वटसावित्रीच्या दिवशी सात जन्म हाच पती मिळवा म्हणून पूजा तर
दुसऱ्या बाजूला दारूमुळे उद्ध्वस्त करणारा संसार!
आज दिवसभरातील या फोटोने मन खिन्न होत.
हातात पूजा,पण मनात आर्त हाक "दारू बंद करा अन आमचा संसार वाचवा!"
अनेक महिलांसाठी खरी लढाई वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारण्याची नसते तर
आमदार फुटले
खासदार फुटले
पक्ष फुटले
पेपरही फुटले
या #फुटाफुटीच्या खेळात मात्र फक्त सामान्य माणूस उध्वस्त झाला.
नेते बदलले, पक्ष बदलले, सत्ताही बदलली
नेत्यांची घरं भरली आणि सामान्य माणसाचं घर रिकामं होत गेलं.
आता फक्त सामान्य माणसाचा संयम फुटायचा बाकी आहे!
अभिनंदन, 'डबल महाराष्ट्र केसरी' हर्षवर्धन सदगीर !
६८व्या 'महाराष्ट्र केसरी'वर नाव कोरल्याबद्दल पैलवान हर्षवर्धन सदगीर याचे मनःपूर्वक अभिनंदन !
दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकत 'डबल महाराष्ट्र केसरी' होण्याचा बहुमानही हर्षवर्धनने मिळवला असून त्याबद्दल त्याचे विशेष अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा !
#महाराष्ट्रकेसरी2026
आज एक महिना झाला…
ज्या क्षणी अजित दादांच्या जाण्याची बातमी समोर आली, त्या दिवसापासून अख्खा महाराष्ट्र हळहळत आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एक नेता गेला नाही, तर अनेकांच्या आयुष्यातील आधारवड हरपला.
त्यांच्या कामाचा वेग, निर्णयक्षमता आणि लोकांप्रती असलेली बांधिलकी ही नेहमीच प्रेरणादायी राहील. आजही प्रत्येक कार्यकर्त्याच्या आणि नागरिकांच्या मनात त्यांच्या आठवणी जिवंत आहेत.
काळ पुढे जातो, पण काही व्यक्ती काळाच्या पलीकडे जाऊन स्मरणात राहतात…
अजित दादा त्यापैकीच एक.
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
#ajitdadapwar
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजा नव्हते, तर ते एक विचार होते… स्वाभिमानाचा, न्यायाचा आणि सर्वसमावेशकतेचा विचार.
महाराजांनी स्वराज्य उभे केले ते सत्ता मिळवण्यासाठी नव्हे, तर प्रजेचा सन्मान आणि सुरक्षेसाठी.
त्यांनी स्वराज्य घडवताना तलवारीपेक्षा अधिक धारदार शस्त्र वापरले ते म्हणजे न्याय, दूरदृष्टी आणि सर्वसमावेशकता.
त्यांच्या स्वराज्यात जातीपेक्षा कर्तृत्व मोठे होते, धर्मापेक्षा मानवता श्रेष्ठ होती आणि सत्तेपेक्षा प्रजेचा सन्मान महत्त्वाचा होता. त्यामुळेच त्यांचे नाव आजही प्रत्येकाच्या हृदयात समान आदराने घेतले जाते.
परंतु आजच्या काळात त्यांच्या विचारांपेक्षा त्यांच्या नावाचा वापर जास्त होताना दिसतो. महाराजांचे स्मरण केवळ घोषणांनी नव्हे, तर समाजात एकोपा निर्माण करून, अन्यायाविरुद्ध ठाम उभे राहून आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्यात आहे.
या शिवजयंतीनिमित्त आपण भेदाभेद विसरून, एकत्र येऊन, त्यांच्या स्वराज्याच्या मूल्यांना आपल्या आयुष्यात जागा देण्याचा निर्धार करूया.
इतिहासाचा अभिमान बाळगूया, पण भविष्य घडवण्यासाठी त्यांच्या विचारांचा आधार घेऊया.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🚩
आदरणीय दादा,
तुम्ही नेहमी म्हणायचा “माझ्या डिक्शनरीत ‘सावकाश’ हा शब्दच नाही.” आणि कदाचित म्हणूनच, दादा, तुम्ही जाण्याचीही इतकी घाई केलीत…
तुम्ही महाराष्ट्राला पोरके करून गेलात.
आज संपूर्ण राज्य हळहळ व्यक्त करत आहे,
सामान्य माणसाच्या डोळ्यात अश्रू आहेत,
पण दादा,
तुमच्या जाण्यानंतर अवघ्या तीन दिवसांचाही दुखवटा पूर्ण होत नाही, चितेवरील निखारे विझलेले नाहीत तेच तुमचे काही सहकारी सत्तेच्या चर्चा करू लागलेत!
