आज मातृदिन.जिच्यामुळे आपण जग पाहू लागलो तिचा आज दिवस.खरतर आजचाच नाही तर सर्वच दिवस आईचे. आज माईच्या कष्टाला डिजिटल बळ देत आहोत. गेले १५ वर्ष माई चटणी आणि मसाले या व्यवसायात आहे. चव आणि विश्वास या मूल्यांना घेवून सुरू केलेल्या व्यवसायाला डिजिटल साथ देत आहोत
#villagestory#kolhapur
#मायलेकी म्हणजे एक हळवा कोपरा ❤️
आईची आई आजी, आज्जीची आई म्हणजे पणजी...आई...आजी...पणजी...लाभण म्हणजे आपली समृद्धता असते. ज्याला लाभते तो नशिबवान ❤️
#MaylekiMasale#bonding#kolhapur
तुझ्याकडं पैसाअडका, गाडी बंगला भारीतले कपडे मोबाईल असो/नसो.. तुझं लग्नं झालेलं असो/नसो..
पण तुझ्या माथ्यावर आपल्या सावित्रीबाईंनी कोरलेली ज्ञानाची आस - आजन्म राहो..
ही चिरी कुणाच्या नावाची नाही..
ही तुझी आहे..
तुला आत्मसन्मान शिकवणारी.. 🙏 #SavitriBaiPhuleJayanti
मनोरंजन विश्वातील सोनेरी पर्व म्हणजे स्मिता पाटील. साचेबद्ध अभिनयाची चौकट मोडून स्मिताने केलेला अभिनय भावतो.तिचा #मिर्च_मसाला हा चित्रपट महिलांच्या अन्यायाविरुद्धचा लढा स्पष्ट करतो. आज स्मिताचा वाढदिवस, तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️
#SmitaPatil#maylekimasale#कोल्हापुरीचटणी