, एक चकार शब्द काढत नाहीत. ना ३० टक्के मार्केट शेयर कॅप वर बोलतात.
बिगर कॉर्पोरेट क्षेत्रातील सूक्ष्म छोटे लघु मध्यम आकाराचे उद्योग स्पर्धेत हाय खाऊन बंद पडतात. त्यांना हेच लोक स्पर्धेच्या नियमांची आणि गुणांची लेक्चर बाजी करतात.
नवउदारमतवादी चालू लोक आहेत. आणि त्यांचे मध्यमवर्गातील अंधभक्त त्यांच्याशी कोण वाद घालणार
फ्ल��पकार्ट / ऍमेझॉन आणि अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म कंपन्यांनी, हजारो कोटी रुपये कॅश बर्निंग करून, वाण सामान आणि इतर गृहपयोगी वस्तू विकणाऱ्या कोट्यावधी दुकानांना घुस्मटवून टाकले आहे. हे रिटेल क्षेत्र शेतीक्षेत्रा खालोखाल रोजगार पुरवते
___________________________________
ताजा कलम: एनसीपीआय ने ३० टक्के किंवा तत्सम कॅपचा निर्णय अजून दोन वर्षे डिसेम्बर २०२६ पर्यंत पुढे ढकलला आहे.
मार्क माय वर्ड्स. हे ��न सी पी आय च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा नाही तर राजकिय निर्णय आहे. महाकाय बहुराष्ट्रीय कंपन्यांशी संबंधित सर्व निर्णय राजकीय असतात.
घ्या केळ !
संजीव चांदोरकर (२ जानेवारी २०२४)
मोदी जी ज़िंदाबाद 👇
भारत पर विदेशी कर्ज
• 2014: 440.6 अरब डॉलर
• 2015: 483.2 अरब डॉलर
• 2016: 484.3 अरब डॉलर
• 2017: 495.7 अरब डॉलर
• 2018: 541.8 अरब डॉलर
• 2019: 557.4 अरब डॉलर
•2020: 563.5 अरब डॉलर
•2021: 593.1 अरब डॉलर
•2022: 605.7 अरब डॉलर
•2023: 637.1 अरब डॉलर
•2024: 711.8 अरब डॉलर
सार्वजनिक जीवन में असहमति को सम्मान और स्थान देने वाले पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह को मेरी श्रद्धांजलि। आपकी शालीनता भारत की राजनीति में मील का पत्थर है। बिना किसी भय के आपकी सरकार की खूब आलोचना का अवसर मिला। बिना कटुता और कपट के किसी पर हमला किए राजनीति के शिखर पर रहने वाले और खुली प्रेस कांफ्रेंस करने वाले भारत के आख़िरी प्रधानमंत्री को प्रणाम।
भारत माता के महान सपूत और सिख समुदाय के पहले प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंह जी का अंतिम संस्कार आज निगमबोध घाट पर करवाकर वर्तमान सरकार द्वारा उनका सरासर अपमान किया गया है।
एक दशक के लिए वह भारत के प्रधानमंत्री रहे, उनके दौर में देश आर्थिक महाशक्ति बना और उनकी नीतियां आज भी देश के गरीब और पिछड़े वर्गों का सहारा हैं।
आज तक सभी पूर्व प्रधानमंत्रियों की गरिमा का आदर करते हुए उनके अंतिम संस्कार अधिकृत समाधि स्थलों में किए गए ताकि हर व्यक्ति बिना किसी असुविधा के अंतिम दर्शन कर श्रद्धांजलि दे पाए।
डॉ. मनमोहन सिंह हमारे सर्वोच्च सम्मान और समाधि स्थल के हकदार हैं। सरकार को देश के इस महान पुत्र और उनकी गौरवशाली कौम के प्रति आदर दिखाना चाहिए था ।
या सगळ्यात एक पॅटर्न आहे; कारण त्याच्यामागील आर्थिक विचार एकच आहे !
