समाजाला भेडसावणाऱ्या गरीबी, बालमृत्यू, कुपोषण, लिंगविषमता आणि लोकसंख्यावाढ अशा समस्या समूळ नष्ट करण्याची क्षमता साक्षरतेमध्ये आहे.यामुळेच त्याला प्रोत्साहन मिळावे या हेतूने आंतरराष्ट्रीय स्तरावर आज साक्षरता दिन साजरा केला जातो.यानिमित्ताने निरक्षरांना साक्षर करण्याचा संकल्प करु.
गणेशोत्सवाच्या काळात आपल्या घरात रहायला आलेला बाप्पा आज आपला निरोप घेतोय.यंदा कोरोनाचे संकट असल्यामुळे श्रीगणेशाचे विसर्जन करताना काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.
गणेशोत्सवाच्या काळात आपल्या घरात रहायला आलेला बाप्पा आज आपला निरोप घेतोय.यंदा कोरोनाचे संकट असल्यामुळे श्रीगणेशाचे विसर्जन करताना काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. अभिमान परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
सण आनंदाचा, सण कृतज्ञतेचा, सण बळीराजाच्या जिव्हाळ्याचा...
बैलपोळा सणानिमित्त सर्व शेतकरी बंधूंना मनःपूर्वक शुभेच्छा!
'बळीराजा' सुखी, समृद्ध व संपन्न व्हावा ही प्रार्थना🙏
बहुत ग़ुरूर है दरिया को अपने होने पर
जो मेरी प्यास से उलझे तो धज्जियाँ उड़ जाएँ
- राहत इंदौरी
प्रख्यात शायर राहत इंदौरी यांचे निधन झाले. अतिशय हृदयस्पर्शी कविता हे त्यांच्या साहित्याचे बलस्थान होते.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
अलविदा राहत साहेब...!
भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवणारा सर्वात मोठा लढा, सर्वात मोठे क्रांतिपर्व ९ ऑगस्ट १९४२ रोजी भारत छोडो आंदोलनाने सुरू झाले. अखंड भारतात क्रांतीची मशाल पेटली. या आंदोलनात सर्वस्व समर्पित करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना शत शत नमन!...
बहीण भावाच्या नात्याला घट्ट करणारा एक अमूल्य दिवस - रक्षाबंधन! कोरोनाच्या या संकट काळात आपले वैयक्तिक आयुष्य विसरून जनतेच्या आरोग्यासाठी आपला प्रत्येक क्षण समर्पित करणाऱ्या आरोग्य - पोलीस आदी क्षेत्रातील प्रत्येक कोविड योद्धा बहिणीस हे रक्षाबंधन समर्पित!🙏🏻🙏🏻
इयत्ता दहावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्या सर्व यशवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन. तुम्हाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.ज्यांना अपयश आले असेल त्यांनी निराश न होता पुन्हा प्रयत्न करावेत.यश तुमचंच आहे.