दादा, हे सगळं तुम्ही पाहताय ना?
तुम्ही नेहमी सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठीच घाई करायचा!
पण आज ही घाई कशासाठी आहे?
सत्तेसाठी? पदासाठी? की खुर्चीसाठी?
💔
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल पाहण्यासाठी आज सकाळपासून
सर्वच Digital News Media ने आपापल्या शैलीत, वेगवेगळ्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न केला, हे मान्यच. त्यासाठी सर्वांचेच अभिनंदन!
परंतु श्रोते म्हणून आपलीही जबाबदारी आहे की चांगल्या कामाचं कौतुक करून काही त्रुटी असतील तर त्या शांतपणे अधोरेखित करणं.
आज दिवसभर विविध News channels वर निकाल पाहताना एक बाब प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे मतमोजणी सुरू होऊन काही तासही झाले नव्हते, तेच काही channels ने जणू काही तासांतच सर्वच निकाल जाहीर झाल्याचा आभास निर्माण केला.
त्यामुळे अनेक प्रेक्षक संभ्रमावस्थेत सापडले, हेही तितकंच वास्तव आहे.
निवडणूक अधिकारी यांच्या निर्णयाच्या अगोदरच सर्व चित्र स्पष्ट होत होते. अगदी BMC चा निकाल रात्री अगदी 9 पर्यंत चालू असतांनाही दुपापर्यंत घोषित झाल्याचा भासवले.
मात्र आज शांतपणे, कोणतीही अनावश्यक घाई न करता, स्क्रीनवर अचूक आकडेवारी, स्पष्ट माहिती आणि संतुलित राजकीय विश्लेषण मांडण्याचं काम Mumbai Tak ने केलं, हे आवर्जून नमूद करावंसं वाटतं.
अचूकता, संयम आणि प्रेक्षकांचा विश्वास जपणारी ही पत्रकारिता नक्कीच कौतुकास्पद वाटली. त्यासाठी @mumbaitak च्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन!
@AnujaDhakras21@AbhijitKaran25
@Harshdaparab
#लोकशाहीची व्याख्या जी आजच्या काळात किती योग्य वाटते यासाठी....
“लोकांचे,लोकांसाठी,लोकांनी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही” - अब्राहम लिंकन
"रक्ताचा एकही थेंब न सांडता, शांततेच्या मार्गाने समाजामध्ये मूलभूत व क्रांतिकारी बदल घडवून आणू शकणारी व्यवस्था" - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आज तब्बल 8 ते 10 वर्षानंतर राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी निवडणूक पार पडली.
सकाळपासून ते अगदी मतदानाची वेळ संपेपर्यंत सोशल मीडियावर विविध भागांतील बोगस मतदार, दडपशाही, गुंडशाही, पैसे वाटप, मतदान केंद्रांत उमेदवारांच्या नावाच्या अंगावर लावलेल्या चिठ्ठ्या तर काही पक्षांचे प्रमुख नेते व मंत्री तर मतदान प्रक्रियेत उघडपणे शर्टावर पक्षचिन्ह लावून सहभागी झाल्याचे दृश्य सर्वांनी पाहिले. असे असंख्य व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाले.
प्रत्येक निवडणुकीत काही ठळक मुद्दे समोर येतातच. पण यंदाच्या निवडणुकीत एक अत्यंत धक्कादायक बाब प्रथमच समोर आली ती म्हणजे मतदानानंतर बोटाला लावली जाणारी शाही.
गेल्या अनेक वर्षांपासून चार-पाच दिवस न निघणारी ही शाही, यंदा मात्र काही तासांतच सॅनिटायझर, नेलपेंट रिमूव्हरसारख्या केमिकल्सने सहज पुसली जात असल्याचे अनेक व्हिडिओंमधून स्पष्ट झाले.
हे सर्व पुरावे खुलेआम सोशल मीडियावर उपलब्ध असताना मात्र प्रश्न पडतो तो या पुराव्यांच पुढे काय होत त्याचा!
आचारसंहितेचा भंग झाला म्हणून निवडणूक आयोगाने किंवा स्थानिक प्रशासनाने एकतरी ठोस कारवाई केली का?
दिवसभरात अशी एकही बातमी वाचायला मिळाली नाही हीच खरी लोकशाही संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.
बोटावरची शाही म्हणजे लोकशाहीचा पुरावा जर काही तासांतच पुसला जाऊ शकत असेल, तर उद्या लोकशाहीच पुसली जाणार नाही ना?
आज प्रश्न फक्त शाहीचा नाही.
प्रश्न आहे निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाचा.