रिझर्व्ह बँकेचे “रिझर्व्हज” बँकांना / केंद्र सरकारला अडीनडीला पैसे लागतील म्हणून तयार केले जा��ात
पण रिझर्व्ह बँकेला एवढे पैसे ट्रांसफर करायला लावायचे कि काही वर्षानंतर रिझर्व्ह बँकेकडे केंद्र सरकारला द्यायला पैसेच राहणार नाही
_______
खाजगी वाहन कशासाठी तर पटापट इच्छित स्थळी पोचता यावे म्हणून
पण खाजगी वाहनांचे एवढे उत्पादन करून, रस्त्यावर वाहने येऊ द्यायची कि लवकर पोचण्यासाठी स्वतःचे वाहन घेणाऱ्या कोणालाच ट्राफिक जाम मुळे पुढे जाता येणार नाही
___________
जागतिक / आर्थिक संदर्भ ब��लतात त्यावेळी सार्वजनिक उद्योगांबाबत धोरण बदलणे समजू शकते
पण केंद्र सरकारची अर्थसंकल्पीय तूट भरून काढण्याच्या नावाखाली एवढे सार्वजनिक उद्योग विकत राहायचे कि भविष्यात सार्वजनिक उद्योग शिल्लकच राहणार नाही
_____________
निसर्ग चक्राप���रमाणे दुष्काळ / पाण्याचा तुटवडा पडणार त्यावेळी भूगर्भातील पाणी खेचणे समजू शकते
पण भूगर्भातील पाणी एवढे खेचत राहायचे कि हजारो फूट बोअर मारली तरी पाणीच लागणार नाही
_____________
औद्योगिकीकरणासाठी जंगलातील नैसर्गिक साधनसामुग्री लागणार हे उघड आहे
पण एवढी जंगलतोड करायची, नवीन जंगले तयार नाही करायची कि भविष्यात तोडायला जंगलच शिल्लक राहणार नाही
_______________
मच्छिमारी व्यवसायात उत्पदकता वाढली प��हिजे हे म्हणणे एक भाग झाला
पण यांत्रिक बोटींनी एवढी मासेमारी करायची कि समुद्रात पकडायला मासेच शिल्लक राहणार नाहीत
_______________
मानवी श्रमांना कमी मोबदला द्यायचा हा एक भाग झाला
पण माणसांच्या श्रमाचे एवढे शोषण करायचे, त्याची क्रयशक्ती एवढी संपवायची कि कॉर्पोरट बनवलेला वस्तुमाल विक्रीविना गोडाऊन मध्ये पडून राहील
______________
जमिनीतील खनिजे काढणे, हवेत कार्बन सोडणे, शस्त्रास्त्र / अण्वस्त्र ��िर्मिती, फक्त मूठभर महानगरांना फुगवणे ..... यात तुम्ही अ��ून भर घालू शकता
यामागे सामायिक राजकीय आर्थिक तत्वज्ञान आहे. जागतिक कॉर्पोरेट / वित्त भांडवल स्वकेंद्री नाही तर त्यात सुसायडल टेंडन्सीज आहेत.
ते एकटे मेले तर हरकत नाही. पण ते तुम्हाला / आम्हाला घेऊन मरते. म्हणून तो विषय आपला विषय असला पाहिजे.
____________________________________
तरुणांना आवाहन
आर्थिक प्रश्नाकडे डाव्या उजव्या बायनरी मध्येच तुम्ही बघावे यासाठी पद्धतशीरपणे आपला / तुमचा ब्रेनवॉश केला जातो ह��� लक्षात घ्या.
मी जे लिहितो त्याला देखील फेसव्हॅल्यूवर घेऊ नका. स्वतः माहिती / आकडेवारी घ्या. स्वतः विचार करा. सगळ्यातील पॅटर्न शोधा. सिस्टीमकेंद्री विचार करा.
