१९७८ साली १० बेडस आणि २० डॉक्टरांना सोबत घेऊन लीलावती रुग्णालयाची स्थापना करण्यात आली. आज २८ वर्षांनी लीलावती रुग्णालय हे मुंबईतील आरोग्य क्षेत्रातील अत्यंत आदराने घेतले जाणारे नाव बनले आहे. ज्या पद्धतीची दर्जेदार रुग्णसेवा आणि आधुनिक उपचारपद्धती इथे मिळते ती इतरत्र कुठेही मिळत नसल्याने दिवसागणिक या रुग्णालयाचा नावलौकिक वाढत आहे असे मत याप्रसंगी व्यक्त केले.
शिवसेनेतर्फे साजरा होणार 'शिवोत्सव ' !
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी या जयंतीदिनी शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. हीच परंपरा पुढे नेत यावर्षीही शिवसेनाप्रमुखांची जयंती अगदी जल्लोषात साजरी करण्यात येणार असून त्यासाठी 'शिवोत्सव' या खास कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.
शिवसेनेची धुरा आपल्या हाती घेतल्यापासून मागील अडीच वर्षाच्या कार्यकाळात शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या विकासाला गती दिली. त्यांच्या या धडाकेबाज विकासकामांचा परिपाक म्हणून लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जनतेने शिवसेना आणि महायुतीला भरुभरून मतं दिली. जनतेने दिलेल्या या आशीर्वादाप्रति आभार व्यक्त करण्याकरिता वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी मुंबईतील बीकेसी मैदान येथे शिवोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात शिवसेनेच्या सर्व विजयी खासदार, आमदारांचा भव्य नागरी सत्कार करण्याबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम देखील असणार आहे.
चला तर मग तयार होऊया,
बाळासाहेबांच्या विचारांचा,
शिवसेनेच्या विजयाचा,
'शिवोत्सव' साजरा करूया !
#Shivsena #EknathShinde #DrShrikantEknathShinde
@Shivsenaofc@mieknathshinde
जळगाव जिल्ह्यातील पाचोराजवळ घडलेली रेल्वे दुर्घटना अतिशय दुःखद असून काळजाला चटका लावणारी आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी पोहचून बचावकार्य सुरू करत जखमींना हॉस्पिटलमध्ये हलवले आहे. त्यांच्या उपचाराची पूर्ण जबाबदारी सरकार घेणार असून दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य सरकारतर्फे करण्यात येणार आहे.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असून ईश्वर त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.
मराठी माणूस आणि तमाम हिंदूंची मने आणि मनगटे चेतवणारे आणि 'मार्मिक'व 'सामना' च्या माध्यमातून सामाजिक व राजकीय क्रांती घडविणारे आधुनिक हिंदुस्थानचे महान नेते अखंड हिंदूस्थानचे कैवारी , प्रबोधनकार सुपूत्र , मराठी मनाचे मानबिंदू ,हिंदू अस्मितेचे शिरोमणी ,हिंदूस्थान हिंदू , हिंदू धर्मरक्षक ,सरसेनापती ,हिंदूस्थानचे एकमेव हिंदूह्दयसम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. या महान नेत्यास विनम्र अभिवादन!
#BalasahebThackeray #Hinduhrudaysamrat #शिवसेनाप्रमुख
@Shivsenaofc@mieknathshinde
वंदनीय शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या हिंदुत्वाची धुरा समर्थपणे सांभाळणारे शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन शिवसेना उपनेते आणि आमदार विजय शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आज माझ्या हस्ते भगवा हाती घेत शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री. शहाजीआबा गायकवाड, सासवड नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्री. दिपक टकले, पुरंदर खरेदी विक्री संघाचे संचालक श्री. सागर जगताप आणि सासवड नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. संदिप जगताप यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला.
#Shivsena #EknathShinde #DrShrikantEknathShinde
@Shivsenaofc@vijayshivtare
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचाराने शिवसेनेची घोडदौड कायम ठेवणारे शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्याने प्रभावित होऊन अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री. सईद खान यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) गटाचे माजी जिल्हापरिषद अध्यक्ष श्री. महेशराव फड, पाथरी नगर परिषदेचे उपाध्यक्ष श्री. आयुब खान उर्फ लालु खान, श्री. अली अफसर अन्सारी तसेच पाथरी नगर परिषदेचे सभापती श्री. अलोक नारायणराव चौधरी यांच्यासह पाथरी आणि मानवत नगर परिषदेच्या अनेक नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पाथरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. रामप्रसादजी कोल्हे पाटील, श्री. गणेश सखाराम दुगाणे, श्री. शेख दस्तगीर शेख हसन, श्री. संजीव मारोतराव सत्वधर यांनी देखील प्रक्ष प्रवेश केला. तसेच परभणी जिल्हातील पोखर्णी तसेच पेडगाव सर्कल येथील उबाठा गटातील कित्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेचा भगवा हाती घेत पक्ष प्रवेश केला.
या सर्वांचे शिवसेना परिवारात स्वागत करुन त्यांना नियुक्ती पत्र देत पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
#Shivsena #EknathShinde #DrShrikantEknathShinde
@Shivsenaofc@mieknathshinde
मुंबईतील प्रसिद्ध लीलावती रुग्णालयाचे परिचारिका प्रशिक्षण केंद्र आणि प्रस्तावित कॅन्सर केअर हॉस्पिटल मेयो क्लिनिक यांच्यातील 'लेटर ऑफ इंटेन्टवर' स्वाक्षरी करण्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या 'लीलावती इनिशिएटिव्ह' या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहिलो.
अमेरिकेतील मेयो क्लिनिक सोबत दर्जेदार नर्सिंग प्रशिक्षण आणि प्रस्तावित कॅन्सर केअरसाठी 'लेटर ऑफ इंटेन्टवर' करण्यात आलेल्या स्वाक्षरीमुळे आगामी काळात हे रुग्णालय अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण रुग्णसेवा देऊ शकणार आहे.
याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे, आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मेयो क्लिनिक यूएसएचे सीईओ बिजू सॅम कुट्टी तसेच लीलावती रुग्णालयाच्या संचालक श्रीमती चारू किशोर मेहता आणि रुग्णालयातील सर्व प्रतिष्ठित डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Shivsena #DrShrikantEknathShinde
@mieknathshinde @abitkar_prakash @ShelarAshish@PratapSarnaik
साहेब, आपल्या '८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण'
या संदेशाची शिदोरी घेऊन आम्ही शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवत ठेवणार
आणि महाराष्ट्राच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहणार !!
#Shivsena#Eknathshinde