प्रश्न आहे प्रशासनाच्या निष्पक्षतेचा.
प्रश्न आहे लोकशाही जिवंत आहे की केवळ कागदावर उरली आहे, याचा.
लोकशाही म्हणजे फक्त पुस्तकांत वाचण्यापुरती संकल्पना, शाळा-महाविद्यालयांत शिकवली जाणारी आणि भाषणांत मांडली जाणारी व्याख्या म्हणून उरणार का? आणि
आचारसंहितेचा भंग हा शब्द फक्त निवडणुकीनंतरच्या अहवालांत वाचण्यापुरताच मर्यादित राहणार का?
आज शांत राहिलो, तर उद्या प्रश्न विचारण्याचाही हक्क शिल्लक राहील का?
हा प्रश्न प्रत्येक सजग नागरिकाने स्वतःलाच विचारायला हवा!
असो,
लोकशाही प्रक्रियेत सहभाग घेऊन चुकीच्या गोष्टी समोर आणण्याची हिम्मत दाखवलेल्या सर्वच सजग नागरिकांचे अभिनंदन!
@ECISVEEP@MaharashtraSEC
#MunicipalCorporationElection2026
सरत्या वर्षाला निरोप… #2025
आनंद-दुःख, यश-अपयश, अनुभव-आठवणी यांचा साक्षीदार ठरलेलं हे वर्ष आज निरोप घेत आहे.
काही क्षणांनी हसवलं, काही क्षणांनी अंतर्मुख केलं;
पण प्रत्येक दिवसाने काही ना काही शिकलेय.
ज्यांनी भरभरून दिले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि जे राहून गेलं त्यातून नक्कीच बोध घेतलेला आहे.
नव्या वर्षाकडे आशेने पाहत सरत्या वर्षात ज्ञात अज्ञात, हितचिंतक, सर्वांचे मनापासून आभार!
#byebye2025
शरद पवार साहेबांचा ८५ वा वाढदिवस…
राजकारण आणि समाजकारणात पवार साहेबांइतका अनुभवी, परिपक्व आणि दूरदर्शी नेता आजच्या काळात शोधूनही सापडणे कठीण. वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी राजकारणात जीवनात प्रवेश करून, स्वकौशल्य, शिस्त, परखडपणा आणि राजकीय चातुर्य यांच्या जोरावर त्यांनी स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले जे आजही टिकून आहे.
अर्धशतकाहून अधिक काळ अतूट ऊर्जा, कार्यशक्ती आणि दूरदृष्टी जपत ते आजही देशाच्या राजकीय-सामाजिक प्रवाहाला दिशा देत आहेत.
या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी कधीही आपल्या विचारधारेवर तडा जाऊ दिला नाही. कोणत्याही परिस्थितीत मूल्यांशी तडजोड न करता न्याय, विकास आणि सर्वसमावेशकता यांचाच मार्ग त्यांनी निवडला आणि पुढेही तोच मार्ग कायम राहील, याबाबतचा विश्वास आजही तितकाच दृढ आहे.
संघर्षांच्या कठीण काळात कितीही वादळं आली तरी निर्धाराने उभं राहण्याची, आणि पराभवाचाही पराभव करण्याइतकी दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगण्याची प्रेरणा मिळते. नव्हे तर या कठीण काळात ही आश्वासक चेहरा म्हणुन स्वतः मधील आत्मविश्वास ते ढळू देत नाहीत. म्हणून लाखो युवकांसाठी ते आजही आदर्श आहेत.
काळाच्या पुढे विचार करणारे, नवतंत्रज्ञानाची जाण असलेले आणि कृषी क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारे दूरदर्शी नेते म्हणूनही पवार साहेबांची ओळख तितकीच अढळ आहे.
जगभरात एआय क्रांती सुरू असताना ही बदलणारी तंत्रज्ञानलाट कृषीक्षेत्रात कशी उपयोगी पडू शकते हे त्यांनी सिद्ध केले. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे उसाच्या पिकामध्ये एआय-आधारित तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उत्पादनक्षमता वाढवण्याचे यशस्वी प्रयोग आजही सुरू आहेत.
कृषी क्षेत्राशी त्यांचं नातं आणि वैज्ञानिक दृष्टी आजही पूर्वीइतक्याच तेजाने झळकत आहे.
साहेबांना ८५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…
त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
@PawarSpeaks साहेब
#sharadpawar85
(मुद्दामून आज स्वतः काही अंतरावरून काढलेला हा फोटो शेअर करतो.)
एक काळ होता...!
“हाताचा पंजा” म्हटले की उमेदवार कोण? कुठला? कोणत्या जातीचा?हे सगळे गौण ठरायचे.