आमची पिढी उद्या नसेल. तुमचे सारे आयुष्य जायचे आहे. वरील साऱ्या गोष्टी तुमच्यासाठी / तुमच्या मुलाबाळांसाठी / मुलाबाळांच्या मुलाबाळांसाठी शिल्लक तर राहिल्या पाहिजेत ना ? याचा विचार करा
संजीव चांदोरकर (२४ डिसेम्बर २०२४)
नॉर्वे मधील शाळेच्या विद्यार्थाना घेऊन एक प्रयोग केला गेला. विद्यार्थ्यांच्या दोन गटाला एक मजकूर दिला गेला. एका गटाला सांगितले कि हाताने कागदावर तो उतरवून काढा , तर दुसऱ्या गटाला सांगितले कि लॅपटॉपवर कीबोर्ड वापरून स्क्रीनवर उतरवा
हे करतांना दोन्ही गटातील विद्यार्थ्यांच्या डोक्याला इलेक्टॉनिक सेन्सर्स लावले गेले. आणि दोन्ही गटांची तुलना केली गेली
त्यातून असे आढळले कि कीबोर्ड वापरून लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत, हाताने लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेंदूतील मोठा भाग सक्रिय हो��ो, मेंदूतील शिकण्यासाठी वापरात येणाऱ्या पेशी, स्मरणशक्ती जागवणाऱ्या पेशी / मेमरी सेल्स सक्रिय होतात, शब्दांचे स्पेलिंग अधिक बरोबर येते आहे
दुसऱ्या तशाच एका प्रयोगात दोन्ही गटांना , हाताने कागदावर आणि डिजिटल पेनाने स्क्रीनवर, छोटे / मोठे विविध आकार काढण्यास सांगितले गेले. यात देखील हाताने कागदावर आकार काढणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक बरोबर आकार काढले
थोडक्यात हाताने लिहिणे , चित्र , आकृती काढण्याने मेंदूचा अधिक चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो
हाताने लिहिणे, कीबोर्डवर टाईप करणे, व्हॉइस टेक्स्ट वापरणे , चॅट जीपीटी, आर्टिफिशियल इंटीलिजन्स वापरणे इत्यादी
लिखित मजकूर असलेला कागद / किंवा प्रिंट आऊट हे एक आउटपुट मानले तर ते आउटपुट एकाच नव्हे तर वरील विविध मार्गानी काढले जाऊ शकते. एकाच उद्दिष्टापर्यंत घेऊन जाणाऱ्या त्या विविध मार्गांवर चालून मानवी मेंदूवर होणारे प��िणाम भिन्न असू शकतात
______________________________
आजच्या जमान्यात ��्हॉइस टेक्स्टचा वापर वाढत आहे, विद्यार्थी सांगितलेले निबंध किंवा घरचा अभ्यास चॅट जीपीटी वापरून तयार करून शिक्षकांना देत आहेत …
अतिशय प्रगत आर्टिफिशियल इंटीलिजन्स मानवी अस्तित्वाच्या अनेक दरवाजा / खिडक्यांवर थापा मारत आहे …. अशा काळात माणसांच्या मेंदूच्या सृजशीलतेवर, विशेषतः शाळा / कॉलेजमधील विद्यार्थी दशेत, नक्की काय परिणाम होईल यावरील संशोधन होणे महत्वाचे ठरेल
मी काही या विषयातील तज्ञ नाही. पण खूप गंभीर विषय आहेत हे हे जाणवते आहे. अशा छोट्या पोस्टमध्ये देखील लिहिता येत नाही. विचार केला तरी छाती धडधडते
संजीव चांदोरकर (१७ डिसेम्बर २०२४)
डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यावर एलोन मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या शेअरच्या किमतीत एका महिन्यात ७० टक्के वाढ !
नॉर्मली एखाद्या कंपनीने नवीन बिजनेस प्लान, नवीन मॉडेल , नवीन मार्केट, दुसरी कंपनी खरेदी करण्याची जाहीर घोषणा केली कि तिच्या शेयरचे भाव वाढतात. एलोन मस्क यांच्या टेस्लाने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.
