वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, पार्थ!
तुझा अत्यंत प्रेमळ, संयमी आणि समजूतदार स्वभाव नेहमीच संपूर्ण कुटुंबाला भावणारा ठरला आहे. राजकीय कुटुंबात वाढत असताना, तू सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या अतिशय नेटानं पार पाडत आहेस, याचा आम्हा सर्वांना मनस्वी अभिमान वाटतो. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तुला यश, सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
पुन्हा वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
खूप मोठा हो.. यशस्वी हो.. दीर्घायुषी हो..!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना !
योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक ७ मार्च २०२५ पासून सुरू झाली आहे.
ही प्रक्रिया दिनांक १२ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये व मार्च महिन्याचे १५०० रुपये असे दोन टप्प्यात एकूण ३००० रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे.
सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत रहावे !
#मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहीण_योजना
@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मुंबईत 'अभिजात मराठी भाषा दिन गौरव सोहळा २०२५' मोठ्या दिमाखदार आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला. या सोहळ्यात पद्मभूषण मा. डॉ. राम सुतार, पद्मश्री मा. श्री. मधु मंगेश कर्णिक, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण मा. श्री. अशोक सराफ, मा. श्री. दिलीप वेंगसरकर, श्री. सयाजी शिंदे, श्रीमती वैशाली सामंत आणि मा. श्री. इंद्रनील चितळे यांना मराठी भाषेच्या वृद्धी आणि संवर्धनासाठी आपापल्या क्षेत्रातून दिलेल्या योगदानाबद्दल गौरविण्यात आलं. यावेळी पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन करत उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला.
सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. ‘मराठी भाषा गौरव दिन’ हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. त्यांच्या काव्यप्रतिभेने मराठी भाषा अधिक समृद्ध झाली असून, त्यांनी आपल्या अलौकिक प्रतिभेच्या माध्यमातून मराठी साहित्याला नवे अलंकार चढवले आणि अनेक अमूल्य साहित्यकृतींची निर्मिती केली. ते मानवतेचे कवी होते, त्यांनी आपल्या साहित्यातून समाजाच्या विविध अंगांना स्पर्श केला. त्यांच्या पश्चात आता मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक मराठी भाषिकाने आपल्या खांद्यावर घ्यावी, असं आवाहन केलं.
महाराष्ट्रात मराठी भाषेच्या माध्यमातून स्वराज्य, स्वसंस्कृती आणि स्वचेतनेचा विस्तार घडून आला आहे. राज्यातील महिला सशक्तीकरण, औद्योगिक प्रगती, कृषी विकास आणि सामाजिक परिवर्तन यांसाठी मराठी भाषेनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राज्य शासनाकडून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. साहित्य प्रसार, भाषा विकास आणि संशोधनाला चालना देण्यासाठी तसंच साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक दर्जाचं मराठी भाषा भवन मुंबईत साकारलं जात आहे. हे भवन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक ठरेल. मराठी भाषा संपूर्ण जगभर पोहोचावी, हे आमचं ध्येय असून, प्रयत्नशीलतेच्या जोरावरच हे स्वप्न साकार करू, असा विश्वास दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेवर आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्शांवर चालत जनसेवेच्या कार्यात सातत्यानं योगदान देत आहे आणि पुढेही देत राहील.
Heartiest Congratulations to @imVkohli on making history by becoming the fastest player to reach 14000 runs in One Day Internationals during the India vs Pakistan ICC Champions Trophy in Dubai today. Truly an inspiration for the youth! Well done… #ViratKohli#KingKohli #14KODIRuns #INDvPAK
मुख्य सचिव @ssaunik यांच्या अध्यक्षतेखाली पाणी पुरवठा आणि स्वच्छता अभियानाच्या शिखर समितीची बैठक मंत्रालयात पार पडली. त्यांनी #जलजीवनमिशन अंतर्गत #पाणीपुरवठा योजनांच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
"आमच्या आधारस्तंभ व मार्गदर्शिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या तथा राज्यसभेच्या खासदार मा.सुनेत्रावहिनी साहेब पवार आपली राज्यसभेच्या 'तालिका अध्यक्षपदी' निवड झाली बद्दल खूप खूप अभिनंदन 💐💐 नी पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा ⏰👍🏻👍🏻 @SunetraA_Pawar
समाज प्रगतीच्या मार्गावर पुढे जावा, याकरिता समाज प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून आजच्या दिवशी म्हणजेच ६ जानेवारी १८३२ रोजी, आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हा पहिला मराठी वृत्तपत्र सुरु केला. त्यांच्या अमूल्य कार्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन!
