Official account of Ward-D of Brihanmumbai Municipal Corporation. For emergency Dial 1916 or ward control room number 022-23864000. App - MyBMC Mobile app
@RajeshG99342695 We have registered your complaint on the MARG portal of the Brihanmumbai Municipal Corporation.
For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/rQ6ktf9FP2
Your MARG registration number : 068438
@jay11290@mybmc@TawdeRitu आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - 067950
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/rQ6ktf9FP2 येथे कृपया भेट द्यावी.
🌧️पावसाळ्यात जलजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या.
पाणी नेहमी उकळून आणि गाळूनच प्या! 💧
#MyBMCUpdates#MumbaiRains#StaySafe
🔷मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण - २०२६ कार्यक्रम अंतर्गत, दिनांक ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(बीएलओ) गृहभेटी देणार आहेत.
🔷संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
#MyBMCUpdates
#SIR
#SpecialIntensiveRevision
🦟साचलेले पाणी, डेंग्युला आमंत्रण!
स्वच्छता आणि काळजी, हेच त्यावरचे नियंत्रण!
लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या!🩺
🏥डेंग्युची लक्षणे दिसल्यास महानगरपालिका रुग्णालय/ दवाखाना/ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे मोफत तपासणी करा व वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार पूर्ण करा.
#MyBMCUpdates #MumbaiRains #Dengue #Health #MumbaiUpdates
🔹दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या काळा घोडा परिसरातील आर्ट अव्हेन्यू सौंदर्यीकरण व रोशणाई प्रकल्पाचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.
🔹उप मुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष तथा स्थानिक आमदार ॲड. राहुल नार्वेकर, माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे, सभागृह नेता श्री. गणेश खणकर, विरोधी पक्षनेत्या श्रीमती किशोरी पेडणेकर, शिवसेना गटनेता श्री. अमेय घोले, स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे, सुधार समिती अध्यक्ष श्रीमती संध्या दोशी-सक्रे, बेस्ट समिती अध्यक्ष श्रीमती तृष्णा विश्वासराव, स्थानिक नगरसेवक ॲड. मकरंद नार्वेकर, नगरसेविका श्रीमती हर्षिता नार्वेकर, नगरसेविका डॉ. गौरवी शिवलकर-नार्वेकर, नगरसेवक श्री. कमलाकर दळवी, महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे, उप आयुक्त (परिमंडळ १) श्रीमती चंदा जाधव, ए विभागाचे सहायक आयुक्त श्री. गजानन बेल्लाळे आदींसह काळाघोडा परिसरातील रहिवासी, व्यावसायिक उपस्थित होते.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi@PrajaktaVerma
🔷मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण - २०२६ कार्यक्रम अंतर्गत, दिनांक ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(बीएलओ) गृहभेटी देणार आहेत.
🔷संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
#MyBMCUpdates#SIR
#SpecialIntensiveRevision
जुलै २०२६ मधील मोठ्या भरतीचे (High Tide) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १४ ते १८ जुलै २०२६ या कालावधीत लाटांची उंची ४.५ मीटरपेक्षा जास्त असणार आहे 🌊
भरतीच्या वेळी नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळा...
सुरक्षित राहा, सतर्क राहा!
#MyBMCUpdates#MumbaiRains#Hightide
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण - २०२६ कार्यक्रमाच्या अनुषंगाने, माननीय भारत निवडणूक आयोग यांच्या नावाने, व्हॉट्सअॅपद्वारे अज्ञात क्रमांकावरुन मतदारांना तथ्यहिन संदेश पाठविण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे.
‘आपली मतदानविषयक माहिती जुळत नसल्याचे किंवा त्यासोबत बनावट कागदपत्रे असल्याचे चौकशीत आढळले आहे. आपण योग्य कागदपत्रे न दिल्यास आपले मतदान कार्ड वगळण्यात (Delete) येईल. यासाठी तात्काळ सह मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा’, असे या संदेशात म्हटले आहे. तसेच, त्याखाली मोबाईल क्रमांकही देण्यात आलेला आहे.
या अनुषंगाने, हे स्पष्ट करण्यात येते की, माननीय निवडणूक आयोगाकडून अशाप्रकारे कोणतेही संदेश व्हॉट्सअॅपवरुन पाठविण्यात आलेला नाही. हा संदेश पूर्णत: तथ्यहिन आणि खोटा आहे. अशाप्रकारच्या संदेशाला कोणतेही उत्तर देऊ नये अथवा त्यात सांगितल्याप्रमाणे कृती करू नये.
कृपया, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण - २०२६ कार्यक्रमाबाबत अधिकृत माहितीसाठी माननीय भारत निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग किंवा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा त्यांच्या अधिकृत समाज माध्यम (सोशल मीडिया) खात्यावरील माहिती पाहावी किंवा नजीकच्या मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात येत आहे.