तरीदेखील हि मूल्यवृद्धी कशी होते ? या प्रश्नातून मोठ्या कॉर्पोरेटशाहीची पोलिटिकल इकॉनॉमी समजून घेण्याचा प्रयत्न करूया
____________________________
हा फक्त खोके पेट्या पुरता मर्यादित विषय नाही. तर देशाची आर्थिक धोरणे, कर विषयक प्राधान्यक्रम नक्की कोणत्या उद्योगाला आणि कंपन्यांना लाभदायक ठरणार आणि सामान्य नागरिकांवर काय परिणाम होणार याच्याशी निगडित विषय आहे.
कॉर्पोरेट क्षेत्रातील पेड ऑपिनियन मेकर्स आपला ब्रेनवॉश करत असतात कि कॉर्पोरेटचा परफॉर्मन्स आणि त्यांच्या शेअरच्या किमती या मेरिटवर , व्यवस्थापनाच्या गुणवत्तेवर ठरतात.
सत्य हे आहे कि मोठ्या कॉर्पोरेटच्या परफॉर्मन्स मध्ये व्यवस्थापनाच्या गुणवत्तेपेक्षा कायद्या��ील बदल, शासकीय आर्थिक धोरणे , अर्थसंकल्पीय तरतुदी यांचे योगदान काही पटींनी जास्त असते.
आणि म्हणून कायदा करण्याचा, धोरणे ठरवण्याचा, अर्थसंकल्प बनवण्याचा अधिकार कोणाकडे आहे हा मोठ्या कोर्पोरेटसाठी कळीचा प्रश्न असतो.
उदा एलोन मस्क यांच्या टेस्ला , स्पेस -एक्स या कंपन्या, आणि मस्क यांची एआय मधील कंपनी यांना हविताशी धोरणे ट्रम्प राजवटीत असतील अशी गुंतवणूकदारांना खात्री वाटते.
___________________________
अजून एक मुद्दा. आपल्याकडे हातावर पोट असणाऱ्या कोट्यवधी कष्टकरी लोकांना आणि महागाई भत्ता किती मिळणार याची चिंता वाहणाऱ्या निम्न मध्यमवर्गाला एक कोटी म्हणजे एकावर नक्की किती शून्य हे पटकन सांगता येणार नाही
त्यामुळे पन्नास कोटी वगैरे आकडे ऐकून त्यांचे डोळेच नाही विचार क्षमता बधीर होऊन जाते. पण कॉर्पोरेट भ्रष्टाचाराची पोलिटिकल इकॉनॉमी समजून घेतली पाहिजे.
सत्तेवर येऊ शकणाऱ्यांना समजा एक कोटी दिले तर तो पैसा पुरवणाऱ्या कोर्पोरेटला, शासकीय निर्णयांमुळे / आर्थिक धोरणांमुळे / कदाचित ५०० कोटीपर्यंत फायदा होणार असतो. प्रकल्प, जमिनी , कर्जमाफी, कन्सेशन्स अशा विविध माध्यमातून
उदा. जाहीर झालेल्या आकडेवारी प्रमाणे एलोन मस्क यांनी ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी २७७ मिलियन्स डॉलर्स देणगी दिली आहे. (२२,००० कोटी रुपये)
पण ट्रम्प निवडून आल्यानंतर एलोन मस्क यांची व्यक्तिगत संपत्ती , त्यांच्या कंपन्यांचे शेयर भाव एकत्रितपणे ५०,००० मिलियन्स (५० बिलियन्स) ने वाढले असा अंदाज आहे
हा काही जुगाराचा अड्डा नाही. कि एका जुगाऱ्याकडून पैसे दुसऱ्या जुगाऱ्याकडे जातात. आणि तेच चक्र फिरत राहते.
आपण चर्चा राजकीय अर्थव्यवस्थाची करत आहोत. फायनली हे पैसे दीर्घकाळात सामान्य लोकांच्या श्रमाला कमी किंमत देणे आणि त्यांच्या खिशातून जास्त पैसे काढणे यातून उभे केले जातात
______________________________
भारतात काय चालू आहे हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. यात गुंतलेल्या व्यक्तींची कमी चर्चा करा. सिस्टीम कशी चालते हे समजून घ्या.
