खंडू, एक गोष्ट लक्षात ठेव..
चांगुलपणा आणि स्वतःला पायदळी तुडवू देणं यात फरक असतो.
हेच दुसऱ्याला जर समजावून सांगायचे झाल्यास,
"सगळे चांगल्या दगडालाच ढुंगण पुसतात" ही म्हण. म्हणजेच: लोक बहुतेक वेळा शांत, समजूतदार, सहनशील माणसालाच गृहीत धरतात.
"मुलींची योग्य प्रकारे जोपासना केली पाहिजे कारण तीच पुढील पिढीची जननी असते आणि जर भावी पिढी तेजस्वी, सामर्थ्यवान तसेच राष्ट्राला पारतंत्र्यातून मुक्त करण्यास समर्थ व्हावी असे वाटत असेल तर मुलींकडेही तितक्याच जिव्हाळ्याने व दक्षतेने लक्ष दिले पाहिजे."
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्त्री सक्षमीकरणाकडे केवळ "स्त्री-पुरुष समानता" या पाश्चात्त्य चौकटीतून पाहिले नाही तर राष्ट्रनिर्मिती, सामाजिक पुनरुत्थान आणि सांस्कृतिक स्वाभिमान या व्यापक संदर्भांतून पाहिले. सावरकरांचे स्त्रीविषयक विचार हे पारंपरिक भारतीय मूल्ये, आधुनिक विवेकवाद, राष्ट्रवाद आणि सामाजिक सुधारणा यांचा संगम दर्शवतात. सावरकरांनी स्त्रीचे स्थान नेहमीच राष्ट्ररचनेच्या केंद्रस्थानी मानले. सावरकरांच्या मते पुढील पिढीची घडण ही स्त्रीच्या हातात असल्यामुळे राष्ट्राचे सामर्थ्य स्त्रीच्या सामर्थ्यावर अवलंबून आहे.
भारतीय समाजात त्या वेळी मुलगा-मुलगी भेद अत्यंत खोलवर रुजलेला होता. मुलगा हा वंशाचा दिवा तर मुलगी ही ओझे अशी मानसिकता समाजात होती. सावरकरांनी या विचारसरणीवर कठोर प्रहार केला. सावरकरांच्या मते मुलींकडे दुर्लक्ष करणे ही केवळ कौटुंबिक चूक नसून राष्ट्रद्रोही मानसिकता आहे. कारण जी मुलगी उद्या माता होणार आहे तीच पुढच्या पिढीचे संस्कार घडवणार आहे. स्त्रीशिक्षणाबाबत सावरकरांचे विचार त्या काळासाठी अत्यंत प्रगतिशील होते. स्त्रीशिक्षण असे असावे की ज्यामुळे स्त्री अधिक विवेकी, स्वाभिमानी, कर्तृत्ववान आणि राष्ट्राभिमानी बनेल. पुढील पिढी अधिक बलवान, सुंदर, सुसंस्कृत आणि देशभक्त व्हावी यासाठी स्त्रियांना योग्य शिक्षण दिले पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते.
बालविवाह, विधवांवरील अन्याय आणि स्त्रीवरील दुहेरी नैतिक निकष यांनाही सावरकरांनी विरोध केला. त्यांच्या काळात बालविवाहामुळे असंख्य मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि आयुष्य उद्ध्वस्त होत होते. म्हणूनच त्यांनी मुलींचे विवाह योग्य वयातच व्हावेत असा आग्रह धरला. त्यांनी बालविधवांच्या दुःखावर कविता लिहून समाजाला प्रश्न विचारले. सावरकरांच्या स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनात शारीरिक सामर्थ्यालाही महत्त्व होते. त्यांनी स्त्रियांना मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम होण्याचा सल्ला दिला. सावरकर स्त्रियांच्या आत्मविश्वासपूर्ण आणि स्वसंरक्षणक्षम व्यक्तिमत्त्वाचे समर्थक होते.
इतिहासातील वीरांगनांचे उदाहरण देऊन त्यांनी स्त्रियांना प्रेरणा दिली. राणी लक्ष्मीबाई, महाराणी ताराबाई, राणी दुर्गावती यांसारख्या स्त्रियांचे पराक्रम त्यांनी गौरवले. सावरकरांना भारतीय स्त्रीमध्ये धैर्य आणि राष्ट्रनिष्ठा पाहायची होती. त्यांच्या मते राष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या पुरुषांच्या मागे त्यांना धैर्य देणारी स्त्री असली पाहिजे. सावरकरांच्या नाटकांतील आणि कादंबऱ्यांतील स्त्रिया संघर्षशील, विचारशील आणि राष्ट्रनिष्ठ होत्या.
