नागरिकांनो, आत्महत्या हा कोणत्याही गोष्टीवरचा पर्याय नाही हे लक्षात घ्या.
कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ११२ डायल करून आमच्याशी निःसंकोचपणे संपर्क साधा.
#महाराष्ट्र_पोलीस#मदतीसाठी_सदैव_तत्पर
सह्याद्रीच्या दरीखोऱ्यांपासून ते कोकणच्या किनाऱ्यापर्यंत प्रत्येक मैलावर ऐतिहासिक शौर्याचा पैलू जोपासत विस्तारलेले आपले महाराष्ट्र राज्य!
सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#महाराष्ट्र_दिन_२०२६
Don’t miss a second of the action from the 36th Maharashtra State Police Sports Competition 2026.
Download the Official MSPG App now:
https://t.co/NYprmNFNku
https://t.co/WuOE1yQwvB
Watch live. Stay updated. Experience the spirit of the force.
#MSPSG2026
“गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न”
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून फेब्रुवारी-२०२६ मधे "गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न" करीता निवड झालेले गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस स्टेशनचे तापसी अधिकारी/भूषण बुराडे, सपोनि/किशोर मावस्कर, पोलीस निरीक्षक/पुरुषोत्तम अहेरकर व पैरवी अधिकारी यांना आज दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी राज्याचे पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांचे हस्ते प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.
सन्मानित अधिकारी यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
#PoliceWork #Investigation #GondiyaPolice #SalekasaPolice #Mahapolice
"सर्वोत्कुष्ट अपराध सिद्धी"
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून फेब्रुवारी-२०२६ मधे "सर्वोत्कुष्ट अपराध सिद्धी" करिता निवड झालेले ठाणे पोलीस आयुक्तालयातील शीळ डायघर पोलीस स्टेशनचे तापसी अधिकारी पोलीस निरीक्षक/रामचंद्र मोहिते व पैरवी अधिकारी यांना आज दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी राज्याचे पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते यांचे हस्ते प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.
सन्मानित अधिकारी यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
#PoliceWork #Conviction #ThaneCityPolice #DigharPolice #MahaPolice
🚔 अकोला पोलीस दलाचा देशपातळीवर गौरव!
६९ व्या अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीट २०२५-२६ मध्ये 💻 ‘प्रोजेक्ट त्रिनेत्र’ ला
🏆 राष्ट्रीय “Best IT Project” ट्रॉफी प्रदान!
केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. श्री. नित्यानंद राय यांच्या हस्ते
SP श्री. अर्चित चांडक (IPS) यांचा सन्मान 👏
AI व Data Analytics आधारित या प्रकल्पामुळे
➡️ सराईत गुन्हेगारीत तब्बल ४८% घट!
👉 Preventive & Predictive Policing चा उत्कृष्ट नमुना!
👏 संपूर्ण अकोला पोलीस दलाचे हार्दिक अभिनंदन!
#AkolaPolice #ProjectTrinetra #BestITProject #AIPDM #MaharashtraPolice #PoliceInnovation #ProudMoment #AI
सावधान! बनावट नोटांच्या आमिषाला बळी पडू नका. महाराष्ट्र सायबरची इंस्टाग्रामवरील रॅकेटवर मोठी कारवाई!
महाराष्ट्र सायबर विभागाद्वारे सोशल मीडियावरील बेकायदेशीर कृत्यांवर कडक नजर ठेवली जात आहे. नुकतेच इंस्टाग्रामवर 'Reels' च्या माध्यमातून बनावट भारतीय चलनी नोटा (FICN) विकणाऱ्या आणि कमी पैशात जास्त परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या खात्यांची दखल घेण्यात आली आहे.
याप्रकरणी महाराष्ट्र सायबरने मुंबई, बुलढाणा आणि जळगाव येथे एकूण ४ गुन्हे (FIRs) दाखल केले आहेत. आतापर्यंत राहुल अनिल पवार आणि योगिता हितेश भोसले या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बनावट नोटांचा वापर केवळ आर्थिक गुन्हा नसून तो देशविघातक कारवाया आणि मनी लाँड्रिंगला खतपाणी घालणारा प्रकार आहे. नागरिकांनी अशा फसव्या जाहिरातींपासून सावध राहावे आणि कोणत्याही संशयास्पद कृतीची माहिती त्वरित सायबर पोलिसांना द्यावी.
आम्ही डिजिटल जगाला सुरक्षित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहोत.
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय. 🇮🇳
६९ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा अंतर्गत आयोजित अँन्टी सबोटेज चेक स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलाने द्वितीय क्रमांक पटकावत आपली दक्षता सिद्धत्वास आणली.
#अखिल_भारतीय_पोलीस _कर्तव्य_मेळावा
६९ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पोलीस फोटोग्राफी या स्पर्धेत द्वितीय स्थान पटकवल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांचे मनःपूर्वक अभिनंदन!
#अखिल_भारतीय_कर्तव्य_मेळावा
महाराष्ट्र पोलीस दलाने शिस्त आणि समन्वय साधत ६९ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा अंतर्गत आयोजित ड्रिल स्पर्धेत द्वितीय क्रमांकावर स्थान प्राप्त केले आहे.
#अखिल_भारतीय_पोलीस_मेळावा