ते जे काही आपल्याला सांगतात ते कोणत्याच प्रकारे फेस व्हॅल्यू वर घेऊ नका. त्यांचा स���टेड बुटेड पेहराव, त्यांच्या डिगऱ्या, त्यांचे इंग्लिश, त्यांची आकडेवारी , त्यांचे प्रेझेंटेशन स्किल्स याने डोळे दिपवून घेऊ नका.
संजीव चांदोरकर (१४ डिसेंबर २०२४)
दोन शब्द गरिबांच्या चंगळवादाबद्दल.
गरिबांना कोणत्याही नैतिक भूमिकेतून लेक्चरबाजी करण्याची गरज नाही. आयुष्य छान जगावेसे वाटणे हि उपजत मानवी भावना आहे. या संदर्भात खालील छोटे उदाहरण बरेच काही सांगून जाते.
काही वर्षांपूर्वी मुंबईतील गरीब वस्तीत कर्जबाजारीपणा बद्दल एक सर्व्हे घेतला गेला होता.
ए��ा छोट्या घरात पाच वर्षाच्या मुलीचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यात येत होता. मुलीच्या आईने सांगितले की त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी तिने कर्ज काढले आहे.
“या कार्यक्रमावर झालेला खर्च मुलीच्या शिक्षणासाठी उपयोगी पडला असता ” या सूचना वजा प्रश्नावर त्या मुलीची तरुण आई म्हणाली
“लहानपणचे वाढदिवस मोठे झाल्यावर देखील मुलांच्या लक्षात राहतात. आमच्या मुलीचे आणि आमचे / आईवडिलांचे भावनिक बंध तयार होणे देखील आम्हाला तेवढेच महत्त्वाचे वाटते. उद्या आमच्याकडे चार पैसे जास्तीचे असतील देखील. पण तिचे वय काय परत येणार आहे”
गरीब कुटुंबे आयुष्याकडे , कर्जाकडे कसे बघतात याची जाण म���यक्रो फायनान्सची वैचारिक मांडणी करतांना खूप महत्त्वाची आहे. गरिबांच्या आर्थिक प्रश्नांची, कर्जबाजारीपणाची चर्चा करू पाहणारी कोणतीच वैचारिक मांडणी शुष्क असता कामा नये.
संजीव चांदोरकर ( १३ डिसेम्बर २०२४)
(“मायक्रो फायनान्स”: गरिबांसाठी “तारक” का “मारक” आणि “मायक्रो फायनान्स”ची राजकीय अर्थव्यवस्था
या लोक वाङ्मय गृहातर्फे प्रकाशित होणाऱ्या दोन आगामी पुस्तकातून)
#Micro_Finance_Extracts_३
“भूक” आणि “हाव”
“गरिबांना कर्जाची हाव सुटली आहे”,
“किती कर्ज काढायचे याची अक्कल गरिबांना नाही”
“एका बाजूला शासन “लाडक्या” गरिबांचे लाड करत असते; आता या मायक्रो फायनान्स कंपन्या त्यांना कर्जे वाटत सुटल्या आहेत”
या टिपिकल शहरी श्रीमंत / उच्चवर्गीय टीका आहेत.
गरीब काढत असलेल्या कर्जावर उथळ टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करूया. कारण या लोकांना ना जमिनी सत्ये जाणून घ्यायची आस असते ना आकडेवारी.
त्यांना याची देखील जाणीव नाही कि “पैशाची भूक” आणि “पैशाची हाव” या दोन भिन्न गोष्टी आहेत.
भूक “वस्तुनिष्ठ” तर हाव “आत्मनिष्ठ” असते.
गरिबांना पैशाची भूक जास्त आहे , हाव कमी आहे. देशातील श्रीमंत / उच्च वर्ग जी अमर्याद संपत्ती साठवतो त्याला “हाव” म्हणतात.
____________________
एखाद्या भूभागात भूगर्भातील पाण्याचा उपसा करून, जमिनीला नको तेवढे पाणी पाजल्यामुळे, जमिनी उफाळतात. परिणामी त्या भूभागाच्या आजू��ाजूच्या विहिरी कोरड्या पडलेल्या असतात.