#mybmcupdates
#SIR
#SpecialIntensiveRevision
@maharashtrasec@ecisveep@ceo_maharashtra
🔹अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ( शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा - लवंगारे यांनी जी उत्तर विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रास (सीएफसी) आणि माहिम विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयास आज भेट दिली.
🔹नागरी सुविधा केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध सेवासुविधांचा तसेच मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण(स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन-SIR)- २०२६ कार्यक्रमाच्या अनुषंगाने सुरू असलेली कार्यवाही आणि कामकाजाचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.
🔹उपआयुक्त (शिक्षण) श्रीमती प्राची जांभेकर, सहायक आयुक्त (जी उत्तर विभाग) श्री. योगेश देसाई आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi@PrajaktaVerma
साकीनाका येथील काजूपाडा पाईपलाईन मार्गावरील सत्यनगर नाल्याजवळ १२०० मिलीमीटर व्यासाच्या विहार मुख्य जलवाहिनीवर पाणी गळती आढळून आली.
ही गळती तातडीने रोखण्यासाठी जल अभियंता (HE) विभागाने शुक्रवार, दिनांक १० जुलै २०२६ रोजी जलवाहिनीचे अलगीकरण (Isolation) केले.
अलगीकरणाची प्रक्रिया जलद व सुरक्षितरीत्या पूर्ण करण्यासाठी 'एअर व्हॉल्व्ह'मधून हवा सोडण्याची (Air Valve Bleeding) कार्यवाही करण्यात आली.
जलवाहिनीचे अलगीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर जल अभियंता विभागाने गळतीस कारणीभूत ठरलेला खराब झालेला शिसाचा सांधा (Lead Joint) काढून त्याऐवजी नवीन सांधा बसविला. त्यानंतर जलवाहिनीची चाचणी घेण्यात आली असून पाणी गळती पूर्णपणे थांबविण्यात आली आहे.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
जुलै महिन्यात १४ जुलै ते १८ जुलै २०२६ या कालावधीत समुद्राला मोठी भरती येणार आहे.
उधाणलेला समुद्र धोक्याची घंटा असू शकते...
सुरक्षित रहा, सतर्क रहा
#MyBMCUpdates#mumbairains
मॅनहोल सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' प्रतिकृतीची महापौर श्रीमती रितू तावडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजित बांगर यांच्याकडून पाहणी
एल विभागामध्ये प्रायोगिक तत्त्वावर चाचपणी; अनुभव व सूचनांच्या आधारे होणार पुढील निर्णय
🔷मुंबईतील मॅनहोल्सवर कामे करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल व दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' (Manhole Rail Guard) ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची (प्रोटोटाइप) मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजित बांगर यांनी महानगरपालिका मुख्यालयात आज (दिनांक १३ जुलै २०२६) प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी विविध नगरसेवक व नगरसेविका देखील उपस्थित होते.
🔷या प्रतिकृतीची सविस्तर माहिती घेतल्यानंतर महापौर श्रीमती तावडे तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. बांगर यांनी तिच्या प्रभावी वापराच्या दृष्टीने काही सूचना केल्या. मॅनहोलच्या आकारानुसार रेलगार्डचा आकार सहजपणे कमी-जास्त (collapsible) करता येणे, काळोखावेळी दृश्यमानता वाढावी यासाठी त्यावर परावर्तक रंग (reflector) लावणे किंवा लुकलुकणारे दिवे बसवणे, यांसह इतरही सूचना दोघांनी केल्या.
🔷नागरिक आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून या चौकोनी आकाराच्या 'मॅनहोल रेलगार्ड'ची रचना मजबूत आणि सुटसुटीत करण्यात आली आहे. उंची १ मीटर, लांबी १.५ मीटर आणि रुंदी १.५ मीटर असा आकार असलेल्या या रेलगार्डमध्ये, गरजेनुसार व विविध ठिकाणांच्या आवश्यकतेनुसार वापरासाठी २२५ किलो आणि ८० किलो असे दोन वेगवेगळे वजनी पर्याय उपलब्ध आहेत.
🔷ही प्रतिकृती प्रायोगिक तत्त्वावर (Pilot Project) मुंबईतील एल प्रशासकीय विभाग (L Ward) मध्ये वापरात आणली जाणार आहे. या विभागात प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्यानंतर, तेथील अनुभव पाहून तसेच तांत्रिक गरजा आणि महानगरपालिका कर्मचारी व नागरिकांकडून मिळणाऱ्या सूचनांच्या आधारे 'मॅनहोल रेलगार्ड'ची जडणघडण कशी असावी, याबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
🔷तसेच, या प्रायोगिक चाचणीदरम्यान मिळणारे अनुभव आणि सूचनांचा अभ्यास करून, मुंबईतील इतर सर्व प्रशासकीय विभागांमध्ये या प्रतिकृतीचा वापर करावा की नाही, याबाबतचा पुढील निर्णय महानगरपालिका प्रशासनातर्फे घेतला जाईल.
