विधानपरिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी खेड-लोटे येथील पवित्र भगवान परशुराम मंदिरात जाऊन भगवान परशुरामांचे मनोभावे दर्शन घेतले.
मंदिरातील शांत, सात्विक आणि आध्यात्मिक वातावरणात दर्शन घेतल्याने मनाला समाधान, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त झाली. भगवान परशुरामांच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.
जनसेवेच्या कार्यात अधिक जोमाने आणि प्रामाणिकपणे कार्य करण्याचे बळ लाभावे, तसेच आगामी जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना भगवान परशुरामांच्या चरणी अर्पण केली.
त्यांच्या कृपाशीर्वादाने आणि जनतेच्या विश्वासाच्या बळावर ही पुढील वाटचाल अधिक सक्षम, सकारात्मक आणि लोकाभिमुख होईल, असा दृढ विश्वास आहे.
@SunetraA_Pawar@SunilTatkare@iAditiTatkare@mahancpspeaks
दरवर्षीप्रमाणे यंदाही कुटुंबियांसमवेत मोठ्या भक्तीभावाने गणपती बाप्पाचे घरी स्वागत केले. बाप्पाच्या नुसत्या दर्शनानेच सगळी दैन्य दुःख दूर होतात, मनाला नवी संजीवनी मिळते आणि पुढील सर्वआव्हानांना सामोरे जाण्याची ऊर्जा प्राप्त होते.
गणपती बाप्पा मोरया!
#गणेश_चतुर्थी #GaneshChaturthi2025
रायगड पोलीस दलामार्फत डिजिटली प्रमाणित ओळखपत्र देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. डिजिलॉकर प्रणालीचा वापर करून अतिशय सुरक्षित असलेले डिजिटली प्रमाणित ओळखपत्र देणारे रायगड जिल्हा पोलीस दल हे देशातील पहिलेच पोलीस दल ठरले याचा मला सार्थ अभिमान वाटतो.
बदलत्या काळाला अनुसरून यंत्रणेत सुरू केलेल्या या बदलांबद्दल पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.