रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी नुकताच दोन दिवसीय दौरा केला. या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीत व स्थानिकांशी केलेल्या संभाषणाद्वारे प्राप्त झालेल्या माहितीबाबत आज राज्याचे मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
परभणी जिल्ह्यातील भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर व इतर पदाधिकारी भाजपचे पोस्टर वाटण्यासाठी गावोगावी जाऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालत आहेत. सोशल डिस्टन्सींग न पाळता लॉकडाऊनचे उल्लंघन करून हा राजकीय कार्यक्रम चालू आहे. कृपया संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा.
@AnilDeshmukhNCP
उत्स्फुर्तपणे पुढे येत सेलू तालुक्यातील कुंडी गावच्या नागरिकांनी @NCPspeaks च्या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीसाठी आर्थिक मदत म्हणुन वर्गणी दिली.. समस्त गावकऱ्यांचे आभार व अभिनंदन!
#परिवर्तन_अटळ_आहे@supriya_sule@Jayant_R_Patil
धर्मापुरी (ता.परभणी) गावातील मंडळींशी आज सकाळी बैठकीद्वारे संवाद साधला. जिल्ह्यात परिवर्तन घडवून शेतकरी अन् सर्वसामान्यांचं हित जपणाऱ्या, आपल्या मतदारसंघाला विकासाकडे नेण्याची इच्छाशक्ति असलेल्या विचारांच्या पाठीशी आपण उभे रहा असे आवाहन उपस्थित गावकऱ्यांना केले.
@NCPpbn
हि निवडणूक एकट्या राजेशदादांची नाही किंवा फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचीच नाही तर मतदारसंघातील प्रत्येकाच्या स्वाभिमानाची लढाई आहे. कुंडी प्रमाणेच प्रत्येक गावाने परिवर्तनासाठी उत्स्फुर्त सहभाग नोंदवावा..
#लढाई_परिवर्तनाची
कुंडी ता.सेलू येथील गावकऱ्यांनी लोकसभा निवडणूकीसाठी मला लोकवर्गणी दिली; हा माझ्या आजपर्यंतच्या राजकीय जिवनातील सर्वोच्च क्षण होता. त्यांचे उपकार फेडणे केवळ अशक्यच पण, या विश्वासाला कदापी तड़ा जाऊ देणार नाही..
#लढाई_परिवर्तनाची@PawarSpeaks@supriya_sule@VMBhamble@NCPpbn
गुगळी धामनगांव ता.सेलू येथे महाशिवरात्री निमित्त गुगळेश्वर क्रिडा मंडळ आयोजित शहरी व ग्रामिण व्हॉलिबॉल स्पर्धेचे उद्घाटन व शिवसेनेतील युवकांचा पक्षप्रवेश माझ्या हस्ते संपन्न झाला. यावेळी जि.प.चे बांधकाम व अर्थ सभापती अशोकनाना काकडे व गावातील तरुण उपस्थित होते.
पेडगाव ता.परभणी येथे मा.आ.@babajanidurrani साहेबांच्या ६५ लक्ष रुपयांच्या स्थानीक विकास निधीतून शादीखाना व रेणुका देवी मंदिर सभागृहाचे भुमिपूजन व आघाड़ीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा मा.मंत्री सुरेशरावजी वरपुडकर साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
मायबाप जनतेच्या आशीर्वादानं संधी मिळालीच तर येत्या काळात स्वत:ला या जिल्ह्यासाठी समर्पीत करील.
रामपुरी (खु.) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या ईमारतीचे भुमीपुजन आदरणीय @babajanidurrani साहेबांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी अध्यक्षस्थानी उपस्थित राहून गावकऱ्यांना संबोधित केले.
'स्वराज्य रक्षक संभाजी' मालीकेतून महापराक्रमी, बुधभुषणकार छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास मांडणारे व सबंध महाराष्ट्राला वेड लावलेले अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांच्याशी काल मुंबईत भेट झाली. सोबत @babajanidurrani@rajeshtope11@VMBhamble व इतर सहकारी..
५२ कंपन्या, ४८०० तरुणांचा सहभाग, पैकी १२०० जणांची जागेवर निवड तर, १८०० उमेदवार पुढील फेरीत; @NCPpbn च्यावतीने आयोजित परभणीतील पहिला #नोकरी_महोत्सव ठरला प्रचंड यवस्वी. सर्व सहकारी तथा सहभागी तरुणांचे मन:पुर्वक शुभेच्छा व निवड झालेल्यांचे खुप खुप अभिनंदन!
#ncp@supriya_sule
महाराष्ट्राचा लोकोत्सव असणारी शिवजयंती आज विश्वव्यापक होताना दिसते आहे. आपण सर्वांनी देखील आपापल्या परिवार व मित्रांसोबत हि शिवजयंती पारंपरिक पद्धतीने आणि समाजोपयोगी उपक्रम राबऊन उत्साहात साजरी करावी. शिवजयंती निमित्त सर्व शिवप्रेमींना लाख लाख शुभेच्छा !