तुम्हाला महाराष्ट्रासह देश-विदेशातील ब्रेकिंग न्यूज, राजकारण, मनोरंजन, क्रीडा यांसारख्या विविध क्षेत्रातील ठळक बातम्या आणि व्हिडिओ Whatsapp वर मिळवता येतील. त्यासाठी 'महाराष्ट्र लाईव्ह' ला Whatsapp वर फॉलो करायला विसरू नका!
channel on WhatsApp: https://t.co/pzycC6X4yM
#Nagpur : देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याच्या मसुद्याबाबत हिंदू धर्मीय आणि देवस्थान संस्थांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवल्यामुळे हा प्रारूप कायदा तूर्तास स्थगित करण्य़ाचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.
#TempleLand
#Dhule : धुळे जिल्ह्यातील धनगरवाडी शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागानं छापा टाकून अवैध गावठी दारू निर्मितीचे अड्डे उध्वस्त केले.
या कारवाईत सुमारे ८ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत ३३ गुन्हे नोंदविण्यात आले.
#ExciseDepartment#IllegalLiquor#CrimeNews#Raid
भारत-इंग्लंड टी-२० महिला क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना आज इंग्लडमध्ये टॉन्टन इथं खेळला जाणार आहे. मालिकेतला पहिला सामना भारतानं आणि दुसरा इंग्लंडनं जिंकल्याने, आजच्या निर्णायक सामन्याची उत्कंठा कायम आहे.
#INDWvsENGW#TeamIndia#WomenCricket#Cricket
🏸 सात्विक-चिराग यांची सिंगापूर ओपनवर मोहोर! 🇮🇳🏆
सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं शानदार कामगिरी करत सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं.
#SingaporeOpen | @BAI_Media
कांद्याच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे शेतकरी तीव्र आर्थिक संकटात सापडला असून, केंद्रसरकारनं शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटी रुपयांचं पुनरुज्जीवन पॅकेज जाहीर करावं अशी मागणी राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
#OnionFarmers#OnionPrices#FarmersCrisis#Agriculture
जनरल एन.एस. राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.
नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली.
गेल्या वर्षी ३१ जुलै रोजी लष्कर उपप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले.
📸 #CDSGenSubramani
#Pune : पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांची संख्या २२ वर पोहोचली असून, या प्रकरणात जबाबदार १० जणांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या २२ जणाचं निलंबन करण्यात आलं.
#IllegalLiquor#AlcoholTragedy
मनोज जरांगे,तुम्ही आमचे जवळचे स्नेही आहात आणि मराठा समाजाचा खंबीर आवाजआहात.तुमच्या या लढ्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे,पण माझीतुम्हाला कळकळीची विनंती आहे की,कृपया या कडक उन्हात तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊनये.तुम्ही आंदोलनाला सावलीत बसावे आणि स्वतःच्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी
#Pune : पुणे इथे भेसळयुक्त दारू प्यायल्यामुळे १४ जणांचा मृत्यू झाल्या प्रकरणी पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस विभाग तसंच, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण २२ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
#SpuriousLiquor#PoliceAction#ExciseDepartment
पुणे पिंपरी चिंचवड शहरातील विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. स्थानिक प्रशासनाला कठोर कारवाई करून या दुर्घटनेच्या मुळाशी जाण्याचे आदेश देण्यात की आले आहेत. चौकशी करून आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे.
कुस्तीपटू विनेश फोगटचा आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तिला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी ३० आणि ३१ मे रोजी होणाऱ्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने आज दिली.
#VineshPhogat#AsianGames#Wrestling#SupremeCourt#SportsNews
क्रिकेटच्या मैदानावर विक्रमांची बरसात करणारा सचिन तेंडुलकर आता स्वयंपाकघरातही चाहत्यांची मनं जिंकताना दिसला. पारंपरिक उकडीचे मोदक स्वतः बनवत सचिनने खास मराठमोळा अंदाज दाखवला असून त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
#SachinTendulkar#UkdicheModak#MasterBlaster
सरकारच्या शिष्टमंडळाची रुपरेषा कशी आहे हे मला माहित नाही. आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार. 29 मे पूर्वी सर्व मागण्या मान्य करा असं आम्ही सांगितलं होतं. आश्वासन नको बाबा. आश्वसानवर माझ्या समाजाच्या लेकराचं पोट भरणार आहे का? उपोषण फायनल आहे. आधी तीन वर्ष, आता 10 महिने थांबलो आहे.
केरळमध्ये सहा जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी
आज सकाळपासून केरळ आणि लक्षद्वीपमधील अनेक ठिकाणी ५ ते १५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या अधिकृत आगमनाची घोषणा आज किंवा उद्या होण्याची शक्यता
#Kerala#RainAlert#Monsoon#WeatherUpdate
पुण्यातील मृत्यूंबाबत पोलीस आयुक्तांशी माझं बोलणं झालं आहे. पुण्यातील घटना अत्यंत संवेदनशील आहे.या प्रकरणात तातडीने कारवाई सुरू करण्यात आली असून आतापर्यंत 8 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. संबंधितांवर गंभीर कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री