📍 जिल्हा नियोजन भवन गडचिरोली
📅 १८ जून २०२६
जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. स्थानिक उत्पादनांसाठी स्वतंत्र "गडचिरोली ब्रँड" विकसित करणे, पर्यटन विकासाला चालना देणे, महिला बचत गटांना अधिक सक्षम करणे, धान साठवणुकीची क्षमता वाढविणे तसेच आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. जिल्ह्याच्या विकासासाठी मंजूर निधीचा गुणवत्तापूर्ण व परिणामकारक वापर करून विकासाचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
ही बैठक सहपालकमंत्री ॲड. आशिषजी जयस्वाल यांचा अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Adv. Ashish Jaiswal See less
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक, राष्ट्रनिष्ठ विचारांचे प्रेरणास्थान आणि हिंदुत्ववादी चळवळीचे प्रभावी मार्गदर्शक पूजनीय बाळासाहेब देवरस जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
समाज संघटन, राष्ट्रसेवा आणि सामाजिक समरसतेचा संदेश देत त्यांनी आपल्या कार्यातून असंख्य स्वयंसेवकांना प्रेरणा दिली. त्यांचे विचार आणि कार्य आजही राष्ट्रनिर्मितीच्या वाटचालीत दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करत आहेत.
त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम!
#BalasahebDeoras #RSS #Smrutidin #RashtraSeva #DrMilindNarote See less
हिंदवी स्वराज्याचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रुजविणाऱ्या, संस्कार, शौर्य आणि राष्ट्रभक्तीची अमूल्य शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
राजमाता जिजाऊ यांनी आपल्या दूरदृष्टी, कर्तृत्व आणि संस्कारांच्या बळावर स्वराज्याचा पाया रचला. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष घडवून त्यांनी संपूर्ण राष्ट्राला प्रेरणेचा अमर वारसा दिला.
त्यांचे विचार, त्याग आणि मातृत्व प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी राहतील.
राजमाता जिजाऊ यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम!
#राजमाता_जिजाऊ
#जिजाऊ_पुण्यतिथी
#हिंदवी_स्वराज्य
#स्वराज्य_प्रेरिका See less
राष्ट्रनायक महाराणा प्रताप यांना विनम्र अभिवादन!
स्वाभिमान, शौर्य, पराक्रम आणि मातृभूमीप्रती अढळ निष्ठेचे प्रतीक असलेले मेवाडचे महान योद्धा, राष्ट्रनायक महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
महाराणा प्रताप यांचे जीवन हे अन्यायाविरुद्ध संघर्ष, स्वातंत्र्याचे रक्षण आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणादायी गाथा आहे. त्यांच्या त्याग, धैर्य आणि अदम्य जिद्दीचा आदर्श प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील.
त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम!
#महाराणा_प्रताप
#महाराणा_प्रताप_जयंती
#शौर्य_आणि_स्वाभिमान
#प्रेरणादायी_इतिहास See less
📍 धानोरा
आज धानोरा येथे भेटीदरम्यान भारतीय डाकघराला भेट देऊन नागरिकांच्या विविध समस्यांची प्रत्यक्ष माहिती घेतली. पोस्टमास्तर तसेच संबंधित कर्मचाऱ्यांशी चर्चा करून नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.
शनिवारपासून तांत्रिक लिंक बंद असल्यामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले असून नागरिकांना वारंवार पोस्ट ऑफिसच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. तसेच कर्मचारी संख्या अपुरी असल्याने कामकाजावर अतिरिक्त ताण येत आहे. ग्रामीण भागातील अनेक लाभार्थ्यांचे आयडी अद्ययावत नसल्यामुळे त्यांना त्यांच्या गावातच रक्कम मिळण्यात अडचणी येत आहेत.
लाडकी बहीण योजना तसेच इतर शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना पैसे काढण्यासाठी आणि विविध कामांसाठी वारंवार पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागत असल्याची बाब समोर आली. वाढती ग्राहकसंख्या लक्षात घेता रोख रकमेची उपलब्धता वाढविणे आणि काही नियम काळानुरूप बदलणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
नागरिकांच्या समस्या शासन आणि संबंधित विभागापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यांचे निराकरण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. सर्वसामान्यांना अधिक सुलभ, जलद आणि परिणामकारक सेवा मिळाव्यात यासाठी आपण कटिबद्ध आहोत.