तसेच देशातील श्रीमंत/ उच्च वर्गाची सतत वाढणारी संपत्ती आणि कोट्यावधी गरिबांची कायमची गरिबी आणि कर्जबाजारीपणाचा यांचा परस्परसंबंध आहे.
हे श्रीमंत/ उच्च वर्गाला सांगणे व्यर्थ आहे. कारण त्यांच्याकडे बौद्धिक प्रामाणिकपणाचा आणि माणसांप्रती संवेदनशीलतेचा अभाव आहे. असो.
सत्य हे आहे कि गरिबांना सतत पैशाची चणचण भासत असते. पिढ्यन्पिढ्या. ती भविष्��ात देखील भासणार आहे.
“लाडकी बहीण” योजनेअंतर्गत महिना फक्त १५०० रुपये (म्हणजे दिवसाला फक्त ५० रुपये) मिळवण्यासाठी महाराष्ट्रात २ कोटी महिला पावसात /उन्हातान्हात, घरची कामे सोडून, लहान मुलांना कडेवर घेऊन रांगेत उभ्या राहतात याचे अर्थ लावण्यासाठी अर्थशास्त्र शिकलेले असण्याची गरज नाही.
गरज आहे आपल्यासारख्या हाडामासाच्या, भावना, स्वप्ने, मुलेबाळे असणाऱ्या स्त्री पुरुषांच्या प्रति ह��दयात भगिनी / भातृभाव असण्याची.
संजीव चांदोरकर (११ डिसेम्बर २०२४)
(“मायक्रो फायनान्स”: गरिबांसाठी “तारक” का “मारक” आणि “मायक्रो फायनान्स”ची राजकीय अर्थव्यवस्था
या लोक वाङ्मय गृहातर्फे प्रकाशित होणाऱ्या दोन आगामी पुस्तकातून)
#Micro_Finance_Extracts_1
गरीबी संपुष्टात न येण्याची करणे !
सांगितले गेले होते मला लहानपणीच की गरीबांची सेवा हीच इश्वर सेवा.
मला तर ईश्वर सेवा खूप आवडायची
माझ्या गावात मी दिसला गरीब की त्याला चार आणे, आठ आणे देवू लागलो
गरिबांसाठी काम करणाऱ्या एन जी ओ ना छोटया छोटया देणग्या देऊ लागलो.
मग नोकरी निमित्त मला देशभर व नंतर ��गभर फीरावे लागू लागले
मग इश्वराची सेवा घडावी यासाठी मी देवाकडेच मागणे केले
की मी नोकरी निमित्त जेथे जेथे फीरेन
तेथे तेथे गरीब असू देत.
आणि म्हणून देवाने जगात सर्वत्र गरीब असतील हे बघितले !
मग मी जसजसा म्हातारा होवू लागलो
तस तशी माझी ईश्वर सेवेची आस वाढू लागली
मग मी ईश्वराकडे पुन्हा एकदा मागणे केले कि
मी मरे पर्यंत तरी गरीबांना श्रीमंत करू नकोस.
देवाने माझे ते देखील मागणे मान्य केले !
मग जस जसे मरण जवळ दीसू लागले
तस तशी माझ्या पुढच्या पिढयांना देखील ईश्वर सेवा करण्याची संधी मिळावी
अशी तळमळ मला लागून राहीली
माझ्या मागून येणार्या, व त्याच्या देखील पुढच्या पिढयांकडून
ईश्वराची सेवा घडून त्यांच्या पदरात पुण्य पडावे
असे तळमळून वाटू लागले
परत एकदा मी ईश्वराकडे मागणे केले
की गरीब लोक तहहयात आमच्या आजूबाजूला असू देत !
आणि म्हणून देवाने सदा सर्वकाळ गरीब लोक पृथ्वीवर असण्याची तजवीज केली आहे !
- संजीव चांदोरकर (पूर्व प्रकाशित)
ही आहे बेबंद मार्केट कॉर्पोरेट इकॉनॉमी!