सावरकरांच्या स्त्रीविषयक विचारांवर टीकाही झाली. "स्त्रीचे मुख्य कार्य संततीपोषण आहे" या त्यांच्या विधानाचा अर्थ अनेकांनी स्त्रीला घरापुरते मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न असा घेतला. परंतु सावरकरांचा हेतू स्त्रीला कनिष्ठ ठरवणे हा नव्हता. त्यांच्या मते, मातृत्व ती स्त्रीची कमजोरी नसून तिची सर्वोच्च सर्जनशील शक्ती आहे. राष्ट्रनिर्मितीमध्ये या शक्तीचे मोठे महत्त्व आहे. योग्य क्षमता असल्यास स्त्रिया राजकारण, समाजकारण, युद्धकला किंवा कोणत्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकतात असे ते मानत. सावरकरांची पत्नी यमुनाबाई याही समाजकार्यात सहभागी होत्या. रत्नागिरीतील अस्पृष्यता निवारण, सार्वजनिक हळदीकुंकू, सहभोजन अशा उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता.
सावरकरांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन हा आधुनिक भारतीय राष्ट्रवादाच्या संदर्भात पाहिला पाहिजे. मुलींचे शिक्षण, स्त्रीचे सामर्थ्य, आत्मसंरक्षण, विधवा-विवाह, बालविवाहविरोध, स्त्रीचा सामाजिक सन्मान आणि राष्ट्रनिर्मितीतील स्त्रीची भूमिका या बाबतीत त्यांनी मांडलेले विचार अत्यंत प्रभावी आणि दूरदर्शी होते. त्यांच्या दृष्टीने आदर्श स्त्री म्हणजे केवळ गृहिणी नव्हे तर आवश्यक तेव्हा रणांगणात उतरू शकणारी, अन्यायाला प्रतिकार करणारी, संस्कारक्षम, विवेकी आणि राष्ट्राभिमानी तेजस्वी व्यक्तिमत्त्व आहे.
#स्त्री_सक्षमीकरण #स्वातंत्र्यवीर_सावरकर
कुठलेही कार्य जोवर संस्थात्मक पद्धतीने सुरू राहते तोवर ते चांगले राहण्याची शक्यता जास्त असते. एकदा का त्यात सल्लागार घुसले की वाट लागलीच समजायची.
शैक्षणिक सल्लागार, आर्थिक सल्लागार, राजकीय सल्लागार, पायाभूत सुविधा सल्लागार. यांचे सल्ले ज्यांनी घेतले ते सगळे "गार" झाले!
"जर तुमच्या रक्तात अजून क्रोध आणि उग्रता नाही तर तुमच्या नसांत फक्त पाणी वाहते. युवावस्थेचा जोश मातृभूमीसाठी नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही."
चंद्रशेखर सिताराम तिवारी उर्फ चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै १९०६ रोजी मध्यप्रदेशातील भाभरा या गावात झाला. त्यांचे वडील सिताराम तिवारी होते हे कडक शिस्तीचे होते तर आई जगरानी देवी शिक्षणप्रेमी आणि संस्कृत साहित्यात रुची असलेली होती. बालपणीच चंद्रशेखर भिल्ल मुलांच्या सहवासात धनुष्यबाण चालवणे, नेमबाजीचे प्रशिक्षण घेणे तसेच शौर्य आणि शिस्तीचे संस्कार घेत होता.
आईच्या इच्छेनुसार ते वाराणसी येथे शिक्षणासाठी गेले जिथे त्यांना व्यक्तिमत्व विकासाचा प्रारंभिक पाया मिळाला. येथेच त्यांची देशभक्ती, न्यायबुद्धी, धैर्य आणि आत्मनिर्भरतेची बीजं रोवली गेली. ही मानसिक तयारी त्यांना पुढील क्रांतिकारक जीवनात उपयोगी ठरली. १९२१ मध्ये महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनचा प्रभाव देशभर पसरला होता. १५ वर्षांच्या चंद्रशेखराने वाराणसीत या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयात त्यांनी स्वतःचे नाव आझाद, वडिलांचे नाव स्वतंत्र आणि पत्ता तुरुंग असे सांगितले. या धाडसामुळे न्यायाधीश संतापले आणि त्यांना १५ फटके मारण्याची शिक्षा सुनावली. प्रत्येक फटक्यातील वेदना सहन करत त्यांनी "भारतमाता की जय" असे जयघोष केले. या घटनेने त्यांना "आझाद" ही ओळख मिळवून दिली आणि त्यांनी ठरवले की "मी कधीही इंग्रजांच्या हाती कैद होणार नाही."
