छात्रों के सवाल अब दबेंगे नहीं गूंजेंगे!
NSUI महाराष्ट्र राज्य आयोजित “छात्रों की गूंज” पत्रकार परिषद में छात्र समस्याओं, संघर्षों और अधिकारों की आवाज बुलंद होगी।
-कांग्रेस भवन, नाशिक
- 10 जुलाई 2026
- दोपहर 1:00 बजे
#ChhatronKiGoonj#छात्रों_की_गूंज#NSUI#NSUIMaharashtra
आज सातत्याने होत असलेल्या NEET व JEE पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर NSUI तर्फे “छात्रों की गूंज” या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच त्यांच्या प्रत्यक्ष समस्या जाणून घेण्यासाठी विविध खाजगी क्लासेसना भेट देण्यात आली.
या भेटीदरम्यान पेपर फुटीनंतर विद्यार्थी व पालकांची मानसिक अवस्था काय असते याची सखोल माहिती घेतली. अनेक विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली नैराश्य, तणाव व भविष्यासंबंधी असलेली अनिश्चितता यावर चर्चा करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या इतर शैक्षणिक व मानसिक समस्यांवरही सविस्तर संवाद साधण्यात आला.
“छात्रों की गूंज” या मोहिमेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचा NSUI चा प्रयत्न असून, विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटना ठामपणे उभी आहे. पेपर फुटीसारख्या गंभीर प्रश्नांवर कठोर कारवाई व्हावी व विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी NSUI संघर्ष सुरूच ठेवेल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
– ॲड. कौस्तुभ पाटील
जिल्हाध्यक्ष, NSUI जळगाव
'वळताई पठार ट्रेक'मधून युवकांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश
कोल्हापूर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेस (NSUI) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'वळताई पठार ट्रेक' या उपक्रमात आज अनेक युवक-युवतींसह सहभागी झालो. निसर्ग, पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणारा विद्यार्थी कॉँग्रेसचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या कोल्हापूर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उत्स्फूर्त सहभाग नोंदवणाऱ्या सर्व युवक-युवतींचे मनःपूर्वक अभिनंदन.
रविवार, 5 जुलै, 2026 स्थळ- वळताई पठार, गगनबावडा
छात्रों की गूंज – यशस्वी आयोजन! ✊📚
आज एनएसयूआय यवतमाळच्या वतीने "छात्रों की गूंज" या विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे नेतृत्व एनएसयूआय यवतमाळ जिल्हाध्यक्ष गौरव राठोड यांनी केले.
या संवाद सत्रात विद्यार्थ्यांच्या समस्या, अडचणी, सूचना, बेरोज़गारी आणि शिक्षण व्यवस्थेशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार श्री. बाळासाहेब मंगुळकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. सचिनजी नाईक, एनएसयूआय नागपूर जिल्हाध्यक्ष आयुष नवले, एनएसयूआय प्रदेश महासचिव अजिंक्य बहादुरे तसेच युवती काँग्रेस प्रदेश सचिव आयुषीताई देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. अनिलजी गायकवाड आणि पार्थ अकॅडमीचे संस्थापक श्री. श्रीकांत आडे यांचे मनःपूर्वक आभार.
शिक्षणाचा आवाज बुलंद करण्यासाठी NSUI सदैव कटिबद्ध आहे.
NSUI चे बब्बर शेर! शाब्बास पठ्ठ्याहो!
महाराष्ट्रातील TET पेपरफुटी प्रकरणाविरोधात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या वाहनाला काळे झेंडे दाखवत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेल्या विश्वासघाताविरोधात NSUI ने केलेल्या आक्रमक आंदोलनाचे नेतृत्व करणारे NSUI महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, अभिजीत मोरे, पृथ्वीराज चव्हाण, विश्वभूषण पाटील, आदित्य चंदनकर आणि अभिजीत गोरे यांचा आज टिळक भवन येथे सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी निर्भीडपणे रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या या पदाधिकाऱ्यांनी अन्यायाविरोधात उभारलेला लढा हा संपूर्ण विद्यार्थी चळवळीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे धैर्य, जिद्द आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी निश्चितच कौतुकास्पद आहे.
जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेस स्वस्थ बसणार नाही. सत्तेशी लढणार, भिडणार! लढणाऱ्या प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यामागे मी ठामपणे उभा आहे..
@nsui@Maharashtransui
NSUI चे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे,पृथ्वीराज चव्हाण,अभिजीत मोरे,विश्वभूषण पाटील, आदित्य चंदनकर तसेच इतर सहकाऱ्यांनी काल विधानभवनासमोर TET पेपर फुटीला जबाबदार असणाऱ्या शिक्षणमंत्री दादा भूसे यांची गाडी अडवून जाब विचारला, व त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
या यशस्वी आंदोलनानंतर आज मुंबई तील टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांनी राहूल गांधी यांच्या या सर्व ‘बब्बर शेर’ कार्सकर्त्यांचा सत्कार केला.
@Maharashtransui@nsui
"TET पेपरफुटी" विरोधात भव्य विद्यार्थी आंदोलन!
📢 सर्व TET परीक्षार्थी विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमींना आवाहन!
📅 दि. : १ जुलै २०२६
🕚 वेळ: सकाळी ११:०० वा.
📍 स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला.
अक्षय राऊत 7219584604
प्रसाद धुमाळे 96898 68137
प्रथमेश इंगळे 86691 70160
चलो अकोला - MPSC - TET - NEET सारख्या परीक्षा लिक करून आमचे भविष्य उध्वस्त करणाऱ्यांच्या विरोधात
उद्या दि. 1 जुलै 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता.
स्थळ. जिल्हाधिकारी कार्यालय अकोला.
अक्षय राऊत 7219584604
प्रसाद धुमाळे 9689868137
प्रथमेश इंगळे 8669170860
हम एक है तो सेफ है।
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला NSUI चे अध्यक्ष प्रथमेश इंगळे पाटील यांनी आज आदरणीय आमदार अमित झनक साहेब यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या वतीने बॅक पेपर परीक्षा शुल्क ₹100 वरून ₹500 करण्यात आल्याच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले. विद्यार्थ्यांवर पडणारा आर्थिक भार लक्षात घेऊन हे शुल्क पूर्ववत ₹100 करावे किंवा त्यामध्ये योग्य ती कपात करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आमदार अमित झनक साहेब यांनी विद्यार्थ्यांची बाजू गांभीर्याने ऐकून घेतली आणि विद्यापीठाचे सदस्य म्हणून कुलगुरूंशी चर्चा करून विद्यार्थी प्रतिनिधी व कुलगुरू यांची बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईत #TET पेपरफुटी विरोधात काँग्रेस आंदोलन.
शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्यासाठी घोषणाबाजी
काल #NSUI ने शिक्षणमंत्री दादा भुसे यांची गाडी अडवून त्यांना काळे झेंडे दाखवले होते.
@INCHarshsapkal
महाराष्ट्र में TET परीक्षा का कथित पेपर लीक मामला शिक्षा व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े कर रहा है।
इसी मुद्दे को लेकर आज NSUI कार्यकर्ताओं ने शिक्षा मंत्री दादा भुसे को काले झंडे दिखाकर विरोध जताया और उनके इस्तीफे की मांग की। उनका कहना है कि छात्रों के भविष्य से किसी भी तरह का समझौता स्वीकार नहीं किया जाएगा...
Today in Mumbai NSUI Students Wing of Congress Party Protest on TET paper leak in Maharashtra show the black flag to Maharashtra Education Minister Dadaji Bhuse.