कोणीतरी येतो आणि आपल्या आराध्य दैवताबद्दल काहीतरी विकृत बरळतो, एक शिवप्रेमी-शिवभक्त म्हणून हे अमान्य आणि संतापजनक आहे.
असले चौकटीत अडकवण्याचे फोल प्रयत्न काळाच्या उदरात गडप होतील. पण सह्याद्रीच्या पर्वतरांगा जशा लाखो वर्ष आधी होत्या तसंच ‘ते’ एकच नाव करोडो वर्ष भविष्यातही राहील. आणि ते नाव म्हणजे..
प्रौढप्रतापपुरंदर...क्षत्रियकुलावतंस... सिंहासनाधिश्वर... महाराजाधिराज... श्रीमंत राजाशिवछत्रपती महाराज.
मराठा सेवा संघाच्या ‘संत नामदेव- तुकाराम वारकरी परिषदे’चे प्रदेश उपाध्यक्ष, प्रख्यात शिवव्याख्याते, प्रागतिक विचारांचे पुरस्कर्ते ह.भ.प. मधुकर महाराज बारूळकर यांच्या अपघाती निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदाय तसेच समाजप्रबोधन क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
बारूळकर महाराजांनी कीर्तनाच्या प्रभावी माध्यमातून अंधश्रद्धेवर प्रहार करत समाजाला विचारप्रवृत्त केले आणि प्रबोधनाची अखंड ज्योत तेवत ठेवली. वारकरी परिषदेच्या माध्यमातून अनेक वर्षे त्यांनी समाजमनाची मशागत करण्याचे कार्य निष्ठेने केले. त्यांच्या रूपाने बहुजन चळवळीतील एक अभ्यासू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!
आज २४ डिसेंबर २०२५ रोजी, मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना, या दोन पक्षांची आगामी महापालिका निवडणुकांसाठीची युती घोषित झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष म्हणून मी आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून श्री. उद्धव ठाकरे अशी आम्ही दोघांनी या युतीची अधिकृत घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
ही युती बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित होती. आणि या सगळ्याची सुरुवात, मी एका मुलाखतीत दिलेल्या वाक्यातून झाली.
कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणांपेक्षा आपला महाराष्ट्र आणि मराठी माणूस मोठा आहे.' हे माझं वाक्य होतं. हे निव्वळ मुलाखतीतलं वाक्य नाहीये, तर ही तीव्र भावना आहे.
आणि यातूनच हे २ पक्ष एकत्र आले आहेत. बाकी युतीची घोषणा झाली. आता कोणाला कुठल्या आणि किती जागा मिळणार याची उत्तरं लवकरच मिळतील.
त्यावर आजच्या व्यासपीठावर कुठलीही माहिती सांगितली नाही, कारण त्या तांत्रिक बाबी आहेत.
युती ही किती जागा, कुठल्या जागा यासाठी नाहीये. ती आज मराठी माणसाचं मुंबई आणि परिसर पण उद्या राज्याच्या इतर भागातून अस्तित्व मिटवण्याचा जो प्रयत्न सुरु आहे, त्या शक्तींना गाडून टाकण्यासाठीची ही युती आहे.
त्यामुळे जागावाटप आणि त्याचा तपशील योग्य वेळी संबंधित व्यक्ती घोषित करतील.
मुंबईचा महापौर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा असेल आणि तो निर्विवादपणे मराठीच असेल.
आज वर्तमानपत्रं असोत किंवा वृत्तवाहिन्या, त्यांचे बहुसंख्य संपादक, पत्रकार आणि तिथे काम करणारी इतर मंडळी ही कडवट मराठी प्रेमी आहेत. आणि त्यांना मराठी भाषेच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या विरोधात जे षडयंत्र सुरु आहे ते आवडत नाहीये. त्यातले अनेक जणं त्यांचा रोष त्यांच्या पत्रकारितेतून व्यक्त करतात, तर काही खाजगीत व्यक्त होतात.
माझी सगळ्यांना विनंती आहे की यावेळेस तुमच्या मालकांना आणि त्यांच्या मालकांना काय वाटतं यापेक्षा तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला काय वाटतं, पटतं तेच मांडा, बोला. ही दोन पक्षांची लढाई नाही तर ही मराठी माणसाची लढाई आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेस जशी तत्कालीन माध्यमं मराठी माणसाच्या पाठीशी उभी राहिली तसं यावेळेस तुम्ही उभे रहा. कारण मराठी भाषा आणि मराठी माणूस टिकला तर तुमचं अस्तित्व टिकेल.
सभांच्या वेळेस मराठी बांधव-भगिनींच्या दर्शनाचा योग येईलच. तोपर्यंत सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र !
राज ठाकरे ।
सत्य सर्वांचे आदी घर,
सर्व धर्मांचे माहेर
जगामाजी सुख सारे,
खास सत्याची ती पोरे
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला अखंड आदरणीय डॉ. बाबा आढाव आवर्जून गायचे. आता हा आवाज पुन्हा ऐकायला मिळणार नाही. विनम्र अभिवादन.🙏🏻
सामाजिक न्याय के मजबूत स्तंभ और महान श्रमिक नेता बाबा आढाव जी के निधन का समाचार अत्यंत दुखद और एक अपूरणीय क्षति है।
वंचितों, शोषितों और मजदूरों के अधिकारों के लिए उन्होंने अपना संपूर्ण जीवन समर्पित कर दिया। पुणे से उठी उनकी संघर्ष की ज्योति ने देशभर में मशाल बन कर सामाजिक न्याय की राह को रौशन किया।
इस दुःख की घड़ी में उनके शोकाकुल परिवारजनों और असंख्य साथियों को अपनी हार्दिक संवेदनाएं व्यक्त करता हूं।
Golden opportunity for Maharashtra's trailblazers!
The prestigious 'Sharad Pawar Inspire Fellowship' is now accepting applications! Are you excelling in Agriculture? Don't miss your chance to shine!
Apply by 12th October 2025
Visit: https://t.co/w1sz43MuTH
माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो,
सध्या आपल्या मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमले आहेत. मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या हाती आहे, त्याचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल. पण एवढं मात्र नक्की, आज जे इथे उभे आहेत ते आपले बांधव आहेत.
मला उदयन महाराजांना विचारायचा आहे की राजे मराठ्यांनी सेलिब्रिटींसाठी श्रद्धांजली दिली
आंदोलनात मरण पावलेल्या रयती मराठ्यांसाठी आहे की पोस्ट नाही करू शकत??