या निरभ्र आकाशात या ताऱ्याने त्याच अस्तित्व अस काही ठसठशीत पणे उमटवल की वाटलं बास....
माणसांचं ही असच असावं कोणी सोबत असुदे अथवा नसुदे आपण अस छान दिमाखात जगायला हवं.❤️🤌
ना कोणाची साथ ना ही कसला कांगावा कितीही अंधाराशी झुंज द्यायला लागली तरीही
आजची संध्याकाळ पुन्हा एकदा मला आठवणींच्या वाटेवर घेऊन गेली..❤️
कामावरून सरळ मल्लेश्वरम येथील Sankey Tank येथे जाऊन बसले. शांत, गार वारा, तलावाच्या पाण्याचा खळखळणारा आवाज आणि ती रम्य संध्याकाळ.. सगळंच मनाला एक वेगळीच शांतता देऊन गेलं
खरं तर, या सगळ्याची खूप गरज होती.
आणि सोबत होतं अपूर्व राजपूत यांचं "तुझ्यापुढे तर काहीच नाही" हा कवितासंग्रह. त्या कविता आणि तलावाच्या काठावर वाऱ्यासोबत निवांत घालवलेला वेळ..
म्हणजे निव्वळ सुख....❤️🤌📖
कधी कधी स्वतःसोबत घालवलेला असा एखादा शांत क्षण, हजारो शब्दांपेक्षाही जास्त बोलून जातो. ❤️🤌🌿✨
#Solodate
साऊथमधली मंदिरं प्रचंड सुंदर आहेत राव....
मंदिरावरील प्रत्येक कोरीवकाम त्या सुबक नक्षी, प्रत्येक शिल्प आणि प्रत्येक तपशील कलाकाराच्या मेहनतीची साक्ष देतो. बाहेरून पाहतानाच प्रसन्न वाटतं ❤️🥰🤌
हृदयावरचा वाटत होता पाठीवरचा वार निघाला
ज्याला आपण प्रेम समजलो तो निव्वळ व्यवहार निघाला
ऐ-या गै-या शेकोट्यांवर हात शेकले अखेर पण,
ऊब अपेक्षित होती ज्यातुन तोच निखारा गार निघाला
आता आता जरा जराशी ओळख पटली म्हणे म्हणेतो
माझ्यामधुनी कोण असा हा प्रतिबिंबाच्या पार निघाला.
वैभव जोशी