यजमान अमेरिकेचे 🇺🇸 आव्हान बेल्जियमने 🇧🇪 सहज संपवले!
४-१ च्या विजयात डी केतेलाएरेने दोन गोल केले, तर लुकाकु आणि वनाकेन यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवत संघाला पुढच्या फेरीत पोहोचवले
#FIFAWorldCup#फुटबॉल
नेदरलँड्स 🇳🇱 U21 संघाचा माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू राजीव व्हॅन ला पारा, ज्याचे भारतीय मूळ आहे, भारतात 🇮🇳 खेळण्यास उत्सुक आहे.
भविष्यात तो भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसेल का? 👀
#फुटबॉल#IndianFootball#IndianSuperLeague
फिफा विश्वचषक २०२६ मध्ये आतापर्यंत आशियाई संघानी हार पत्करलेली नाही. 🔥
आशियाई संघांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांचा सामना करताना २ विजय आणि ४ ड्रॉ नोंदवत कोरिया, ऑस्ट्रेलिया, जपान, सौदी अरेबिया,इराण, कतार या आशियाई देशांनी आपले 'अजिंक्य' स्थान कायम राखले आहे
कालचा फुटबॉल वर्ल्डकपमध्ये दिवस गाजवला तो केप व्हरदे संघाच्या गोलकीपर जो वोझिन्हा याने. हे नाव फुटबॉलच्या दुनियेत कायम अजरामर राहणार एवढं नक्की. ४० वर्षाच्या जो वोझिन्हाचा पहिलाच वर्ल्ड कप आणि पहिलीच मॅच ते पण स्पेन समोर. स्पेन सारख्या बलाढ्य संघाला एकहाती धुळ चारली आणि सामना 0-0 असा बरोबरीत राखायची नामुष्की स्पेनवर आणली. स्पेनच्या अटॅक समोर भलेभले गार होतात पण हा ४० वर्षाचा तरुण अगदी ढाल बनून लढला आणि ७ गोल वाचवले. जेमतेम ५-६ लाख लोकसंख्या असणाऱ्या देशातून येऊन स्पेन सारख्या विश्वविजेत्या संघाला बरोबरीत रोखणं ही काही लहान गोष्ट नाहीये. जो वोझिन्हा याची कामगिरी पाहून एवढं नक्की लक्षात आलं की खेळामध्ये वय हा फक्त आकडा असतो, तुम्ही कसे लढता आणि जिंकता याकडे सगळया जगाचं लक्ष असतं. ज्यांनी ही मॅच live पाहिली त्यांना नक्की समजले असेल की कोणताही लहान देश त्यांच्या चांगल्या दिवशी मोठमोठ्या विश्वविजेत्या संघांना गार करू शकतो. #मराठीफुटबॉल
🇨🇼 इतिहास घडला!
कुरासाओने फिफा विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात पहिला गोल नोंदवला.
जर्मनीसारख्या संघाविरुद्ध पहिला विश्वचषक गोल 🔥
#फुटबॉल#Curacao#FIFAWorldCup