यावेळी ज्येष्ठ नेते श्री. अनंतजी साळवे, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. साजनजी गुंडावार, जिल्हा सविच श्री. सारंगजी साळवे, नगरसेवक गटनेते श्री. संजयजी कुंडू, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ. भूमिताताई परचाके, श्री. सुभाषजी धाईत, श्री. सुभाषजी खोबरे, श्री. विजयजी गेडाम, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्री. सौरभजी सहारे व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
#Dhanora #IndiaPost #PublicService #LadkiBahinYojana #Gadchiroli #JanSamvad #Maharashtra #DevelopmentForAll See less
📅 15 जून 2026
📍 कर्तव्य कक्ष कार्यालय, गडचिरोली
भारतीय जनता पार्टी, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने आयोजित "विकसित भारत संकल्प जिल्हा संमेलन" कार्यक्रमास उपस्थित राहिलो.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विकसित भारताच्या संकल्पनेबाबत मार्गदर्शन केले. गेल्या बारा वर्षांत पंतप्रधान Narendra Modi यांच्या नेतृत्वाखाली देशाने विविध क्षेत्रांत साधलेली प्रगती, जागतिक स्तरावर भारताची वाढलेली प्रतिष्ठा तसेच गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या विकासकामांचा आढावा यावेळी मांडला.
केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजना, पायाभूत सुविधांचा विकास, आदिवासी भागांसाठी राबविण्यात आलेले उपक्रम आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती कार्यकर्त्यांना देण्यात आली.
तसेच मोदी सरकारच्या विकासकामांची आणि योजनांची माहिती घराघरांत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले. शासनाने केलेल्या कामांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावा आणि जनतेला विकासाची खरी माहिती मिळावी यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने प्रभावीपणे संवाद साधावा, असे आवाहन यावेळी केले.
यावेळी माजी खासदार तथा रात्री महामंत्री अनु.जमाती डॉ. अशोकजी नेते, माजी आमदार तथा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ देवरावजी होळी, जिल्हाध्यक्ष श्री. रमेशजी बारसागडे, नगराध्यक्ष अँड प्रणोतीताई निंबोरकर, ज्येष्ठ नेते श्री. बाबुरावजी कोहळे, माजी जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री श्री. सदानंदजी कुथे, मंचावर उपस्थित होते. See less
📍 धानोरा मच्छी व मटण मार्केटला भेट; व्यापारी बांधवांशी संवाद
आज धानोरा येथील मच्छी व मटण मार्केटला भेट देऊन व्यापारी बांधवांशी संवाद साधला. यावेळी बाजारपेठेतील विविध समस्या, उपलब्ध सुविधा, स्वच्छता व्यवस्था तसेच व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.
#धानोरा#व्यापारीसंवाद
#जनसंपर्कदौरा
#स्थानिकविकास
#डॉमिलिंदनरोटे See less
📍 धानोरा
धानोराच्या दौऱ्यावर असताना भ्रमणध्वनीद्वारे माहिती प्राप्त झाली की, स्थानिक धान्य गोदाम पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे उद्यापासून मक्का खरेदी बंद ठेवण्याची शक्यता आहे. ही बाब अत्यंत गंभीर असल्याने तत्काळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून धानोरा येथील गोदामाला भेट दिली.
यावेळी गोदामाची पाहणी करून मक्का खरेदी प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत खंडित होऊ नये, शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये आणि त्यांच्या मालाची वेळेवर खरेदी व्हावी यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तहसीलदार महोदयांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत मेंढा येथील गोदाम उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे मक्का खरेदी प्रक्रिया सुरळीतपणे सुरू राहण्यास मदत होणार आहे.
शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत त्यांच्या मालाची खरेदी अखंडित सुरू राहील यासाठी प्रशासनासोबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते श्री. अनंतजी साळवे, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. साजनजी गुंडावार, जिल्हा सविच श्री. सारंगजी साळवे, नगरसेवक गटनेते श्री. संजयजी कुंडू, श्री. राकेशजी खरवडे, श्री. सुभाषजी खोबरे, श्री. विजयजी गेडाम, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्री. सौरभजी सहारे व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. See less
📍 कर्तव्य कक्ष कार्यालय, धानोरा
गेल्या वर्षी धानोरा तालुक्यात शेतकऱ्यांकडून खत टंचाई, अवाजवी दर आणि पुरेशा साठ्याअभावी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याची गंभीर दखल घेत यंदाच्या खरीप हंगामापूर्वी कर्तव्य कक्ष कार्यालय, धानोरा येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीत खत पुरवठ्याची सद्यस्थिती, उपलब्ध खत साठा, खतांचे निर्धारित दर, खत निरीक्षक पथकांची कार्यपद्धती तसेच तालुक्यातील अधिकृत व कार्यरत कृषी केंद्रांची माहिती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दरात खत उपलब्ध व्हावे, कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी तसेच कोणत्याही प्रकारची गैरव्यवस्था होऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण आणि खरीप हंगाम सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहून प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते श्री. अनंतजी साळवे, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. साजनजी गुंडावार, जिल्हा सविच श्री. सारंगजी साळवे, नगरसेवक गटनेते श्री. संजयजी कुंडू, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ. भूमिताताई परचाके,श्री. सुभाषजी धाईत, श्री. सुभाषजी खोबरे, श्री. विजयजी गेडाम, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्री. सौरभजी सहारे व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. See less
📍 कर्तव्य कक्ष कार्यालय, धानोरा
आज कर्तव्य कक्ष कार्यालय, धानोरा येथे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अंतर्गत मतदार यादी पुनर्निरीक्षणाबाबत आयोजित बैठकीस उपस्थित राहिलो.
यावेळी BLO-2 यांनी नवीन मतदार नोंदणी, मृत मतदारांची नावे वगळणे, मतदार यादीतील त्रुटी दूर करणे तसेच बोगस व अपात्र मतदारांची पडताळणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
बैठकीत मतदार यादीची शुद्धता आणि पारदर्शकता राखण्यावर भर देण्यात आला. खोटी कागदपत्रे तयार करून बोगस बांगलादेशी घुसखोर अथवा इतर कोणत्याही अपात्र व्यक्तींची मतदार यादीत नोंद होऊ नये, यासाठी प्रशासनाने सतर्क राहून कठोर पडताळणी करावी, अशी भूमिका मांडण्यात आली. तसेच अशा प्रकरणांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करून देशाच्या सुरक्षा व लोकशाही व्यवस्थेचे संरक्षण करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
तसेच सामाजिक माध्यमांवर विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या आरोपांचे तथ्यांसह खंडन करून नागरिकांसमोर सत्य माहिती पोहोचविण्याबाबत चर्चा करण्यात आली. बोगस मतदारांविरोधातील मोहिमेची वस्तुस्थिती जनतेपर्यंत पोहोचवून अफवा व गैरसमज दूर करण्याचे आवाहन करण्यात आले. लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा विश्वास दृढ राहावा आणि प्रत्येक पात्र मतदाराचा सहभाग सुनिश्चित व्हावा यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते श्री. अनंतजी साळवे, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. साजनजी गुंडावार, जिल्हा सविच श्री. सारंगजी साळवे, नगरसेवक गटनेते श्री. संजयजी कुंडू, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ. भूमिताताई परचाके, श्री. विजयजी गेडाम, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्री. सौरभजी सहारे व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. See less
आज धानोरा रोड येथील स्मृती स्मारकाजवळ आयोजित कार्यक्रमात, श्रद्धेय बाबुरावजी मडावी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून पुष्पहार अर्पण केला व त्यांच्या पावन स्मृतींना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
बाबुरावजींनी आपल्या राजकीय व सामाजिक कार्यकाळात सर्वसामान्य जनता, आदिवासी बांधव आणि वंचित घटकांच्या विकासासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांचे विचार आणि त्यांनी केलेले कार्य आपल्या सर्वांसाठी नेहमीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी राहील. See less
आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर कार्य करणारे, गडचिरोली जिल्ह्याचे शिल्पकार आणि माजी राज्यमंत्री स्व. बाबुरावजी मडावी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
त्यांनी समाजसेवा, विकास आणि जनकल्याणासाठी दिलेले योगदान भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार आणि कार्य सदैव स्मरणात राहतील व समाजाला नवी दिशा देत राहतील.
भावपूर्ण श्रद्धांजली!
