We have registered your complaint on the MARG (Management And Redressal of Grievance) portal of the Brihanmumbai Municipal Corporation. For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/KiMWqT8P1v
Your MARG registration number - DX_202600070582
To track complaint ID, only using last 6 digit you can check status of your complaint.
आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - GN_202600070566
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/KiMWqT8hbX येथे कृपया भेट द्यावी. तुमच्या तक्रार क्रमांकाच्या शेवटच्या सहा आकड्यांचा वापर करावा आणि तक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्यावी.
आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - GN_202600070564 आणि GN_202600070430
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/KiMWqT8P1v येथे कृपया भेट द्यावी. तुमच्या तक्रार क्रमांकाच्या शेवटच्या सहा आकड्यांचा वापर करावा आणि तक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्यावी.
आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - GN_202600070319
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/KiMWqT8P1v येथे कृपया भेट द्यावी. तुमच्या तक्रार क्रमांकाच्या शेवटच्या सहा आकड्यांचा वापर करावा आणि तक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्यावी.
🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी परिमंडळ ४ मधील आरोग्यविषयक कामकाजांचा जोगेश्वरी (पूर्व) येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालयात आज आढावा घेतला.
🔹पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रो आदी आजारांचा प्रतिबंध, उच्च जोखमीच्या भागांवर विशेष लक्ष, बांधकामस्थळे व झोपडपट्टी परिसरातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
🔹आरोग्य सुविधांच्या दुरुस्तीची कामे मिशन मोडवर पूर्ण करणे, रिक्त पदे लवकर भरणे, आरोग्य केंद्रांमधील स्वच्छता, भटक्या कुत्र्यांवरील नियंत्रण आणि सर्व सहायक आयुक्तांनी आपल्या प्रशासकीय विभागातील (वॉर्ड) उपक्रमांची नियमित क्षेत्रीय पाहणी करण्याचे निर्देश श्रीमती वर्मा-लवंगारे यांनी दिले.
🔹परवाना प्रक्रिया अधिक सुलभ व नागरिकाभिमुख करण्यासोबतच नागरिक सुविधा केंद्रे बळकट करून आरोग्य सेवांसाठी स्वतंत्र सुविधा, अर्जांचा मागोवा आणि ऑनलाइन सेवा अधिक प्रभावी करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दफनभूमींची स्वच्छता व देखभाल तसेच परिमंडळ ४ मधील एस. के. पाटील रुग्णालय, एम. डब्ल्यू. देसाई रुग्णालय, सिद्धार्थ रुग्णालय, डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय व जोगेश्वरी (पूर्व) येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालयातील विविध बाबींचाही आढावा घेतला.
🔹यावेळी उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. शरद उघडे, उप आयुक्त (परिमंडळ ४) श्रीमती भाग्यश्री कापसे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते, परिमंडळ ४ मधील सर्व सहायक आयुक्त आदींसह आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi@PrajaktaVerma
🔹मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन-SIR) कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी संपूर्ण कामकाजात गती आणणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी, संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी केले आहे.
🔹मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन-SIR) - २०२६ च्या अनुषंगाने, २६ - मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कामकाजाबाबत आज मालाड येथील लिबर्टी गार्डन येथील मुंबई पब्लिक शाळेत आढावा बैठक पार पडली.
🔹अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी आदी यावेळी उपस्थिती होते.
🔹अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर म्हणाले की, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षणाचे कामकाज कालबद्ध पद्धतीने विहित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांनी गणना अर्ज वितरण आणि डिजिटायझेशन या दोन्ही बाबी समांतर पद्धतीने वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करावेत.
#MyBMCUpdates
#SIR
#SpecialIntensiveRevision
🔷मुंबईतील मॅनहोल्सवर कामे करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल व दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या संकल्पनेतून 'मॅनहोल रेलगार्ड' (Manhole Rail Guard) ही चौकोनी आकारातील प्रतिकृती विकसित करण्यात आली आहे.
🔷ही प्रतिकृती प्रायोगिक तत्त्वावर (Pilot Project) मुंबईतील एल प्रशासकीय विभागामध्ये वापरात आणण्यात येत आहे.
🔷तेथील अनुभव लक्षात घेऊन तसेच तांत्रिक गरजा आणि महानगरपालिका कर्मचारी व नागरिकांकडून मिळणाऱ्या सूचनांच्या आधारे, या प्रतिकृतीचा वापर करावा किंवा कसे, याबाबतचा पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
🔷समुद्रात जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मालाड येथे उभारण्यात येत असलेल्या महत्वकांक्षी अशा मलजल प्रक्रिया केंद्राच्या (STP) कामांची महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी आज सकाळी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना व कंत्राटदारांना आवश्यक त्या सूचना व निर्देश दिले.
🔷मुंबई मलनि:सारण प्रकल्प विभागाच्या वतीने ४५४ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या मालाड मलजल प्रक्रिया केंद्राचे रचना, बांधकाम आणि प्रचालन व परिरक्षण करण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पाचे काम दिनांक ३० मे २०२८ पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. कामे विहित वेळेत व वेगाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची कुमक व आवश्यक ते तंत्रज्ञ वाढवावेत, असे निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले.
