दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण स्फोटात हकनाक जीव गमावलेल्या निरपराध नागरिकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
जखमी नागरिकांच्या लवकर बरे होण्यासाठी मनःपूर्वक प्रार्थना करतो.
या दुर्दैवी घटनेने संपूर्ण देशाला वेदना दिल्या आहेत.#DelhiBlast#RedFort#tributeinlight
After Rahul Gandhi exposed the Haryana VOTE CHORI, everyone should watch this video to understand how the process actually works and how it is a centralized operation. This isn’t about voters or individuals casting their votes multiple times.
it’s about creating space for voting and conveniently enabling fake voting without any hassle.
स्व डॉ.संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे..
एका शेतकरी आई-बापाने मोल मजुरी, ऊसतोडणी करून आपल्या लेकीला जिद्दीने घडविले ती कर्तबगार लेक म्हणजे स्व.डॉ.संपदा मुंडे.!
चुकीचे नियमबाह्य अहवाल देण्यासाठी तसेच काही पी.एम रिपोर्ट बदलण्यासाठी डॉ.संपदा वर स्थानिक पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधी गेल्या वर्षभरापासून प्रचंड दबाव टाकत होते पण डॉ.संपदा कोणत्याही दबावाला न घाबरता आपली आरोग्यसेवा प्रामाणिकपणे करत होते.
ती अनेक महिन्यापासून या प्रशासनातल्या असूरी शक्ती विरुद्ध नियतीचा लढा एकटी लढत होती.!
पोलीस व प्रशासन आरोग्य विभागातील मधील वरिष्ठ- कनिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने एकत्र येऊन केलेली संस्थात्मक हत्या आहे.
आज आवाज नाही उठवला तर हि जुलमी राजवट महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये एक डॉ.संपदा करतील..
#JusticeForDrSampada
आज धनत्रयोदशी!
धनत्रयोदशीला समुद्रमंथनातून ‘धन्वंतरी’ या आरोग्यदेवतेचा जन्म झाला. म्हणून हा दिवस आरोग्य, समृद्धी आणि उज्ज्वल विचारांचा उत्सव मानला जातो.
आपल्याकडे या दिवशी सोनं-चांदी विकत घेण्याची परंपरा आहे, पण खऱ्या अर्थाने —
प्रामाणिकपणा, विश्वास आणि समाजसेवा हेच खरे धन आहे.
कळव्यातील वाढत्या ट्रॅफिकच्या संदर्भात आज पंकज शिरसाठ (उपायुक्त वाहतूक विभाग) यांची भेट घेतली आणि कळव्यातील वाहतुकीवर कसे नियंत्रण मिळवता येईल? वाहतुक सुधारण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील? याबाबत चर्चा केली आणि Ptsd सूचना देखील केल्या.यावेळी माझ्यासोबत ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, श्री.प्रकाश पाटील आणि अभिजित पवार देखील उपस्थित होते.
वसुबारस हा दिवस आपल्याला मातृशक्ती आणि शेतीची कदर करायला शिकवतो.
शेतकरी, गाई, व आपले श्रमिक हेच राष्ट्राचे खरे धन आहेत.
या वसुबारसला आपण श्रम आणि संस्कृती या दोन्हींचा मान राखूया.
समीर साहेबराव नेटके
@Awhadspeaks@AbhijeetPawar08@NCPspeaks@ncp
विनम्र अभिवादन #मिसाईल_मॅन#abdulkalam
https://t.co/zZIsPgtUwH
“स्वप्न तेच बघा जे तुम्हाला झोपू देत नाहीत...”
आज *भारताचे मिसाईल मॅन, महान वैज्ञानिक, विचारवंत आणि भारतरत्न*
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त
त्यांना कोटिशः अभिवादन
याच बाबीला आपण महाराष्ट्र निवडणूक सोबत देखील जोडून पाहू शकतो.
संभाजीनगर,अकोला,मालेगाव,जालना, नांदेड...या ठिकाणी हजारो मतदारांची नावं हटवण्यात आली आहेत.अस करण्याचा अधिकार BLA ला नाही तर BLO ला आहे,ERO ला आहे.ही जी नाव हटविण्यात आली ती देखील अर्थातच भाजपा विरोधकांची म्हणजेच दलीत,मुस्लिम आणि आदिवासी बांधवांची होती..! आणि याचा सरळ सरळ उद्देश हा विरोधी पक्षांना कमजोर करण्याचाच होता..आणि म्हणून या सर्व ठिकाणी सत्ताधारी वर्ग विजयी झाला..!
“लोकशाही ही केवळ निवडणुकीची प्रक्रिया नाही; ती एक विश्वासाची व्यवस्था आहे.आणि जेव्हा त्या विश्वासाचा आधारस्तंभ असलेली संस्था म्हणजे निवडणूक आयोग दडपशाही, पक्षपातीपणा आणि निष्काळजीपणाच्या दलदलीत बुडते,तेव्हा हा केवळ संविधानाचा अपमान नसतो तर तो राष्ट्रद्रोहच असतो.”
निवडणूक आयोगाचा एकूणच कारभार बघता मला तर प्रश्न पडतोय की,हे आयोग आहे की भाजपा सारख्या पक्षाची पक्षनिष्ठ यंत्रणा?
एकेकाळी टी.एन. शेषन, ल्यो पिंग यांसारख्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी
निवडणूक आयोगाला लोकशाहीचा संरक्षक बनवलं होतं.पण आज, ECI हा एक सत्ताधाऱ्यांचा बायप्रॉडक्ट बनला आहे.जो या देशातील नागरिकांचे हक्क मारून एका विशिष्ट पक्षाच्या हितसंबंधासाठी काम करतो आहे..!! आता यांना शहाणे व्हा,अस म्हणण्याची देखील वेळ निघून गेली आहे.मला वाटत या उन्मत्त आणि मदमस्त आयोगाला या देशातील जनताच धडा शिकवेल ..!
"आपण ज्या स्वातंत्र्यात श्वास घेतो, ते असंख्य वीरांच्या बलिदानाने घडवलेले आहे.
तिरंग्याच्या प्रत्येक रंगात त्यांचा त्याग, शौर्य आणि स्वाभिमान कोरलेला आहे.
स्वातंत्र्य ही केवळ एक ऐतिहासिक घटना नाही, तर प्रत्येक नागरिकाने रोज जगायची एक जबाबदारी आहे. #जयहिंद@Awhadspeaks@NCPspeaks
निवडणूक आयोगाच्या लेखी मृत्यू पावलेले जेव्हा सुप्रीम कोर्टात प्रत्यक्ष येऊन हजेरी देतात...
आज सुप्रीम कोर्टात ज्यावेळी बिहार राज्याच्या निवडणुकीसंदर्भात सुनावणी सुरू होती त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री.योगेंद्र यादव यांनी स्वतः.आपली बाजू तर मांडलीच सोबत अशा मतदारांना कोर्टात स्वतःहून उपस्थित केलं ज्यांची नावं मतदारयादीत मृत म्हणून घोषित केली होती....
म्हणून तर लोकं आता म्हणतात
#विक्रम_ही_वेताल_आहे
#VoteChori