#स्व_बाबुरावजी_मडावी
#स्मृतिदिन
#विनम्र_अभिवादन
#गडचिरोली
#डॉ_मिलिंद_नरोटे See less
भारतीय जनता पार्टी गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने शासकीय सर्किट हाऊस येथे राज्यसभा खासदार आदरणीय मायताई इवनाते यांच्या अध्यक्षतेखाली विशेष पत्रकार परिषद पार पडली. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या ऐतिहासिक 'सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण' या गौरवशाली प्रवासातील ठळक कामगिरी यावेळी प्रसारमाध्यमांसमोर मांडण्यात आली. २०१४ पासून सुरू झालेला हा विकासप्रवास आज २०२६ मध्ये भारताला एका नव्या जागतिक उंचीवर घेऊन गेला असून, मोदी सरकारने केवळ देशाचा चेहरामोहराच बदलला नाही, तर गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासी बहुल जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे, असे या प्रसंगी प्रामुख्याने अधोरेखित करण्यात आले.
या पत्रकार परिषदेत बोलताना लोकप्रतिनिधींनी सांगितले की, मोदी सरकारने 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' हा मंत्र प्रत्यक्षात आणत गेल्या १२ वर्षांत गरिबांचे जीवन सुकर केले आहे. देशात ४ कोटींहून अधिक पक्की घरे, ११ कोटी शेतकऱ्यांना थेट सन्मान निधी, आणि 'लखपती दीदी' योजनेतून ३ कोटी महिलांचे सक्षमीकरण करण्यात आले आहे. विशेषतः आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी १५ हजार कोटी आणि 'धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान'साठी ७९ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सरकारने जल-जंगल-जमिनीच्या खऱ्या रक्षकांचा सन्मान केला आहे. तसेच, देशातील नक्षलवादाचा 'रेड कॉरिडॉर' आता 'ग्रीन ग्रोथ झोन'मध्ये रूपांतरित झाल्याने येथील तरुणांना प्रगतीची नवी दारे खुली झाली आहेत.
देशाच्या पायाभूत सुविधांचा महावेध घेत राष्ट्रीय महामार्गांचे जाळे १.४६ लाख किलोमीटरवर नेण्यात आले असून १६4 हून अधिक वंदे भारत ट्रेन, ९० पेक्षा जास्त नवीन विमानतळे आणि नवीन संसद भवनाची निर्मिती हा नव्या भारताचा बुलंद आवाज आहे. आज १० जून रोजी आदरणीय मोदीजी हे भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ पदावर राहिलेले निर्वाचित पंतप्रधान बनून नवा इतिहास रचत आहेत.
यावेळी माझी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री अनु. जमाती डॉ. अशोकजी नेते, राजसभा खासदार मान. मायाताई इवनाते, माजी आमदार तथा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी,जिल्हाध्यक्ष श्री रमेशजी बारसागडे, माजी आमदार डॉ नामदेवजी उसेंडी, नगराध्यक्षा अँड. प्रणोतीताई निंबोरकर, जेष्ठ नेते श्री. बाबुरावजी कोहळे, जेष्ठ नेते श्री. रमेशजी भुरसे,माजी जिल्हाध्यक्ष श्री प्रशांतजी वाघरे, लोकसभा समन्वयक श्री प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री श्री. सदानंदजी कुथे व पदाधिकारी उपस्थित होते. See less
📅 १४ जून २०२५
📍 सुभाषग्राम, तह. चामोर्शी
घोट-सुभाषग्राम क्षेत्रात भाजपचे काम अविरतपणे करणाऱ्या आमच्या पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या अकुलीदीदी विश्वास यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. पक्षाच्या विचारसरणीसाठी त्यांचे असलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे.
तसेच, या दौऱ्यादरम्यान श्री. सतीशजी रॉय यांच्या दुकानालाही भेट दिली. याप्रसंगी स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत परिसरातील विविध विषयांवर चर्चा केली.
#BJP #Chamorshi #Subhashgram #Ghot #ज्येष्ठकार्यकर्ते #सदिच्छाभेट #जनसंवाद See less
📅 १४ जून २०२५
📍 आनंदग्राम, तह. चामोर्शी
आज आनंदग्राम येथे आमचे भाजप कार्यकर्ते श्री. फनीभूषणजी मण्डल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी आनंदग्राम परिसरातील विविध स्थानिक विषयांवर आणि आगामी काळात पक्ष बळकटीकरणासाठी येणाऱ्या अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने यावेळी कार्यकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. अनिलजी पोहनकर, माजी पं. स. सदस्य श्री. दीपकजी हलदार, घोट तालुकाध्यक्ष श्री. राकेशजी सरकार, ज्येष्ठ कार्यकर्ता श्री. विकासजी वैध, आदिवासी मोर्चा तालुकाध्यक्ष श्री. विलासजी उईके श्री. महेशजी विश्वास उपस्थित होते.