🔷हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर सांडपाण्यावर अधिक परिणामकारक प्रक्रिया होणार असून, समुद्रात सोडल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होण्यास मोठी मदत होणार असल्याचे श्रीमती भिडे यांनी नमूद केले.
🔷श्रीमती भिडे यांनी प्रारंभी मालाड येथील मलजल प्रक्रिया केंद्राच्या स्थापत्य तसेच यांत्रिकी व विद्युत अभियांत्रिकी कामांचा आढावा घेतला. प्रकल्पाच्या विविध घटकांची सद्यस्थिती, कामाची प्रगती, गुणवत्तेचे निकष तसेच उर्वरित कामांचे नियोजन याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. विविध यंत्रसामग्रीची उभारणी, विद्युत यंत्रणेची उभारणी, प्रक्रिया युनिट्सची कार्यक्षमता आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांची त्यांनी पाहणी केली. तसेच, प्रत्येक टप्प्यात गुणवत्तेची काटेकोर अंमलबजावणी करत नियोजित मुदतीत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
🔷मालाड (४५४ दशलक्ष लीटर प्रतिदिन), वरळी (५०० दशलक्ष लीटर प्रतिदिन), भांडुप (२१५ दशलक्ष लीटर प्रतिदिन), वांद्रे(१८० दशलक्ष लीटर प्रतिदिन), धारावी (४१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन), घाटकोपर (३३७ दशलक्ष लीटर प्रतिदिन), वेसावे (वर्सोवा) (१८० दशलक्ष लीटर प्रतिदिन), कुलाबा (३७ दशलक्ष लीटर प्रतिदिन) अशा एकूण २ हजार ५०१ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामकाजाच्या सद्यस्थितीचा आढावा श्रीमती अश्विनी भिडे यांनी यावेळी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून घेतला. तसेच, सर्व कंत्राटदारांना विहित मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण कामे करण्याचे निर्देशही यावेळी दिले.
🔷अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजित बांगर, स्थानिक नगरसेविका श्रीमती कमरजहाँ सिद्दीकी, उपायुक्त (परिमंडळ-४) डॉ. भाग्यश्री कापसे, उपायुक्त (आयुक्त यांचे कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, उपायुक्त (अभियांत्रिकी) श्री शशांक भोरे, प्रमुख अभियंता (मुंबई मलनि:सारण प्रकल्प) (प्रभारी) श्री.अशोक मेंगडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
We have registered your complaint on the MARG (Management And Redressal of Grievance) portal of the Brihanmumbai Municipal Corporation. For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/KiMWqT8P1v
Your MARG registration number - KW_202600070144
To track complaint ID, only using last 6 digit you can check status of your complaint.
To track complaint ID, only using last 6 digit you can check status of you complaint.
🔹आपणास दिलेल्या गणना अर्जात आवश्यक माहिती भरून व स्वाक्षरी करून त्याची एक प्रत बीएलओला द्यावी व पोच घेऊन एक प्रत स्वतः जवळ ठेवावी.
🔹आपले किंवा आई-वडिलांचे नाव मागील SIR मध्ये आढळून न आल्यास, फक्त सही करून भाग २ अ. आणि भाग २ ब. रकान्यातील माहिती न भरता फक्त भाग ३ भरून अर्ज बीएलओंना सादर करावा आणि भारत निवडणूक आयोग मान्य ११ पैकी कोणतेही एक कागदपत्र तयार ठेवावे.
🔹अर्ज भरताना अडचणी येत असल्यास मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर 'KNOW YOUR BLO' किंवा ECINET अॅपवर 'BOOK A CALL WITH BLO' वर जाऊन बीएलओना संपर्क करा व गृहभेटींदरम्यान बीएलओंना सहकार्य करा
#MyBMCUpdates
#SIR
#SpecialIntensiveRevision
We have registered your complaint on the MARG (Management And Redressal of Grievance) portal of the Brihanmumbai Municipal Corporation. For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/KiMWqT8hbX
Your MARG registration number - RN_202600070141
To track complaint ID, only using last 6 digit you can check status of your complaint.
To track complaint ID, only using last 6 digit you can check status of you complaint.
आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - HE_202600070290
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/KiMWqT8P1v येथे कृपया भेट द्यावी. तुमच्या तक्रार क्रमांकाच्या शेवटच्या सहा आकड्यांचा वापर करावा आणि तक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्यावी.
We have registered your complaint on the MARG (Management And Redressal of Grievance) portal of the Brihanmumbai Municipal Corporation. For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/KiMWqT8hbX
Your MARG registration number - DX_202600070186
To track complaint ID, only using last 6 digit you can check status of your complaint.
To track complaint ID, only using last 6 digit you can check status of you complaint.
शुक्रवार, दिनांक १७ जुलै २०२६ सकाळी ६ ते शनिवार, दिनांक १८ जुलै २०२६ या २४ तासात झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा साठा ५०.७७ % झाला आहे .
गेल्या २४ तासात जलाशय साठ्यात ०. ९८ % वाढ झाली आहे.
#MyBMCUpdates