स्पर्धकांच्या पुढे जाण्यासाठी प्रथम महाकाय उत्पादन क्षमता उभ्या करायच्या. त्या पुरेपूर वापरल्या नाहीत. पडून राहिल्या की तोटा येतो. म्हणून मग उत्पादन क्षमतांचा वापर वाढवून त्यातून वस्तुमालाचे महाकाय उत्पादन करायचे.
पण सप्लाय वाढवून डिमांड काही आपोआप वाढत नाही. अनेक कारणे आहेत. मग तो अतिरिक्त वस्तुमालाला गोडाऊन मध्ये विक्रीची वाट बघत पाडून ठेवायचे.
एलोन मस्क यांच्या टेस्ला कार्स. एका मोठ्या उघड्या मैदानात वि���्री विना उभ्या आहेत. एका अंदाजाप्रमाणे ५०,००० कार्स. अमेरिकेत टेस्ला मॉडेलची किमान किंमत आहे ४०,००० डॉलर्स. म्हणजे फक्त एका मैदानात २०० कोटी डॉलर्सचा माल उभा आहे.
हे फक्त टेस्ला बद्दल नाही.
जगात पोलाद निर्मितीची उत्पादन क्षमता, चीन सकट, एवढी तयार केली गेली आहे…की त्यातील फक्त ५० टक्के वापरात येत असते.
भारतात घ्या.
कार डीलर्स असोसियेशन प्रमाणे सप्टेंबर २०२४ अखेरीस आठ लाख वाहने डीलर्स किंवा कंपन्यांच्या गोडाऊन मध्ये विक्रीची वाट बघत आहेत.
बिल्डर असोसिएशन सांगत आहे की देशातील फक्त आठ महानगरांमध्ये दहा लाख फ्लॅट्स विक्रीची वाट बघत आहेत.
_________________
दुसरा मुद्दा
गुडघ्यात मेंदू असणारे नवउदारमतवादी सुटेड बुटेड अर्थतज्ज्ञ गेली ४० वर्षे निर्यात प्रधान अर्थव्यवस्थे���े महत्व आपल्याला सांगत आहेत.
अनेक राष्ट्रात निर्यात प्रधान उद्योग उभे राहिले. पण आता सगळीच राष्ट्रे क्रिया प्रतिक्रिया साखळीतून आयात कर वाढवून देशांतर्गत उत्पादनाला महत्व देणार आहेत. मग आता या निर्याती साठी बनवलेल्या कारखान्यांचे काय लोणचे घालायचे ?
____________________
तिसरा मुद्दा
कॅपिटल एक्सपेंडिचर, ऑपरेटिंग एक्सपेंडिचर, इन्व्हेंटरी यात गुंतून पडलेले मिलियन किंवा बिलियन ऑफ डॉलर्सचे भ��ंडवल.
जगात तयार केलेल्या उत्पादन क्षमता पुरेश्या न वापरल्यामुळे आणि बनवलेल्या वस्तू मालाची इन्व्हेंटरी ह्या फक्त ��ोन गोष्टीत पडून राहिलेल्या भांडवलावर नुसते व्याज धरले तरी दिवसाचे काही शे कोटी भरतील
कॉर्पोरेट आणि वित्त भांडवलशाही जेवढ्या मोठ्या प्रमाणावर भांडवलाची हत्या करते त्याची आकडेवारी कधीही काढली जाणार नाही.
आणि कॉर्पोरेट भांडवल प्रणाली दावा करते की ती सर्वात इफिशियंट उत्पादन प्रणाली आहे
_________________________
चौथा मुद्दा
हा जो अनुत्पादक खर्च उत्पादक कंपन्यांना येतो तो विकल्या जाणाऱ्या वस्तुं���्या किमतीतून एकतर ते ग्राहकांकडून वसूल करतात
आणि
त्यांच्या नफ्याच्या मार्जिन्स आणि त्यातून तयार झालेले त्यांचे संचित नफे एवढे आहेत किती तो तोटा सहजपणे शोषून घेऊ शकतात.
____________________________
तरुणांनो, डावे उजवे बाजूला ठेवा. सिस्टीम केंद्री विचार करायला शिका.
संजीव चांदोरकर (१० डिसेंबर २०२४)