महाराष्ट्राच्या सहावीच्या इतिहासातून वेद काळातील मांसाहार हद्दपार झाला, यात इतिहासाची लपवाछपवी तर आहेच, पण समकालीन हिंदुत्व हे कोणत्या धर्माचे आणि सामाजिक चित्राचे वर्चस्व आणू पाहते याची ती झलक आहे. 1/3
@PalshikarSuhas ऋवेदात इंद्राला बैलाचे मांस प्रिय होते
याज्ञवल्क्य ऋषींना मांसाहार परामोन्न वाटे
ऐतरेय व शतपथ ब्राह्मण निर्माते मांसाहारी होते
मनूने यज्ञ व पितृकार्यात मधुपर्क रेकमेंड केले
महाभारतातील शांतीपर्वात रंतीदेव राजा किचनमध्ये रोज २००० बैल व २००० अन्य प्राणी शिजवीत असे.
हे शिकवणार का?
तरुणांनो, भक्त नको—नागरिक व्हा!( फक्त तरुणाई साठी!)
तरुणांनो,
नायक जरूर निवडा.
पण मालक नको.
आदर करा.
पण बुद्धी गहाण ठेवू नका.
टाळ्या वाजवा.
पण आधी प्रश्न विचारा.
कारण लोकप्रियता म्हणजे सत्य नव्हे.
व्हायरल होणे म्हणजे कर्तृत्व नव्हे.
कॅमेरा म्हणजे चारित्र्य नव्हे.
गर्दी म्हणजे पुरावा नव्हे.
आणि लाखो followers म्हणजे लाखो विचारवंत नव्हेत!
धर्मगुरू असो.
राजकारणी असो.
अधिकारी असो.
सेलिब्रिटी असो.
की समाजमाध्यमांनी रातोरात घडविलेला नवा ‘महापुरुष’ असो.
माणूस म्हणजे माणूसच. देव नव्हे.
तो चुकू शकतो.
त्याला प्रश्न विचारता येतात.
त्याच्या कर्तृत्वाचा हिशेब मागता येतो.
तुमच्या नायकाला प्रश्न विचारल्यावर तुम्हाला राग येत असेल—
सावधान!
कदाचित तुमचा नायक धोक्यात नाही.
तुमचा विवेक धोक्यात आहे.
अल्गोरिदमला तुमचा विचार नको असतो.
त्याला तुमची उत्तेजित बोटे हवी असतात.
Like.
Share.
Forward.
आणि मग—
विचारशक्तीला निरोप!
लोकशाहीला भक्त नकोत.
तिला नागरिक हवेत.
विज्ञानाला श्रद्धा नको.
त्याला पुरावा हवा.
भारताला देव्हारे वाढवायचे नाहीत.
विचार करणारी मने वाढवायची आहेत.
म्हणून—
अनुसरण करा.
पण आंधळेपणाने नाही.
आदर करा.
पण लोटांगण घालू नका.
प्रश्न विचारा.
पुरावा मागा.
चिकित्सा करा.
कारण ज्यादिवशी तरुणाईने स्वतःची बुद्धी एखाद्या व्यक्तीच्या चरणी ठेवली—
त्या दिवशी देशाला भविष्य मिळणार नाही.
फक्त नवा देव्हारा मिळेल.
आणि लक्षात ठेवा—
भक्त होणे सोपे आहे.
नागरिक होण्यासाठी बुद्धी लागते.
-महेश झगडे
I have lodge complaint for service (CM-250726-75796450) is pending for 2 weeks. No one attended yet. Before that from 2 months I had lodge many complaints which closed unilateraly by company. Pl look into complaint.
@EurekaforbesIN
@sohitmishra99 You have shown your honestyn in journalism which required truly in this regime. You have done it passionately which give you lot of love from viewer. More love to you ❤️
शिव्यांची संस्कृती आणि संस्कृतीच्या शिव्या
अभद्र शब्द कोणी निर्माण केले?
शिव्या कोणी घडवल्या?
त्या शतकानुशतके जपून का ठेवल्या?
बहुधा हा आपला अमूल्य सांस्कृतिक वारसा असावा!
घरातील मुले शिव्या देतात.
मुली अभद्र बोलतात.
नातवंडे त्याची पुनरावृत्ती करतात.
आणि ज्येष्ठ म्हणतात—
“आजकालची पिढीच बिघडली!”
वा!
बीज आपण पेरायचे.
झाडाने मात्र उत्तर द्यायचे!
संस्कार केले नाहीत.
भाषेची शिस्त लावली नाही.
स्वतःच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवले नाही.
पण दोष?
समाजाचा.
काळाचा.
मोबाईलचा.
सोशल मीडियाचा.
फक्त स्वतःचा नाही!
शिव्या ही कोणाची मक्तेदारी नाही.
अभद्रता कोणाचे विशेषाधिकारपत्र नाही.
घरातील कोणी अभद्र बोलले, तर त्याची पहिली जबाबदारी घरातील ज्येष्ठांची.
कारण संस्कार भाषणांतून होत नाहीत.
ते वर्तनातून उतरतात.
माझ्या कुटुंबातील कोणी शिवी दिली, तर ते त्याचेच नव्हे—माझेही अपयश.