#BJP #Chamorshi #Vasantpur #सदिच्छाभेट #जनसंवाद #चामोर्शी
#BJP #Chamorshi #Anandgram #सदिच्छाभेट #भाजपकार्यकर्ता #पक्षसंघटन #चामोर्शी See less
📍 सोमनपूर (तह. चामोर्शी)
आज चामोर्शी तालुक्यातील सोमनपूर गावाला प्रत्यक्ष भेट देऊन सर्व गावकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. या भेटीदरम्यान गावातील सर्वात मोठी आणि मुख्य समस्या समोर आली ती म्हणजे ग्रामपंचायत विभाजनाची. हे गाव मुलचेरा तालुक्याच्या ग्रामपंचायती अंतर्गत येत असल्यामुळे सोमनपूर व इतर तीन गावाला विकास निधी मिळण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. गावकऱ्यांची ही गैरसोय दूर करण्यासाठी, सोमनपूरसह चामोर्शी तालुक्यातील एकूण ३ गावांच्या ग्रामपंचायत विभाजनाचा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून घेऊन नवीन स्वतंत्र ग्रामपंचायत तयार करण्याचे आश्वासन मी गावकऱ्यांना दिले आहे.
यासोबतच गावात येणारा मुख्य रस्ता, सोमणपूर ते ठाकूरनगर दरम्यानचा पूल, गोटूल भूमीचा प्रश्न, शैक्षणिक अडचणी, गावाजवळ प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) सुरू करणे आणि वाचनालय उभारणे यासारख्या इतरही अनेक महत्त्वाच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. सोमनपूर व परिसरातील या सर्व मूलभूत समस्या सोडवून गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही गावकऱ्यांना दिली.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री अनिलजी पोहनकर, माजी पं.स. उपसभापती अकुलीदीदी विश्वास, माजी पं.स. सदस्य श्री.दिपकजी हलदर, घोट मंडळ तालुकाध्यक्ष श्री राकेशजी सरकार,भाजपा आदिवासी आघाडी प्रमुख श्री.विलासजी उईके, माजी सरपंच श्री.सतीशजी रॉय, सुभाषग्रामचे सरपंच श्री.किष्णाजी मंडल, श्री. महेशजी विश्वास, श्री. विकाशजी वैध, श्री. मारोतीजी मडावी यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
#BJP #Chamorshi #Somanpur #जनसंवाद #ग्रामपंचायत #विकासकामं #गावकऱ्यांशीचर्चा #गडचिरोली #TeamBJP See less
📍 कृष्ण मंदिर, ठाकूरनगर (तह. चामोर्शी)
आज चामोर्शी तालुक्यातील ठाकूरनगर येथील कृष्ण मंदिर येथे भेट देऊन स्थानिक गावकऱ्यांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी गावकऱ्यांनी गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या, क्षारयुक्त पाण्यामुळे होणारे किडनीचे विकार, आरोग्य विषयक अडचणी, बस सेवा आणि पाणंद रस्त्यांचे प्रश्न माझ्यासमोर मांडले. या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रशासन पातळीवर तातडीने योग्य पावले उचलली जातील.
गावातील पाण्याच्या समस्येमुळे नागरिकांना किडनीचे आजार होत असल्याबाबत तातडीने उपाययोजना म्हणून, आगामी २१ जून रोजी गावातच किडनी तपासणी व विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांशी थेट संपर्क साधून हे शिबिर तातडीने मंजूर करायला सांगितले आहे.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री अनिलजी पोहनकर, माजी पं.स. उपसभापती अकुलीदीदी विश्वास, माजी पं.स. सदस्य श्री.दिपकजी हलदर, घोट मंडळ तालुकाध्यक्ष श्री राकेशजी सरकार,भाजपा आदिवासी आघाडी प्रमुख श्री.विलासजी उईके, माजी सरपंच श्री.सतीशजी रॉय, सुभाषग्रामचे सरपंच श्री.किष्णाजी मंडल, श्री. महेशजी विश्वास, श्री. विकाशजी वैध, यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
#BJP #Chamorshi #Thakurnagar #आरोग्यशिबिर #जनसंवाद #विकासकामं #पिण्याचेपाणी #Gadchiroli #TeamBJP See less