असहकार चळवळीच्या अपयशानंतर आझादांचे अहिंसेवरचे विश्वास धूसर झाले. त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला आणि हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनमध्ये सामील झाले. ९ ऑगस्ट १९२५ रोजी रामप्रसाद बिस्मिल यांच्या नेतृत्वाखाली काकोरी रेल्वे लूट यशस्वी झाली. या कारवाईतून ब्रिटिश सरकारच्या खजिन्यावर कब्जा करून सशस्त्र क्रांतीचा संदेश दिला गेला. अनेक सहकाऱ्यांना अटक झाली आणि फाशीची शिक्षा झाली परंतु आझाद स्वतः वेष बदलून पोलिसांच्या नजरेपासून दूर राहिले. पुढे विखुरलेल्या क्रांतिकारकांना एकत्र करून त्यांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन स्थापन केली आणि स्वतः संघटनेचे "कमांडर-इन-चीफ" बनले. त्यांनी संघटन कौशल्य, शस्त्रकौशल्य आणि रणनीतीचे प्रशिक्षण दिले जे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीसाठी अनिवार्य ठरले.
आझाद रणनीती आखण्यात व वेषांतर करण्यात अत्यंत निष्णात होते. झाशी जवळील ओरछा जंगलात त्यांनी "पंडित हरिशंकर ब्रह्मचारी" या नावाने वास्तव्य केले. येथे त्यांनी शेकडो तरुणांना शस्त्र चालवणे, बॉम्ब बनवणे, घेराबंदी पद्धती आणि गुप्त संपर्क याचे प्रशिक्षण दिले. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांसारख्या प्रखर क्रांतिकारकांचे ते मार्गदर्शक होते. १९२८ मध्ये लाला लाजपत राय यांच्या मृत्यूनंतर त्यांनी सांडर्सचा बदला घेतला आणि दिल्ली विधानसभेतील बॉम्बस्फोटासारख्या क्रांतिकारक कारवाया आयोजित केल्या. प्रत्येक कारवाईत आझादांचे नियोजन, दूरदृष्टी आणि नेतृत्व स्पष्ट दिसून आले.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्या काळातील सर्वच क्रांतिकारकांसाठी एक वैचारिक ऊर्जास्त्रोत होते. चंद्रशेखर आझाद यांच्या "हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन" मधील अनेक क्रांतिकारक सावरकरांच्या १८५७ चे स्वातंत्र्यसमर या पुस्तकाला प्रेरणाग्रंथ मानत असत. आझाद स्वतः सावरकरांच्या सशस्त्र क्रांतीच्या विचारांनी प्रभावित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे स्वतः सुरुवातीच्या काळात "अनुशीलन समिती" सारख्या क्रांतिकारी संघटनांशी जोडलेले होते.
२७ फेब्रुवारी १९३१ रोजी अल्फ्रेड पार्क अलाहाबाद येथे ब्रिटिश पोलिसांनी आझाद यांना वेढा घातला. पोलिसांनी त्यांना शरण येण्याचे आदेश दिले परंतु आझादांनी आपल्या कोल्ट पिस्तुलाने गोळीबार सुरू केला. जवळपास पाऊण तास त्यांनी एकट्याने संपूर्ण पोलीस दलाला रोखले. जेव्हा त्यांच्या पिस्तुलात शेवटची गोळी शिल्लक राहिली त्यांनी ती स्वतःवर झाडून "आझाद" राहण्याचे व्रत पूर्ण केले. या क्षणाने संपूर्ण देशात देशभक्तीची लाट उसळली आणि आझाद हे अमर शौर्याचे प्रतिक बनले.
चंद्रशेखर आझाद यांचे बलिदान आजही भारतीय तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी नेतृत्व, संघटन कौशल्य, धाडस आणि देशभक्ती या मूल्यांचे आदर्श भारतीय युवकांच्या मनात रुजवले. भारतमातेचे वीर सुपुत्र, सशस्त्र क्रांतिकार्याचे शिरोमणी चंद्रशेखर आझाद यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन 🙏🚩
#ChandrashekharAzad #VandeMataram
“तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण!”
