'#वेलकम_जिंदगी ' या चित्रपटाला आठ वर्षे
छोट्या छोट्या गोष्टीत असलेला आयुष्याचा आनंद आत्महत्येच्या विचारास कसे परावृत्त करते अशा थीमवर आधारित उमेश घाडगे दिग्दर्शित 'वेलकम जिंदगी ' ( रिलीज २६ जून २०१५) च्या प्रदर्शनास आठ वर्षे पूर्ण होत आहेत.
#swapniljoshi#amrutakhanvilkar
"#एक_अलबेला " चित्रपटाला सात वर्षे
#मा_भगवानदादा यांच्या आयुष्यातील काही गोष्टींवर ( विशेषतः 'अलबेला ' हा म्युझिकल हिट चित्रपट) फोकस टाकलेला शेखर सरतांडेल दिग्दर्शित आणि डाॅ. मोनिष बाबरे निर्मित " एक अलबेला " या चित्रपटाच्या प्रदर्शनास सात वर्षे पूर्ण झाली.
#vidyabalan
गायक #राहुल_सिद्धार्थ_कांबळे ची '#चलना_आगे_काफी' पासून सुरुवात
गीत - संगीताची जादूच अशी की त्याकडे आकर्षित होणारी व्यक्ती त्या क्षेत्रात पुढे गेल्याशिवाय राहात नाही. राहुल सिद्धार्थ कांबळे हा बहुगुणी प्रतिभा असलेला तरुण उमदा गायकही याला अपवाद नाही.
#rahulsiddharthkamble
ग्लॅमरस रुपातील देखणं फोटो सेशन हे आजच्या ग्लोबल युगातील मराठी अभिनेत्रींचे खास वैशिष्ट्य आहे. आणि त्यासाठीचा फिटनेस, लूक, ड्रेस सेन्स व आत्मविश्वास या सेलिब्रिटीजमध्ये असल्याचे #पूजा_सावंत, #स्मिता_गोंदकर, #रसिका_सुनील, #श्रृती_मराठे यांच्या या फोटोत दिसतेय.
#marathifilmdata
दिग्दर्शक #दिग्पाल_लांजेकर यांच्या " #शिवरायांचा_छावा"चे चित्रीकरण पूर्ण
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा नवीन चित्रपट 'शिवरायांचा छावा' हा चित्रपट स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र, स्वराज्याचे द्वितीय राजे #छत्रपती_संभाजी_महाराज यांच्या पराक्रमावर आधारित आह
माधुरी दीक्षित म्हणजे चार्म, ब्यूटी ग्रेसफुलता आणि तजेलदारपणा यांची झक्कास केमिस्ट्री. आणि ते तिच्या अशा प्रत्येक फोटोतून दिसतेय. सोशल मिडियात फॅन्स आणि फाॅलोअर्स याबाबत #माधुरी_दीक्षित टाॅपवर आहे.
#madhuridixit#madhuridixitnene
भक्तिरसात तल्लीन करणारा '#विठ्ठल_माझा_सोबती'
विठू नामाचा गजर करणारा 'विठ्ठल माझा सोबती' हा चित्रपट भाविकांच्या भेटीस येत आहे. फक्त मराठी आणि नाईंटी नाईन प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून हा चित्रपट येत्या २३ जूनला प्रदर्शित होईल.
पुढारी अथवा #खलनायक अशी रुपेरी प्रतिमा असलेले निळू फुले खरं तर कसलेले अभिनेते आहेत. त्यांनी फार पूर्वी काही चित्रपटात नायकाची भूमिका साकारलीय, त्यात कधी दुहेरी भूमिकाही साकारलीय. #thapadya#niluphule
मराठी अभिनेत्रींनी आपल्या आकर्षक फोटो सेशनचे अतिशय उत्तम सातत्य ठेवल्याचे दिसतेय. आपल्यालाच अधिकाधिक प्रमाणात लाईक्स मिळाव्यात म्हणून त्या प्रकारच्या ड्रेस सेन्सही त्या दाखवत असल्याचे या फोटोत दिसतेय #श्रृती_मराठे, #पूजा_सावंत, #तेजस्विनी_पंडित यांची आवर्जून नावे घेता येतील.
मराठ्यांच्या पराक्रमाची तेजस्वी गाथा '#रामशेज' रुपेरी पडद्यावर
#शिवकालीन इतिहासाची पाने चाळताना अनेक शूर मावळ्यांनी गाजवलेले पराक्रम आपण वाचलेले आहेत. महाराजांनी केवळ स्वराज्य स्थापलं नाही तर त्यासाठी प्राणपणाने लढणारे, जीवाला जीव देणाऱ्या एकनिष्ठ सहकाऱ्यांची पिढी तयार केली.
फिटनेस, लूक, फॅशन सेन्स, आत्मविश्वास, लोकप्रियता, कॅमेर्याचे भान, सेक्स अपिल याची अतिशय उत्तम केमिस्ट्री म्हणजे #श्रृती_मराठे. तिच्या प्रत्येक ग्लॅमरस फोटो सेशनची सोशल मिडियात हमखास दखल घेतली जातेच आणि यालाच स्टारडम म्हणतात...
#rajkamal#vshantaram#shrutimarathe
#अमृता_खानविलकर चा ‘#चंद्रमुखी’ चित्रपट गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात रिलीज झाला होता या चित्रपटातील ‘चंद्रा’ गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. प्रेक्षकांनी चंद्रा गाण्याला भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे चित्रपट रिलीज होऊन एक वर्ष झाले तरीही या गाण्याची क्रेझ अजूनही कायम आहे