हे मान्य करण्यासाठी संस्कृती लागते.
आणि अभद्र शब्द उच्चारण्याची वेळच येऊ न देणे—
ही खरी भारतीय संस्कृती.
कुटुंबातील ज्येष्ठांचे प्रवचन आणि जबाबदारी झटकणे
हा संस्कार नव्हे.
हा सांस्कृतिक विनोद आहे.
-महेश झगडे
शाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे कम्युनिस्ट विचारवंत साहित्यक असतानाही ब्राह्मणी छावणी त्याना दिवसाढवळ्या बिनदिक्कतपणे हायजॅक करत आहे. अब्राह्मणी परंपरातील आयडॉल, प्रतीके, सिम्बॉल, अस्मिता, सण उत्सव, ब्राह्मणी संस्कृती अजगराप्रमाणे गिळत आहे. आणि हे सगळं चालू असताना प्रचलित सन्मानित परिवर्तनवादी चळवळीकडे त्रागा करण्याकडे कोणताही उपाय राहिला नाही. कॉम्रेड शरद पाटील यांनी वारंवार अब्राह्मणी सांस्कृतिक राजकारणाच्या विधायक मार्ग, आधुनिक तत्वज्ञान देऊनही चळवळीनी त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. उलट त्याची अवहेलनाच केली.
ब्राह्मणी छावणीला डाव्या विचाराचे प्रचंड वावडे आहे. डाव्या विचाराचा ते प्रचंड द्वेष करतात, असे असतानाही अण्णाभाऊ साठे सारख्या पक्क्या कम्युनिस्ट महापुरुषाला ते आपलं म्हणून उदो उदो करू शकतात तर, इतर लिबरल, सेक्युलर, पुरोगामी महापुरुष, सांस्कृतिक प्रतिके, अस्मिता ते तुमच्या तोंडासमोर चोरू शकतात आणि तुम्ही टिपिकल बुर्जवा मानवतवाद पाझळून, अहो तुम्हाला हे शोभत का हे? याचा निषेध करतो आम्ही , या अळणी भाषेपलीकडे काय करू शकतात.? जर करू शकतात तर हेडगेवारच्या बाजूला डॉ बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक कशी निघाली? आणि आता अण्णाभाऊ साठे!
आपण ज्यांच्या प्रेरणेने या शोषक शासित व्यवस्था विरोधात लढा उभारतो तीच प्रेरणा चोरली जात असेल, हायजॅक केली जात असेल तर हे चळवळीनी अपयश मान्य करायला कुरबुर करू नये. उदाहरणार्थ - आजार मान्य केला तरच त्याच्या उपचारासाठी पुढील पाऊल उचलता येईल.
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा तरुणांनी दाखविलेल्या एकजुटीचा विजय आहे. तरुण भीतीवर मात करत निर्भय होऊन रस्त्यांवर आले आणि सरकारला त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. शेवटी संघर्ष केल्यानंतर विजय नक्की मिळतो.
@PawarSpeaks NEET पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांना झालेली मारहाण याबाबत आपण कोणतेही पत्र दिलेले नाही. फक्त लोकांचा रोष टाळण्यासाठी पोस्ट मध्ये लिहिले आहे. तुमची या विषयावर खरच चर्चा झाली आहे का यावर शंकेला वाव आहे. महाराष्ट्रातील जनतेची शुद्ध फसवणूक करण्याचे काम आपण करत आहात.
ज्येष्ठ समाजवादी नेते, पुरोगामी विचारवंत, 'युवक क्रांती दला'चे (युक्रांद) संस्थापक आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पुरोगामी विचारवंत होते. त्यांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली!
समाजवादी विचारांचे ज्येष्ठ विचारवंत, निर्भीड सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि युवकांच्या वैचारिक चळवळीला दिशा देणारे प्रेरणास्थान डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, वैचारिक आणि पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली आहे.
सत्ता नव्हे तर समाजपरिवर्तन, संघर्षातून विधायक परिवर्तन आणि विचारांच्या बळावर नवी पिढी घडवण्याचा ध्यास त्यांनी आयुष्यभर जपला. युवक क्रांती दलाच्या माध्यमातून त्यांनी असंख्य तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकी, लोकशाही, संविधानिक मूल्ये आणि परिवर्तनाची प्रेरणा रुजवली.
व्यक्ती निघून जाते, पण तिचे विचार कायम जिवंत राहतात. डॉ. कुमार सप्तर्षी यांनी पेरलेले सामाजिक परिवर्तनाचे विचार आणि न्याय, समता व लोकशाहीसाठीचा त्यांचा संघर्ष पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
डॉ. कुमार सप्तर्षी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
#भावपूर्ण_श्रद्धांजली
@RRPSpeaks ज्येष्ठ समाजवादी नेते, पुरोगामी विचारवंत, 'युवक क्रांती दला'चे (युक्रांद) संस्थापक आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!
@beingshrutip@Wangchuk66 अमृतकाळात लोकशाहीतील कोणतीही आयुधे उपयोगात येत नाही. त्यामुळे स्वतःचा जीव धोक्यात न घालता उपोषण मागे घ्यावे व अन्य पर्यायाचा विचार करावा.