केंद्रापासून ते गावच्या गल्ल्यांपर्यंत काँग्रेसची सत्ता होती. देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाची धुरा, सोनियाजी गांधी यांच्या शांत पण सक्षम नेतृत्वाखाली मजबुतीने चालत होती.
राजकारणाचा 'र' ही कळत नव्हता तेव्हापासून ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर सोनिया गांधीच्या भारदस्त आवाजातील भाषणे, मोठमोठ्या सभा पाहत आलोय.
कोणी त्यांना इटलीची बाई म्हणलं, कोणी काँग्रेसची विधवा, तर कोणी काहीही बोलून चारित्र्यावर शिंतोडे उडवले! परंतु त्या कधीही डळमळल्या नाहीत.
विशेष म्हणजे या अपमानांचा त्यांनी कधीही राजकीय भांडवल केले नाही.
कोणी काही बोललं म्हणून त्या कुठे रडल्या नाही की स्वतःचं दु:ख बाजारात मांडलं.
भारतीय वंशाचा एखादा नागरिक परदेशात आमदार, महापौर, मंत्री झाला तर आपण त्याचा अभिमानाने उल्लेख करतो.
पण इटलीतून भारतात ५७ वर्षांपूर्वी विवाह करून या देशाशी नाळ जोडणारी, पती राजीव गांधी यांच्या निधनानंतरही इथेच राहून भारताला पूर्ण मनाने स्विकारणारी अशी महिला तिला आजही काही लोक भारताची नागरिक म्हणून स्वीकारायला तयार नाहीत… ही खरी शोकांतिका आहे.
(या ठिकाणी स्व. सिंधुताई सपकाळ यांच एक वाक्य आठवते. सिंधुताई सपकाळ अर्थात माई म्हणायच्या ह्या देशात जर मोठ व्हायचे असेल तर त्याला आधी माराव लागत!) ही खरी या व्यवस्थेची शोकांतिका आहे. असो...
सहनशीलता हा भारतीय स्त्रीचा गुण आहे आणि सोनिया गांधी यांचे मध्ये दिसून येतो. त्यामुळेच ह्या आजही चारित्र्यावर कितीही हल्ले झाले तरी कणखरपणे उभ्या आहेत.
Fan शब्दाचाही अर्थ ठाऊक नव्हता, तेव्हापासून ह्या महिला नेतृत्वाला आदराने पाहत आलो त्या सोनिया गांधींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
(त.टीप : राजकारणात प्रत्येकाचा काळ ठरलेला असतो. सत्ता येते जाते, पण त्या काळात काय केलं याची नोंद इतिहास कायम ठेवतो.)
@INCIndia@INCMaharashtra@RahulGandhi
अधिक माहितीसाठी
https://t.co/ooYmHQvL5k
असंघटित कष्टकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे ज्येष्ठ नेता डॉ. बाबा आढाव (९५) यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे.
पेशाने डॉक्टर असलेल्या बाबांनी पुण्यातील नानापेठ येथे वैद्यकीय सेवा करताना कामगारांचे संघर्ष, वेदना आणि अन्याय जवळून पाहिले. या अनुभवातूनच त्यांनी डॉक्टरकीचा व्यवसाय सोडून संपूर्ण आयुष्य कामगारांच्या हक्कांसाठी लढण्यास अर्पण केले.
महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा खोलवर पगडा असलेल्या बाबांनी समता, स्त्री-अधिकार, जातीय निर्मूलन आणि ‘एक गाव, एक पाणवठा’ चळवळीचे नेतृत्व करत समाजसुधारणेला दिशा दिली.
हिमाल पंचायत, रिक्षा पंचायत, मोलकरीण पंचायत, कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायत, बांधकाम कामगार पंचायत, टेम्पो पंचायत अशा अनेक संघटनांच्या माध्यमातून त्यांनी असंघटित कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी अखेरच्या श्वासापर्यंत तळमळीने काम केले.
समाजकार्याचे शिक्षण घेत असताना बाबांचे कार्य जवळून अभ्यासण्याची संधी मिळाली. असंघटित कामगारांच्या समस्या, कौटुंबिक अडचणी, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षितता या प्रत्येक क्षेत्रातील बाबांचा अभ्यास विलक्षण सखोल आणि समर्पित होता.
अगदी पुण्यातील कामगारांना स्वस्त, पौष्टिक जेवण उपलब्ध करून देणारी ‘कष्टाची भाकरी योजना’ ही देखील बाबांचीच कल्पना होती.
डॉ. बाबा आढाव यांनी असंघटित कामगारांसाठी केलेले बहुमोल कार्य इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल, यात कोणतीही शंका नाही.
बाबांच्या कार्याला विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली!
#बाबाआढाव #कामगारांचानेता