तमाम मराठी पत्रकार बंधू-भगिनींना 'मराठी पत्रकार दिना'च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#मराठी_पत्रकार_दिन
#आचार्य_बाळशास्त्री_जांभेकर
महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत, आज मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस ( @Dev_Fadnavis ) , उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे ( @mieknathshinde ) आणि उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार ( @AjitPawarSpeaks ) यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वीपणे चालु आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६७,९२,२९२ भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
@CMOMaharashtra@MahaDGIPR@MHDWCD
#मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहिण_योजना #WomenEmpowerment
राज्यातील युवकांमधील कौशल्यांना चालना मिळण्याबरोबरच उद्योगांना सुद्धा कुशल मनुष्यबळ मिळावे या हेतूने महायुती सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली. या कल्याणकारी योजनेमुळे राज्यातील ०१ लाख १९ हजार ७०० तरुणांना प्रशिक्षणात सहभाग नोंदविता आला यामध्ये बीड जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार तरुणांचा समावेश आहे.
मात्र या योजनेचा कालावधी सहा महिन्यांचा असल्यामुळे तो आता पूर्ण होत असल्यामुळे प्रशिक्षण पुर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थी मध्ये त्यांच्या भवितव्याविषयी चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे या योजनेचा कालावधी वाढवावा आणि ज्यांनी या योजनेतून प्रशिक्षण पूर्ण केले आहे, त्यांच्या हाताला काम मिळवून द्यावे. यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करावेत अशी मागणी आज औचित्याच्या त्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहात केली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल रिल्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे.
एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून याबाबतीत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे. तरी, याबाबत समाज माध्यमांतून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये ही नम्र विनंती.
#मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहिण_योजना
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@CMOMaharashtra
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल श्री. एस. एम. कृष्णा यांच्या निधनानं राजकारण, समाजकारण, शैक्षणिक, न्यायिक क्षेत्रातील दिग्गज, मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व आपण गमावलं आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल म्हणून त्यांचा राजकीय, प्रशासकीय अनुभव दांडगा राहिला. त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अशी महत्त्वाची सार्वजनिक पदं भूषवली. या पदांवरून काम करताना त्यांनी नेहमीच लोकहित जपण्याचा प्रयत्न केला. पायाभूत सुविधांचा विकास, शैक्षणिक गुणवत्तेत वाढ, आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये सुधारणा आदी बाबतीतील त्यांचं कार्य कायम स्मरणात राहील.
मी श्री. एस. एम. कृष्णा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचं निधन हे त्यांच्या परिवारासाठी मोठा धक्का आहे. हे दुःख पचवण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो, अशी प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि आप्तस्वकीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतमोजणीत सर्व 288 मतदारसंघांमध्ये एकूण 1440 व्हीव्हीपॅट मधल्या स्लीप्सची अनिवार्य मोजणी दि. 23.11.2024 रोजी पूर्ण, ईव्हीएममधील मतांची उमेदवारनिहाय संख्या आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील उमेदवारनिहाय स्लीप्सची संख्या यात कोणतीही तफावत आढळली नाही.
@ECISVEEP
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे १६ ते २१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. विधानभवन येथे #विधानसभा आणि #विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.
#विशेषअधिवेशन२०२४#SpecialSession2024