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
🔷मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण - २०२६ कार्यक्रम अंतर्गत, दिनांक ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(बीएलओ) गृहभेटी देणार आहेत.
🔷संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
#mybmcupdates#SIR
#SpecialIntensiveRevision
@maharashtrasec@ecisveep@ceo_maharashtra
🔹Under the Special Intensive Revision (SIR) Programme of the Electoral Rolls – 2026, Booth Level Officers (BLOs) will conduct door-to-door visits from 30th June to 29th July 2026.
🔹It is appeal to all citizens to extend their cooperation by providing the necessary information to the concerned officials during these visits.
#MyBMCUpdates
#SIR
#SpecialIntensiveRevision
@MaharashtraSEC@ECISVEEP@CEO_Maharashtra
🌉मानखुर्द - महाराष्ट्र नगर आणि विद्याविहार रेल्वे स्थानक येथे उड्डाणपूल प्रकल्पाची कामे वेगाने सुरु आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजित बांगर यांनी आज सकाळी या दोन्ही ठिकाणांना भेट देऊन प्रकल्पांचा आढावा घेतला. या दोन्ही उड्डाणपुलांची कामे निर्धारित कालावधीत वेगाने करण्याचे निर्देश श्री. बांगर यांनी दिले.
🔹मानखुर्द - महाराष्ट्र नगर टी जंक्शन नियमित सकाळी आणि रात्री मोठ्या स्वरूपात वाहतूक कोंडी होते. परिणामी स्थानिक रहिवाशासह मुंबईवरून वाशीकडे तसेच वाशीकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा मोठ्या स्वरूपात सामना करावा लागतो. यासोबतच घाटकोपर ते मानखुर्द आणि मानखूर्द ते घाटकोपर या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होते. यावर परिणामकारक उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने घाटकोपर -मानखुर्द उड्डाणपूला वरून थेट वाशीकडे जाणारा आर्म - १ आणि सायन पनवेलच्या महामार्गावरील मानखुर्द उड्डाणपूल येथून घाटकोपर कडे जाणारा आर्म- २ उड्डाणपूल अशी स्वतंत्र मार्गिका तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
🔹महाराष्ट्र नगर येथील टी जंक्शन प्रकल्पातील दोन्ही आर्मच्या कामाचा आढावा श्री. बांगर यांनी घेतला. अतिरिक्त मनुष्यबळ आणि संयंत्रे वापरून या दोन्ही आर्मचे काम दिनांक ३१ मे २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश श्री .बांगर यांनी दिले. प्रकल्पाची अंमलबजावणी करताना कामगार- कर्मचारी आणि नागरिकांच्या सुरक्षेचे सर्व उपाय करावेत. सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे सक्त निर्देश श्री. बांगर यांनी दिले. पूल प्रकल्पाच्या अनुषंगाने महावितरण व टाटा पॉवर यांच्या पारेषण वाहिन्यांच्या स्थलांतराच्या कामाचा आढावादेखील श्री बांगर यांनी घेतला.
🔹त्यानंतर श्री. बांगर यांनी विद्याविहार पूल प्रकल्प कार्यस्थळास भेट दिली. दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत या पुलाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सध्या या उड्डाणपुलाचे काम सुमारे ८० टक्के झाले आहे .
🔹विद्याविहार पूर्वेला तसेच पश्चिमेला पोहच रस्त्याच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था नियोजन करण्यासाठी एन विभागाचे अधिकारी व वाहतूक पोलीस यांच्या समन्वयाने नियोजन करावे. पुलाच्या पूर्व तसेच पश्चिम दिशेला वाहतुकीसाठी अडथळा ठरणारी ठिकाणे, आस्थापना, पदपथ, झाडे यांच्याशी संबंधित सुनियोजन करावे. अधिक गर्दीच्या वेळेत पुलाच्या पोहच रस्त्यापासून वाहतूक कोंडी होणार नाही, यादृष्टीने नियोजन करावे, असेही श्री बांगर यांनी निर्देश दिले.
🔹प्रमुख अभियंता (पूल) श्री. राजेश मुळे उपस्थित होते.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
🔷मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण - २०२६ कार्यक्रम अंतर्गत, दिनांक ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(बीएलओ) गृहभेटी देणार आहेत.
🔷संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
#MyBMCUpdates#SIR
#SpecialIntensiveRevision
@ECISVEEP@CEO_Maharashtra@MaharashtraSEC