- ही ओळ खऱ्या अर्थाने जगलेल्या प्रखर हिंदू धर्माभिमानी, राजकीय हिंदुत्ववाचे प्रणेते, सामाजिक क्रांतिकारक, महाकवी स्वातंत्र्यवीर सावरकार यांना त्यांच्या ६०व्या स्मृतीदिनानिमित्त त्रिवार वंदन💐🙏🏽
#VeerSavarkar
कॉर्पोरेट करियरमधे कधीही कोणा “एकाचा माणूस” होऊ नये, आपण फक्त “कामाचा माणूस” व्हायचा प्रयत्न करायचा.
याचा सुरुवातीला त्रास होतो पण लॉंगटर्ममधे करियर १००% फुलते, बहरते.
पाच लाख श्लोकांचा महाभारत ग्रंथ फक्त नऊ ओळींत समजून घ्या…
तुम्ही कोणत्याही धर्माचे असलात,
तुम्ही पुरुष असलात किंवा स्त्री,
तुम्ही गरीब असलात किंवा श्रीमंत,
तुम्ही आपल्या देशात असलात किंवा परदेशात
थोडक्यात,
तुम्ही माणूस असाल, तर महाभारतातील हे “नऊ अमूल्य मोती” अवश्य वाचा व समजून घ्या:
1. तुमच्या मुलांच्या अविचारी मागण्या आणि इच्छा योग्य वेळी रोखल्या नाहीत, तर आयुष्यात तुम्ही असहाय्य होता… “कौरव”
2. तुम्ही कितीही शक्तिशाली असलात, परंतु अन्यायाचा पाठिंबा दिलात तर तुमची शक्ती, शस्त्रे, कौशल्य आणि आशीर्वाद कोणतेही उपयोगी पडत नाहीत… “कर्ण”
3. मुलांना त्यांच्या बुद्धीचा गैरवापर करून विनाश घडविण्याइतके महत्त्वाकांक्षी बनवू नका… “अश्वत्थामा”
4. अधर्मी लोकांना कधीच संरक्षण देण्याचे वचन देऊ नका… “भीष्म पितामह”
5. संपत्ती, सत्ता, अधिकार आणि चुकीच्या लोकांचा आधार यांचा गैरवापर शेवटी पूर्ण विनाशाला कारणीभूत ठरतो… “दुर्योधन”
6. सत्तेची दोरी कधीही अंधाला—म्हणजे स्वार्थ, संपत्ती, गर्व, मोह किंवा कामाने अंध झालेल्या व्यक्तीच्या हातात देऊ नका; कारण त्याचा शेवट नेहमी विनाशातच होतो… “धृतराष्ट्र”
7. ज्ञान जर सज्ञानासोबत असेल तर विजय निश्चित आहे… “अर्जुन”
8. फसवणूक करून प्रत्येक वेळी यश मिळत नाही… “शकुनी”
9. जर तुम्ही नीतिमत्ता, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यपालन यांना सर्वोच्च स्थान दिले, तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला पराभूत करू शकत नाही… “युधिष्ठिर”
10. आणि शेवटी—
जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून सत्य, धर्म आणि पूर्ण शरणागती स्वीकारली,
तर मी स्वतः उभा राहून तुमची रक्षा करतो…
“श्रीकृष्ण”
“सर्वे भवन्तु सुखिनः — सर्वे सन्तु निरामयाः”
🙏🚩🪷🪷🚩🙏🏻
अजीब आहे पण खरे आहे!
१. इतके रंग असूनही पांढरा रंग 'क्लास' मानला जातो.
२. इतके आवाज आणि ध्वनी असूनही शांतता 'अंतिम' मानली जाते.
३. खायला इतकं सगळं असूनही उपवास (Fasting) 'आरोग्यदायी' मानला जातो.
४. प्रवास करण्यासाठी अनेक ठिकाणे असूनही एकांत ठिकाणी 'ध्यान' करणे श्रेष्ठ मानले जाते.
५. पाहण्यासाठी इतकं सगळं असूनही डोळे मिटून 'आत पाहणे' सर्वोच्च (Apex) आहे.
६. बाहेरील जगाचं सगळं ऐकत असूनही तुमच्या 'आतील आवाज' शाश्वत (Eternal) आहे.
७. एक गोड आणि आकर्षक जीवन असूनही एक शांत आत्मा हा 'सांत्वन आणि दैवी' आहे.
*तेव्हा तुमच्या जाणिवांवर (Senses) विश्वास ठेवा...