भावपूर्ण श्रद्धांजली!💐
भारताचे माजी पंतप्रधान स्व.डॉ मनमोहन सिंग यांचे दुःखद निधन झाल्याची वार्ता अतिशय दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
#ManmohanSingh#rip#passesaway
राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो.
माझे जुने सहकारी बाबा सिद्दीकी यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. बाबा सिद्धीकी आणि मी मंत्रिमंडळात एकत्र कामही केले होते.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏
काँग्रेस पक्षाचे नेते, न्याययोद्धा खासदार राहुलजी गांधी यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.
आपणांस उदंड, निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच, श्री सिद्धेश्वर चरणी प्रार्थना.
#HappyBirthday#RaGa#RahulGandhi
दिव्यांग गौस बारावीत "फस्ट "क्लास 👌
लातूर - महापूर येथील दिव्यांग गौस शेख या जिद्दी तरुणाने आपल्या दिव्यांगपणाचा बाऊ न करता पायाने पेपर लिहून इयत्ता 12 वी विज्ञान शाखेची परीक्षा 78% मार्क घेऊन उत्तीर्ण झाला आहे. खरच गौसचे मनस्वी अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीस खूप शुभेच्छा.