@Shreekumar3119@suprziz नवी मुंबई परिवहन उपक्रमाशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद,
मार्ग A-5 ही बस फक्त विमानतळाच्या कार्गो टर्मिनल आणि स्टाफ पार्किंगपर्यंतच जाते.
जर तुम्हाला NMIA मुख्य टर्मिनलला (Main Terminal) जायचे असेल, तर कृपया मार्ग A-7 (पनवेल ते NMIA) या बसचा वापर करावा.
@Rizwanbarca1@NMMConline@NMMCCommr नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून नवी मुंबई हद्दीबाहेर बस शेल्टरची उभारणी करण्यात येत नाही. तथापि प्राप्त सूचनेनुसार पाहणी करून बस पोल उभारणी करण्यात येईल.
@brianviveira परिवहन उपक्रमाशी संपर्काबद्दल धन्यवाद.
सदर बाब तांत्रिक विभागाच्या निदर्शनास आली असून, ॲपचे सर्व्हर आणि GPS ट्रॅकिंग यंत्रणा दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे.नजीकच्या काळात नवीन ITMS प्रणालीअंतर्गत, आधुनिक व अचूक NMMT BUS TRACKER APP प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दि.१५/१/२६ रोजी नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूककामी उपक्रमाकडून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. यास्तव दि.१४/१/२६ सकाळ व दि.१५/१/२६ रोजी दुपारचे बस संचलन विस्कळीत होवून काही मार्गावरील बससेवा बंद राहण्याची शक्यता आहे. तरी प्रवाशी जनतेने उपक्रमास सहकार्य करावे,ही विनंती
@MayureshP2020 आपल्या सूचनेबद्दल धन्यावाद !
सद्यस्थितीत उपक्रमाकडे बसगाड्यांची संख्या कमी आहे. भविष्यात बसगाड्यांची संख्या वाढल्यास याबाबत विचार केला जाईल.
@connect_sree महोदय,
आपल्या सूचनेच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, यापूर्वी मार्ग क्रमांक १०७ वरील बसेस वाशी बस स्थानकातुन ये-जा करत होत्या. परंतु वाशी बस स्थानकाचे बांधकाम सुरु असल्याने बसेस बाहेरुन जात होत्या.तथापि सदर बस स्थानकाचे बांधकाम पूर्ण झाल्याने बसेस स्थानकाच्या आतून ये-जा करत आहेत.
दिनांक ०६-०९-२०२५ रोजी अनंत चतुर्दशी दिवशी मुंबई मधील गर्दी पाहता व दिनांक ०८-०९-२०२५ रोजी ईद-ए-मिलाद या दिवशी मुंबईमध्ये शासकीय सुट्टी असल्या कारणाने वर्ल्ड ट्रेड सेंटर व मंत्रालय मार्गे जाणाऱ्या NMMT च्या सर्व मार्गावरील बस प्रवर्तन बंद ठेवण्यात आले आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनामुळे मंत्रालय व नजीकच्या परिसरात प्रचंड प्रमाणात गर्दी झाल्याने मंत्रालय कडे जाणाऱ्या NMMT च्या सर्व मार्गावरील बस प्रवर्तन आंदोलन संपेपर्यंत बंद ठेवण्यात येत आहे , याची प्रवाशी जनतेने नोंद घ्यावी .
@Drautspeaks@NMMConline@mieknathshinde महोदय, आपण केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, खारघर रेल्वे स्थानकावरील कार्यरत सर्व पर्यवेक्षकीय कर्मचारी व चालक / वाहक यांना नियोजित वेळेत बसेस मार्गस्थ करणेबाबत व प्रवाशांसोबत सौजन्याने वागण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
@Drautspeaks@NMMConline@mieknathshinde खारघर रेल्वे स्थानक बस नियंत्रण कक्षावरुन मार्ग क्रमांक 43, 45, 53, व 54 ह्या मार्गावर बसेस धावत असुन काही कर्मचारी त्यांचे विश्रांती वेळेत विश्रांतीकरीता थांबलेले असतात. संबंधित मार्गावर ईलेक्ट्रीक बसेस असल्याने पुरेश्या चार्जिंग अभावी बसेस उभ्या असतात.
@Drautspeaks@NMMConline@mieknathshinde सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने खारघर हायवे हिरानंदनी येथे वाहतूक कोंडी होत असल्याने बसेसच्या फेऱ्या रद्द होत आहेत. परिणामी बसेस वेळापत्रक प्रमाणे धावत नाहीत. तसेच प्रवासी संख्या पाहता या मार्गाचे सर्वेक्षण करून बसेस वाढवणे बाबत संबंधित विभागास कळविण्यात येत आहे.
@Drautspeaks@NMMConline@mieknathshinde खारघर रेल्वे स्थानक बस नियंत्रण कक्षात चार्जिंग पॉईंट बसविण्याचे काम सुरु आहे. सदर काम पूर्ण झाल्यास चार्जिंग संबंधित समस्या दूर होईल.