मराठा आंदोलनात लाठीमार झाल्याने जनतेत भाजपच्या विरोधात संतापाची तीव्र लाट आहे. या मुद्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपने नितेश राणेंच्या रूपात एक पिल्लू पुण्यात सोडलं आहे. तथाकथित पुण्येश्वर मंदिराचे निमित्त करून आंदोलनाचे ढोंग रचण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने करण्यात येतोय.
ज्यांच्यावर लाठीमार झाला ती हाडामांसाची माणसं होती फडणवीसजी खेळण्यातल्या बाहुल्या नव्हत्या. तुमचा उद्देश जर स्वच्छ असेल तर राजीनामा द्या, माफीनामा नको.
महाविकास आघाडी सरकारमुळे मराठा आरक्षण मिळालं नाही असा आरोप फडणवीस करताय आणि त्या सरकार मधील दोन वजनदार मंत्री त्यांच्याच शेजारी बसून मुकाट्याने हे ऐकताय. कोणत्या पातळीची मजबुरी असेल त्यांची समजून घ्या.
फडणवीसांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी आज सुरक्षारक्षक न घेता राज्यातल्या कोणत्याही रस्त्यावर फिरून दाखवावे. शक्य नसेल तर आपण गृहमंत्री पदासाठी लायक नाही असे स्वतःच जाहीर करून राजीनामा द्यावा.
दुपारी 12 वाजता उठणारे एक मनोरंजक वक्ते आज मराठा आंदोलकांची भेट घेणार. सेटलमेंट किंग म्हणून ओळखले जाणारे हे गृहस्थ आंदोलकांचा मेसेज सरकारकडे नेणार की सरकारचा मेसेज आंदोलकांकडे नेणार याची उत्सुकता.
स्वतःच्या चेहऱ्यावर शाईचे चार थेंब उडाले तर हाय तोबा करणारे, शासकीय सुरक्षा घेऊन फिरणारे पुण्याचे डमी पालकमंत्री चंद्रकांत पाटील मराठ्यांचं रक्त सांडलं तर तोंड लपवून पळतात. नागपूरची स्क्रिप्ट आल्याशिवाय पुण्याचा पोपट बोलतच नाही.
बचावास्त्र 1 - वारकरी साप सोडणार होते.
बचावास्त्र 2 - मराठ्यांनी दगडफेक केली.
अहो एका फडणवीसला वाचवण्यासाठी खोटे आरोप करून संपूर्ण समाजाला बदनाम करताना लाज कशी वाटत नाही ?
जीवनात कितीही मोठं वादळ आलं तरी आपली निष्ठा अढळ ठेवणारा हा खरा जिगरबाज...!
नाहीतर आजकाल स्वतःची कातडी वाचवण्यासाठी निष्ठेला लाथाडणारे अनेक बौद्धिक अपंग आपल्याला दिसतात.
सलाम भावा !
आदरणीय पवार साहेब चॉपर मध्ये बसून खालच्या गावांची, नद्यांची नावं अचूक सांगतात. आपल्यापैकी किती नेत्यांना नकाशावर बीड जिल्हा अचूकपणे शोधता येईल ही सुद्धा शंका आहे.
पवार साहेब जनतेच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले नाहीत असं वळसे पाटील यांनी म्हटल्याचं मी काही कार्यकर्त्यांना सांगितलं. एका कार्यकर्त्याने विचारलं कोण वळसे पाटील ? दुसरा हसत म्हणाला वळसे पाटील ते महान लोकनेते आहेत ज्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून पवार साहेबांना मुख्यमंत्री केलं.
स्वतःचा संघ विसर्जित करून चार परक्या संघात पाणी भरणाऱ्या वॉटरबॉय ने आम्हाला अक्कल शिकवू नये. स्टंप च्या सावलीत तुमचं सम्पूर्ण कुटुंब झोपू शकतं टील्ल्या. उंची पाहून बोलत जा.
सभागृहात मोदींची गोची होतेय म्हणून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. पण ही खेळी मोदींवर उलटणार. सभागृहातील बुलंद आवाज आता संपूर्ण देशभरात पोचणार. यापुढे मोदींची जाहीर गोची होणार. इतिहास साक्षीदार आहे, रस्त्यावरच्या लढाईत हुकूमशाहांचा पराभवच होतो.